लिओनर्डोला जग एक प्रसिद्ध चित्रकार म्हणून ओळखतेच. परंतु जगातल्या पहिल्या यंत्रमानवाच्या (रोबो) निर्मितीत लिओनार्डोचे डीझाइन वापरले होते हे अनेकांना माहितच नाही. इतकेच नाही तर पाणबूडयाच्या सूटचे डीझाइनपण लिओनार्डोने बनवले होते. तो एक चित्रकारच नव्हता तर गणितज्ञ, शिल्पकार, आर्किटेकक्ट, ऑपरेशन करू शकणारा अॅनाटॉमिस्टपण होता. अशा या इटलीच्या विन्ची गावच्या लिओनार्डोच्या 5 गजब गोष्टीची ही यादी. (त्याचे नावही त्यामूळे लिओनर्डो दा विन्ची पडले) तर मग वाचा विलक्षण यादी. ग्रेट माणूस….

1. चित्रकलेसाठी लिओनार्डोने अनेक मृत शरीरांचे पोस्टमॉरटम करून अवयवांचा अभ्यास केला.

वयाच्या १४व्या वर्षापासून गुरु व्हेरोच्ची यांच्या सांगण्यावरून लिओनार्डोने फ्लोरेन्स, मिलान व रोम येथील दवाखान्यात अनेक मृत शरीरांचे पोस्टमॉरटम केले. त्यावरून त्याने मानवी अवयवांची २०० चित्रे काढली. त्याच्या मृत्यूनंतर सुमारे १०० वर्षांनी या चित्रांचे पुस्तक प्रकाशित झाले. आजदेखील शरीरशास्त्राचा अभ्यास करताना त्या चित्रांचा वापर केला जातो. त्याच्या याच अभ्यासाचा उपयोग जगातील पहिला रोबो तयार करताना केला गेला. लिओनार्डोचा रोबो म्हणूनच तो ओळखला जातो.

2. दा विन्ची कोड कादंबरी व चित्रपट लिओनार्डोच्या “दी लास्ट सपर” या फक्त एका चित्रावरून तयार झाला.

सन १४८२ ते १४९९ मध्ये मिलानमध्ये लीओनार्डोने हे चित्र काढले. त्या चित्रात येशूबरोबर अन्न घेणाऱ्या लोकांच्या गोंधळलेल्या भावना अचूकतेने चित्रित केल्या आहेत. तुम्हापैकी एक मला आता फसवणार आहे असे जेव्हा येशूने सांगीतले तेव्हा सर्वांच्या मनामध्ये चलबीचलता झाली. याचेच चित्रण त्यात आहे. अनेकांच्या मते येशूच्या उजव्या बाजूस शिष्य जॉन नसून एक स्त्री मेरी मेग्दलेन आहे. येशूचा नंतर घात होतो. पण यात जॉनचा का मेरी मेग्दलेनचा प्रमुख हात आहे, खरोखरच मेरी मेग्दलेन तेथे होती का या लीओनार्डोच्या कोड्यावरच “दा विन्ची कोड” कादंबरी व चित्रपट तयार झाला.

3. सुमारे ५००० कोटी रुपये विमा असलेले मोना लिसा चित्र लीओनार्डोने कधीच विकले नाही.

मोना लिसा हे जगातील सर्वात प्रसिद्ध चित्र आहे यात वादच नाही. परंतु हे चित्र त्याने ज्याने मागणी केली होती त्याला कधीच विकले नाही. तो सतत मोनालिसा मध्ये काही न काही बदल करत असायचा. कदाचित चित्र अधिक चांगले करायचा त्याचा प्रयत्न असेल वा चित्रातील व्यक्ती कोण आहे याचा जगाला सुगावा लागू नये याचाच तो प्रयत्न करत असेल असेही वाटते. काहींच्या मते लिसा घेरार्दीनी नावाच्या एका महिलेचे ते चित्र आहे. काहींच्या मते ते लीओनार्डोचेच स्वतःचे स्त्री वेशातील चित्र आहे.
काही असायचे ते असो पण मोनालिसा आजमितीला 5००० कोटी रुपयांचा विमा असलेले महागडे चित्र बनले आहे.

4. व्हर्चूव्हीअन मॅन – रेकॉर्डब्रेकिंग चित्र

लिओनार्डोचा शरीरशास्त्राचा अभ्यास पुढे त्याला चित्रांतील बारकावे रेखाटायला उपयोगी पडला. तो इतका तज्ञ झाला की दा विंचीची प्रगती पाहून त्याचे गुरु व्हेरोच्ची यांनी चित्रे काढायची सोडून दिले. लिओनार्डोला रेखाटनाची आवड होती. त्याने रेखाटलेले व्हर्चूव्हीअन मॅन रेखाटन हे जगातले सर्वांत जास्तवेळा प्रकाशित झालेले चित्र आहे. एका पुरुषाच्या देहाची प्रमाणित आकृती या चित्रात आहे. हे चित्र इतके प्रसिद्ध आहे कि इटलीच्या 1 युरो या नाण्यावरसुद्धा हे चित्र आहे.

5. लिओनार्डोने सर्वात पहिल्यांदा हेलिकॉप्टरची कल्पना मांडली

वाचायला विचित्र वाटेल पण हे सत्य आहे कि विन्चीने त्याच्या रेखाटणाच्या वहीमध्ये अनेक आकृत्या ज्या काळाच्या पुढील कल्पना होत्या त्या मांडल्या. यामध्ये यंत्रमानव होते, सौरशक्तीवर चालणारी यंत्रे होती, कॅलक्यूलेटर होता इतकेच नाही तर एका हेलिकॉप्टरची कल्पनापण होती. परंतु या काळाच्या पलीकडल्या कल्पना तत्कालीन लोकांना जणू मानवल्याच नाहीत आणि या सर्व कल्पना आणि रेखाटणे त्यानंतर १५० वर्षे धूळ खात पडल्या. नंतर संशोधक आमोनटोनने घर्षणाचा सिद्धांत मांडताना १५० वर्षापुर्वीच्या लिओच्या मतांचा वापर केला. लिओचा व्हेनिस शहर शत्रूपासून वाचावायचा प्लॅन खर्चिक आहे म्हणून वापरला गेला नाही परंतु तशाच प्रकारची शस्त्रे नंतर आधुनिक युद्धात वापरली गेली. यावरूनच लिओनार्डो जगाच्या फार पुढे होता हे लक्षात येते.

691 total views, 1 views today