महिना अखेर आल्यावर पैशाची चणचण भासणे हे अनेक लोकांना नको नको वाटणारा प्रसंग. पैशाचे नियोजन करणे ही एक काळाची गरज बनत आहे. परंतू, आपणच केलेल्या काही आर्थिक चूका उदा. नको तेवढा खर्च करणे वा कर्ज काढणे इ. आपणास अडचणीत आणतात. म्हणतात ना चादर बघून पाय पसरायला पाहिजेत. परंतू चुका करणे हा मानवी धर्म आहे असे अनेकांना वाटते. ‘स्मार्टदोस्त’ ने अशाच ५ आर्थिक चूकांची यादी केली आहे, ज्या तूम्हाला गरीब बनवू शकतात.

१) मिळकती पेक्षा जास्त खर्च करणे :

बर्‍याच लोकांना उगाचच किरकोळ गोष्टींवर खर्च करण्याची सवय असते. उदा. फस्ट डे फस्ट शो सिनेमा पाहणे किंवा घरूनच जेवणाची ऑर्डर देणे इ. हे खर्च सुरूवातीस छोटे छोटे असतात परंतू कालांतराने ही सवय तुम्हाला तुमच्या मिळकती पेक्षा जास्त खर्च करावयास शिकवते. जगातील दोन नंबरच्या श्रीमंत व्यक्तीने म्हणजे वॉरन बफेंनी मिळकतीतील काही टक्के जरूर सेव्हींग करा तरच वाचाल असा सल्ला जगाला दिला आहे.

२) पैसे खर्च करण्याचे प्लॅनींग नसणे :

महिन्याच्या सुरूवातीसच किंवा वर्षांच्या सुरूवातीस भविष्यात होणार्‍या खर्चाची यादी आणि त्यासाठी करावी लागणारी जुळणी, याचे सरासार प्लॅनिंग करा. त्या प्लॅनिंग मध्ये सेव्हींगचा पण समावेश करा.

३) क्रेडीट कार्ड अवीचारी वापर :

हल्ली प्लॅस्टीक मनी (क्रेडीट/ डेबीट कार्ड इ.) चा वापर स्टेटस सिम्बॉल म्हणून केला जातो. ही सवय सूविधा म्हणून चांगली आहे परंतू आपण क्रेडीट कार्डचा रिपोर्ट बघणे अंत्यत जरूरी आहे. रिपोर्टचा अभ्यास करा आणि पहा तुम्ही स्टेटसच्या नावावर अविचारी वापर केला आहे का?

४) अती उसनवारी करणे :

पैसे मिळणार आहेत, वस्तू स्वस्त मिळते म्हणून या-ना त्या कारणांमूळे आपण कर्जावर वस्तू घेत असाल तर सावधान. आपली ही सवय आपल्याला कर्जाच्या खाईत नेईल त्यातून तुमचा वाढलेला इनकम देखील सावरू शकणार नाही.

५) घर, गाडी यावर भरमसाठ खर्च करणे :

स्वप्नातील घर मिळवणे, गाडी फिरवणे हे शक्य असल्यास ठिकच परंतू घर, गाडी घेण्याच्या नादात महिन्याचे पैशाचे गणित बिघडवणे कधीही वाईट. मोठे घर, गाडी बरोबर इतर खर्चही तुमच्या पदरी पडतात. उदा. मेंटनेन्स, इंधन खर्च इ. तेव्हा इनव्हेंस्टमेंट करताना विचारपूर्वकच करा आणि रहा दूर गरीब होण्यापासून.

1,086 total views, 1 views today