“त्याचे माझ्यावर प्रेम आहे…त्याचे माझ्यावर प्रेम नाही…” असे म्हणत गुलाबांच्या एक एक पाकळ्या तोडून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अनेक कन्यांनी लाईफमध्ये केलाय. त्या हातात राहिलेल्या बेजान गुलाबाच्या कांडीमुळे ‘त्याचे” प्रेम “तिच्या”वर आहे का नाही हे खरोखर समजते का? हे एक कोडेच आहे.. परंतु प्रेमात अनेक यातना सोसाव्या लागतात हे मात्र त्या गुलाबाला त्या दिवशी समजते..हे नक्की.

असो.. लाईफमध्ये लव्ह आहे का हे जाणून घेण्यासाठी गुलाबांचा बळी देण्याची आता गरज नाही. एक खुशखबर आहे. त्याचा WhatsApp चा वापर नक्की सांगेल की “तो” प्रेमात आहे.. कसे ते कळण्यासाठी वाचा WhatsApp च्या कोणत्या 5 खाणाखुणा सांगतात.. “तो प्रेमात आहे..”

दोस्तहो, हा लेख जरी “ती” च्या साठी असला तरी इतरांनीही वाचायला हरकत नाही. कदाचित बॉयफ्रेंड मित्रांना WhatsApp द्वारे प्रेम कसे व्यक्त करता येईल हे कळेल..

1. छोटे टेक्स्ट..लंबी बाते :

प्रेमात पडलेला “तो” WhatsApp वरील संभाषण लाइव्ह अन कंटिन्यूअस, अखंडित ठेवण्याचा प्रयत्न करतो. टेक्स्ट लहानच असतील पण जास्त वेळ तो गुंतवून ठेवण्याचा तो प्रयत्न करेल. जर बाते बोरिंग व्हायला लागतील तर तो इमेजेस वा प्यारभऱ्या गाण्याच्या ऑडीओज, व्हिडीओज पाठवेल जेणेकरून तुम्ही रीसपॉन्ड कराल अन बाते चालूच राहतील. “तो” तुमच्याबद्दल सतत काही ना काही प्रश्न विचारेल जेणेकरून त्याला तुमच्यात इंटरेस्ट आहे हे तो दाखवून देईल अन त्याच बरोबर तुमची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेल.

त्याचे मेसेजेस लॉंन्ग अन डिटेल असतील. त्याचे तुमच्यावर प्रेम असल्यामुळे “तो” कधीच शॉर्टमध्ये “k”, “GM”, “GN”.. असा रिप्लाय देणार नाही. अन हो.. शब्दांचा वापर करताना प्रेमातला “तो” काही शब्द उगाचच एक्स्टेंड करेल. म्हणजे hi, hallo असे म्हणताना तो hiii, halloooo असे टाईप करेल.

2. केअरिंग टेक्स्ट :

प्रेमात पडलेल्या त्याला सतत तुमची काळजी असते. म्हणूनच दिवसाची सुरुवात “तो” करतो “गुड मॉर्निंग”ने अन दिवसभर मग तुम्ही काय खाल्ले, ब्रेकफास्ट केला का?, जेवला का?, निट जेवला का? असले केअरिंगवाले प्रश्न विचारतो. अन सरते शेवटी दिवसाचा शेवट “गुड नाईट” म्हणूनच करतो. “तो” चाटिंगमध्ये आनंदी स्मायली ईमोजीचा भरपूर वापर करेल. त्याच्या भावना तुम्हाला कळाव्या हाच त्याचा हेतू असेल. अन हो.. नंतर नंतर गुड बाय म्हणताना तो किसेस व हार्टचे साइन्सही पाठवेल. कधीकधी तुमच्याबरोबर ऑनलाईन असताना “तो” टाईप करायला वेळही घेईल. याचा अर्थ “तो” काळजीपूर्वक शब्दांची जुळवाजुळव करतोय हे लक्षात येईल.

