अर्धेशरीर प्राण्यांचे आणि अर्धे मनवी शरीर असलेले अनेक भयानक मायावी प्राणी पुराणात सापडतात. भूतांचेही अनेक प्रकार देशोदेशींच्या दंतकथांमध्ये आढळतात. स्मार्टदोस्तने अशाच दंतकथांमधील भयानक प्राण्यांची यादी बनवली आहे.

1. पोन्टीयानाक (Pontianak):

इंडोनेशियाच्या दंतकथांमध्ये अढळणारी ही मायावी शक्ती. लहानपणीच मृत्यू पावलेली हडळ अशी भयंकर ख्याती असणारी. जेव्हा लहान बाळाचे रडणे जवळपास ऐकू येते तेव्हा समजायचे की पोन्टीयानाक आता कोणत्या तरी माणसाची शिकार करणार आहे. एक वेगळाच सुवास पोन्टीयानाक भक्ष्यांच्या जवळ आल्यानंतर येतो आणि मग हाताच्या टोकदार नख्यांनी माणसाचे पोट फाडून त्याला ठार मारण्यात ती विकृत समाधान मानते.
घराबाहेर वाळत ठेवलेले तुमचे कपडे जर रात्री तसेच बाहेर राहिले तर पोन्टीयानाकचे शिकार होण्याचे संभव जास्त असतो असे म्हणतात. म्हणूनच या देशात बाहेर कपडे वाळत घालताना अंधश्रध्दाळू लोक फार घाबरतात. असे ‘‘दि अलमोस्ट कंप्लिट कलेक्शन ऑफ ट्रू घोस्ट स्टोरीज’’ या आर. ली. या लेखकाने लिहले आहे.

2. ब्लेमेस (Blemmyes)

डोके नसलेली ही अमानवी शक्तीमनुष्याचे मांस भक्षण करणारा ब्लेमस पुरातन लिबीया या देशात अस्तित्वात होता. डोके नसणारी ही भूते. म्हणूनच हिब्रू भाषेत ‘ब्लेमेस’ म्हणजे शिरविरहीत प्राणी या नावाने ओळखली जायची. डोक्याऐवजी छातीवरच भक्ष्यांना खाण्यासाठी अणकूचीदार दात आणि तोंड असल्यामूळे मूळातच भयंकर दिसणारी ही भूते फार अधोरी कृत्यकरायची.
संदर्भ: द हिस्टरीज हे हिरोडोटसने लिहलेले पूस्तक.

3. ओगोपोगो (Ogopogo)

कॅनडामधील ओकानगान या मोठया तलावात जिवंत दिसलेली ही आकृती यूट्यूबवर याचे व्हिडीयोजपण पहावयास मिळतात. १९व्या शतकापासून याचे आस्तित्व अनेकांना जाणवले आहे. ५० फूट लांब अशा अजस्त्र प्राण्याने या तलावात आपले दर्शन देवून अनेकांचे तोंडचे पाणी पळवले आहे. ब्रिटीश प्राणीशास्त्रज्ञ कार्लशूकेरच्या मते डायनॉसॉरसच्या काळातील व्हेलमाश्यांची उत्क्रांती पूर्वजात म्हणजेच ओगोपोगो.

4. बाखटक (Bakhtak):

कधी झोपेत भयानक स्वप्न पाहिले आहे? असेल तर जरूर तुमच्या छातीवर वाखटक असला असेल. तुम्ही जेव्हा गाढ झोपेत असता तेव्हा अदृश्यबाखटक तुमच्या छाताडावर बसून तुम्हाला लकवा मारू शकतो. भक्षाची स्वप्ने एका भयंकर भविष्यात नेवून सोडणारा पर्शियन बाखटक.

5. अबारीमॉन (Abamon)

हिमालयाच्या पलीकडील खोऱ्यामध्ये प्रचलीत असणारी दंतकथा. उलट्या पायाची भूते जी प्राण्यांबरोबर राहतात. पाय जरी उलटे असले तरी प्रचंड वेगाने धावणारी आणि मनुष्य प्राण्यांचा घात करणारी ही भूते ज्या प्रदेशात राहतात त्या प्रदेशाला “ग्रेट व्हॅली ऑफ माऊँट इमाऊस” या नावाने ओळखले जाते.
माऊँट इमाऊसमधील हवा जरी एकदा श्वासाव्दारे शरीरात गेली तरी पून्हा कोणत्याही हवेत तूम्ही श्वास घेवू शकणार नाही असे म्हणतात. म्हणून इमाऊसमध्ये न राहणे हे कधीही या भूतांपासून वाचण्याचा उपाय.
संदर्भ:नॅचरल हिस्टरी ऑफ प्लीनी.

952 total views, 1 views today