राजे रजवाड्यांचे सोने, चांदी, हस्तीदंत महागडी अत्तरे इ. नी खचाखच भरलेले जहाज तूफानी वादळात कोणत्यातरी बेटावर जावून आपटते आणि करोडोंच्या खजीना विरवूरला जातो. मग कालांतराने सुरू होते. खजिन्याची शोध मोहीम. अमूल्य अशा दुर्मिळ खजीन्याच्या वर सांगितल्याप्रमाणे कित्येक घटना आपण ऐकल्या, वाचल्या असतील. ‘स्मार्टदोस्त’ ने अशाच परंतू सत्य घटनाची यादी केली आहे.

१) पटीयाला नेकलेस :

सन १९२८ ला हाऊस ऑफ कार्टीयरने पतीयाळाचे तेव्हाचे राजे भूपींदर सिंग यांच्यासाठी एक नेकलेस बनवला होता. दोन हजार नऊशे तीस… होय! २,९३० मौल्यवान हिर्‍यांनी सजलेला. त्या हारामध्ये जगातील सातवा मोठा ‘‘डी बिअर’’, हिरा जो २३४.६५ कॅरेटचा बसवला होता. याशिवाय १८ ते ७३ कॅरेटचे इतर सात हिरे देखील होते. शिवाय ब्रम्हदेशातून आणलेल्या रूबीजने हार सजवला होता.
सन १९४८ ला पतीयाळा नेकलेस अचानक लूप्त झाला आणि तब्बल ३५ वर्षांनी म्हणजे १९८२ ला जिनीव्हा, स्विर्त्झलँड मध्ये लिलावात विकावयास आला. दूर्देवाची बाब म्हणजे हारातील प्रमुख हिरे, ब्रम्हदेशातील रूबीज गायब होत्या. तरीसुध्दा अर्धवट हार २० कोटी रूपयांना विकला गेला. सन १९४८ मध्ये हाराचे इतर काही भाग लंडनमध्ये एका अनामीक माणसाने विकले परंतू मौल्यवान हिरे गायबच होते.
सध्या हार बनवणार्‍या मूळ कार्टीयर कंपनीने अर्धवट हाराचे भाग विकत घेतले आहेत आणि खरोखरच्या हिर्‍या ऐवजी कृत्रीम खडे बसवून हार दूकानात प्रदर्शनास ठेवला आहे.

२) लिमाचा खजिना :

स्पेन साम्राज्य त्यांच्या मांडलीक देशांवरील ताबा घालवू लागला तेव्हा लीमा या छोट्या मांडलीक देशावर परकीय शक्तींना हल्ला चढवला. सन १८१२ ला लिमावर अनेक टोळ्यांनी आक्रमण केले. लिमाच्या संपत्तीचा बचाव करण्यासाठी हिरे, माणके व सोने मेक्सीको देशात पाठवण्याचा विचार झाला. कॅप्टन थॉमसनवर लिमाचा खजिना सुखरूप मेक्सीकोला नेण्याची जबाबदारी दिली गेली. परंतू वाटेतच कॅप्टन थॉमसनची मती भ्रष्ट झाली आणि तो स्वत: खजीना घेवून पळाला. कोको बेटाच्या आसपास त्यांने तो खजीना लपवून ठेवला, कालांतराने कॅप्टन थॉमसन व त्याच्या सहकार्‍यांना स्पेनने पकडले व सर्वांना फाशी देण्यात आली. फक्त कॅप्टन व एक सहकार्‍याला स्पेनला खजीना परत देण्याच्या अटीवर जिवंत ठेवण्यात आले. कबूल केल्याप्रमाणे कॅप्टनने स्पॅनीश सैन्याला कोका बेटापर्यंत नेले परंतू खजिन्याची जागा दाखवण्याच्या बहाणा करून ते दोघेही पळून गेले. आज अखेर कॅप्टन, त्याचा सहकारी आणि मुख्य म्हणजे लिमा देशाचा प्रचंड खजीना कोणासही सापडला नाही.

३) पेकींग मॅन :

एक अतिविलक्षण शोध म्हणून पेकींग मॅन कवटीकडे पाहीले जाते. बेजींगच्या उत्खननात सापडलेली ही ‘होेमो इरेक्टस पेकीन्सीस’ ची कवटी. हा म्हणजे सात लाख ऐंशी हजार वर्षापूर्वीचा मानवी इतिहासाचा पूरावा होता. जगातील एकमेव अशी ही मानवी कवटी जागतीक दूसर्‍या महायुध्दात संकटात सापडण्याची चिन्हे दिसू लागली. म्हणूनच चिनने ती कवटी अमेरीकेस पाठवायचे ठरवले. परंतू अचानक ती चिनमधूनच गायब झाली आणि आज तागायत सापडली नाही.

४) अंबर रूम :

रशीयातील सेंट पिटर्सबर्ग मधील कॅथरीन पॅलेस मधील ही अद्भूत खोली. सन १७५५ साली जेव्हा ती बांधून पूर्ण झाली तेव्हा जगातील दूर्मिळ अश्या सहा टन अंबरनी ती सजवली गेली होती. त्याकाळात अंबर रूम हे जगातील एक आठवे आश्‍चर्य म्हणून ओळखली जायची. परंतू दुसर्‍या महायुध्दात जर्मनीने अंबर रूम अक्षरश: लूटली आणि कोइन्सबर्ग या ठिकाणी नेली म्हणतात. आश्‍चर्यांची गोष्ट म्हणजे महायुध्द संपल्यावर अंबररूम जर्मनीमध्ये नसल्याचे दिसून आले. जणू सहा टन अंबर असलेले हे जागतीक आश्‍चर्य हवेतच गायब झाले.

५) मोनालीसा :

हरवलेल्या खजीन्याच्या यादीत मोनालीसाचे नाव पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या असतील, परंतू हे सत्य आहे. आज आपण पाहतो ते मोनालीसाचे पेन्टींग काही काळ चोरले गेले होते.
इटालयीन चित्रकार लिओनार्डोदा व्हिन्चीने रंगवलेले हे चित्र जगातील सर्वात जास्त चर्चीले जाणारे, पाहिले जाणारे अतीप्रसिध्द असे आहे. सन १५०३ ते १५०६ मध्ये लिओनार्डोने ते चित्र रंगवले आहे. परंतू २१ ऑगस्ट १९११ ला मोनालीसा अचानक गायब झाल्याचे लक्षात आले. लूझस बेरॉड या चित्रकाराला पहिल्यांदा याबद्दल समजले, त्याने म्यूझीयमच्या अधिकार्‍यांना या गोष्टीची माहिती दिली. कित्येक दिवस चौकशी झाली, ज्यामध्ये तत्कालीन प्रसिध्द चित्रकार पाब्लो पिकासोवर संशय व्यक्त करण्यात आला. पिकासोला काही काळ चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. परंतू मोनालीसा सापडली नाही. नंतर सुमारे दोन वर्षांनी विन्सेंझो पेरूगीया या म्यूझीयमच्याच कर्मचार्‍याला मोनालीसा चोरून विकण्याचा प्रयत्न करताना पकडले गेले. पठ्ठयाने चोरीच्या उद्देशाने संपूर्ण रात्र म्यूझीयमच्या झाडूंच्या कपाटात लपून काढली होती. सकाळी तो हळूच मोनालीसा कोटात लपवून बाहेर गेला होता.
आज मोनालीसा बूलेटप्रूफ काचेच्या आड कडक बंदोबस्तात लोवरे म्यूझीयम, फ्रान्स मध्ये आहे.

1,179 total views, 1 views today