२० व्या शतकात सर्कस हे एक मनोरंजनाचे प्रसिध्द साधन होते. पण त्याचबरोबर शारीरिक व्यंग असणार्यांना पैसे मिळवण्याचा उपाय देखील होता. यापैकीच काही कलाकारांनी त्यांच्या करतबीने इतिहासात स्थान मिळवले. अशाच पाच जणांची ’स्मार्ट दोस्त’ यादी. छायाचित्रात दाखवला बेंजो वाजवणारा स्मिथ पण यातीलच :

 

१) जिवंत सांगाडा – आयझॅक स्प्राग

१८४१ मध्ये मॅसेच्यूसेटमध्ये जन्मलेला आयझॅक एक जिवंत सांगाडा म्हणूनच ओळखला जायचा. वयाच्या बारा वर्षापर्यंत ठीकठाक असणारा आयझॅक नंतर मात्र बारीक होत गेला. वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी तो ५’६’’उंच व फक्त एकोणीस किलो झाला. काहीही व्याधी नसलेल्या आयझॅक दोन माणसे खातील इतके खाणे खायचा परंतु शेवटपर्यंत तो सांगाडाच राहीला व सर्कसमधील एक प्रसिध्द कलाकार राहिला.

२) वाघ माणूस – स्टिफन बायब्रोस्की

संपूर्ण शरीरावर लांब केस असणारा स्टिफन दूर्मीळ अशा हायपर ट्रायकोसीस आजाराचा शिकार होता. पोलंडमध्ये जन्मलेल्या स्टिफनला जन्मत: शरीरभर एक इंचापेक्षा लांब केस होते. नंतर नंतर ते चार इंचापर्यंत लांब झाले. फक्त हाताचा व पायाचा तळवा केसमुक्त असलेला स्टिफन अमेरिकेतील व बरनम व बेली सर्कसमधील एक आकर्षणच होते.

३) पेंग्वीन गर्ल – रुथ डेव्हीस

तिसऱ्या दशकात जगभरातील सर्कसमध्ये प्रसिध्द असलेल्या ’पेंग्वीन गर्ल’ रुथला जन्मत: ’सिल लिंब’ ही व्याधी होती. तिचे दोन्ही हात व पाय विचित्र होते. त्यामुळे पेंग्वीन पक्षाप्रमाणे रुथचा आकार होता.

४) दोन डोक्याची परी – मिली व ख्रिस्टीन

मेकॉय मिली व ख्रिस्टीन (१८५१-१९१२) जुळ्या बहिणी होत्या. परंतु दोघींची शरीरे जन्मत: जुळलेली होती. दोघींना जोसेफ स्मिथने सर्कससाठी विकत घेतले. मिली व ख्रिस्टीन पाच भाषा बोलायच्या व उत्तमप्रकारे नाच करायच्या, गाणी म्हणायच्या व वाद्ये वाजवायच्या. वयाच्या ६१ व्या वर्षी मिलीचे निधन झाले व त्यानंतर काही तासांनी ख्रिस्टीन जग सोडून गेली

५) इलॅस्टीक स्किन मॅन – फेलिक्स

रबरासारखी ताणणारी त्वचा असणारा फेलीक्स (१८५८) एक अजब कलाकार होता. चेहरा, हात वा इतर भागावरील त्वचा एखाद्या च्युइंग गमप्रमाणे ताणवणारा फेलीक्स हाताची बोटेसुध्दा उलट्या दिशेने वाकवू शकायचा.

355 total views, 1 views today