3. इंस्टंट रिप्लाय :

तुमच्या कोणत्याही पोस्टला “तो” इंस्टंट रिप्लाय देईल. जरी तो बिझी असला तरी तो तसेच करेल. तुमच्या पोस्टवर “तो” चांगले कॉमेंटस करेल. तुमची पोस्ट पाठवल्या पाठवल्या क्षणात दोन निळ्या टिक्स तुमच्यामध्ये त्याचा किती जास्त इंटरेस्ट आहे हे दाखवतील. अगदीच सुपर बिझी असला तर “तो” शॉर्टकटचा सहारा घेईल. पण काम झाल्या झाल्या “तो” रिप्लाय का दिला नाही याची करणे सांगायला म्हणून बाते सुरु करेल..चालूच राहण्यासाठी.

4. अपडेट वर बारीक लक्ष :

तुमच्या WhatsApp वरील बारीक सारीक गोष्टीवर त्याचे लक्ष असते. तुमच्या अपडेट्सवर त्याचे बारीक लक्ष असेल. तुम्ही तुमचे प्रोफाईल पिक्चर वा स्टेट्स बदलले तर “तो” लगेचच त्यावर कॉमेंट करेल. नुसतेच लाईक न करता “तो” चांगले कॉम्पलीमेंटस करेल. तुम्ही किती ब्युटीफुल दिसता हे न चुकता सांगेल. तुमचे प्रत्येक स्टेट्स तो लक्षपूर्वक वाचेल अन त्यावर “तो” रिप्लाय करेल. तुम्ही अगदी बिझी असे स्टेट्समध्ये लिहाल तरी “तो’ त्याबद्दलपण तुम्हाला विचारेल. तुमचे सर्व काही ठीक ना अशी विचारपूस करून त्याची तुमच्या बद्दलची काळजी तो दाखवून देईल. जर तुम्ही एखाद्या गाण्याची ओळ वा फिलॉसॉफीकल वाक्य लिहिले असेल तर “तो” त्या लाईन्सचा अर्थ विचारेल अन त्यावर त्याचे मत अन लाइफची फिलोसॉफी नक्की सांगेल.

अन हो त्याच्या लाईफमध्ये काय चाललेय याचे अपडेट्ससुद्धा तो सतत देईल. म्हणजे जर त्याने एखादी वस्तू विकत घेतली असेल व कोठेतरी जेवायला गेला असेल तरीही त्याचा फोटो ‘तो’ शेअर करेल. सर्व काही शेअर करायची तयारी असल्याचे हे लक्षण.

पण एक लक्षात असू द्या खरा प्रेमी व्हल्गर फोटो, मेसेजेस नक्की तुम्हाला पाठवणार नाही. तसे झाले तर डाल मी कूछ काला है हे नक्की समजा.

5. ऑड वेळी पोस्ट :

प्रेमातला “तो” तुम्हाला कोणत्याही वेळी पोस्ट, टेक्स्ट करेल. कामाच्या वेळी “तो” काय करतोय हे सांगेल, काम नसताना काम नाही हे ही सांगेल. तुम्ही काय करताय हे विचारेल अन “तो” तुम्हाला मिस करतोय हे जाणवून द्यायचा प्रयत्न करेल. अन हो ह्या पोस्ट वेळी अवेळी ही करेल. म्हणजे अगदी लेट नाईट सकाळी सकाळी एक दोन वाजताही “तो” उगाचच “एक गाणे ऐकले अन तुझी आठवण झाली” असे कळवेळ.

तर दोस्तहो, “तो” फक्त चांगला मित्र आहे का “कोणीतरी स्पेशल” आहे हे जाणून घेण्यासाठी आता गुलाबाची गरज नाही हे तर कळालेच. WhatsApp मित्राने जर तुम्हाला त्याच्या प्रेमाची चाहूल दिली तर जरूर तो गुलाब त्याला देण्यास हरकत नाही. हो..ना..

1,793 total views, 4 views today