सकाळी सकाळी जांभया देत उठणारे अनेक झोपाळू आपण रोज पाहतो. रात्री लवकर झोपून अगदी 10 तासांची झोप घेवूनसुद्धा “कितीही झोपले तरी झोप पुरत नाही..” अशी तक्रार करणाऱ्यांसाठी स्मार्टकडे एक गुड न्यूज आहे.

   शास्त्रज्ञांनी शरीरातील अश्या एका जनुकाचा शोध लावला आहे जो आपल्या झोपेवर नियंत्रण करतो अन कुरकुर लावतो. दोस्तहो, आपल्या आजूबाजूला अनेक फ्रेश चेहरे आपण पाहतो ज्यांनी आपल्यापेक्षां कमी झोप घेतली असते पण तरीसुद्धा ते एकदम फ्रेश असतात. सकाळ सकाळी हसत उठणारे हे हसमुख दिवसभरसुद्धा  फ्रेश असतात अन रात्री अगदी कमी झोप मिळाली तरी फ्रेशच असतात त्याचे कारण म्हणजे त्यांच्या शरीरात असणारे DEC2 नावचे जनुक.

   आपल्या शरीरातील एक मेकॅनिझम असते जे एखाद्या घड्याळासारखे काम करत असते. आपण कधी उठायचे, कधी झोपायचे असल्या वेळा ते ठरवत असते. या बॉडी क्लॉकवर प्रभाव असतो डेक2 या जनुकाचा. या जनुकामध्ये जर काही बदल झाला असेल तर अगदी कमी वेळ झोपून सुद्धा माणसाला फ्रेश वाटते. अन हे सारे नैसर्गिक असते. जगातील साधारणपणे 5% लोकांमध्ये हा जनुकीय बदल असतो अन हेच ते 5% आपल्याला मनोमनी जळवत असतात.

   पण आता ह्या न्यूजमुळे 10 तासाचीसुद्धा झोप पुरत नसणाऱ्यांना अजिबात वाईट वाटून घ्यायचे कारण उरलेलं नाही. कारण किती झोपायला पाहिजे ते बाप्पाने आपल्या शरीरात दिलेल्या डेक2 वर ठरत असते अन आपण फक्त निमित्तमात्र असतो… हे कळाले.

   जे दिवसभर फ्रेश असतात त्यांच्या शरीरात बिघाड असतो असे म्हणूया का?

392 total views, 1 views today