“व्हॉट हॅपन्स इन वेगास, स्टेज इन वेगास” असे म्हणले जाते…

मयसभेला लाजवणारे जुगारअड्डे अन ती करोडोची उलाढाल, रात्रीचा दिवस करणारे न्यूऑन लाईट्स अन त्यातल्या त्या सुंदऱ्या.. सगळे करायचे अन वेगस्माध्येच विसरून जायचे.. स्वर्ग म्हणजे अन दुसरे काय ?

जगातील श्रीमंताची स्वप्ननगरी, कॅसिनोची राजधानी, जुगाऱ्यांचे नंदनवन असणाऱ्या अमेरिकेतील “लास वेगास” बद्दल आपल्याला कुतूहल असते. वेगासमध्ये हातात दारूचा ग्लास घेऊन तुम्ही रस्त्याने कोठेही फिरू शकता अश्यासारख्या बऱ्याचश्या गैरसमजुतीही असतात. अनेक हॉलीवूड चित्रपटातील सिन्समध्ये दाखवल्या जाणाऱ्या ह्या प्रदेशाला “sin city” (Sin म्हणजे पाप ) म्हणूनसुद्धा ओळखले जाते. त्याच वेगासच्या 5 गोष्टी ज्या तुम्हाला माहितही नसतील.. खास स्मार्ट अंदाजात.

1. xxx व्यवसायाला चक्क बंदी :

लास वेगासला दारूचा पूर असतो, जागोजागी वारांगना अव्हेलेबल असतात अन xxx अगदी कॉमन आहे असे समजून जर “जीवाची मजा करायला” तुम्ही जाणार असाल तर जरा जपून. कारण लास वेगासला सेक्स व्यवसायावर चक्क बंदी आहे. ज्या नेवाडा स्टेट मध्ये लास वेगास आहे त्या राज्यात जरी हा व्यवसाय कायदेशीर आहे तरी “क्लार्क कौंटी” (Clark County) ज्याला लास वेगास असेही संबोधिले जाते तेथे या बिझिनेसला बंदी आहे. नेवाडा राज्याच्या कायद्यात सात लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागासाठी ही बंदी आहे अन त्यात लास वेगासही त्याच्या कमी लोकसंख्येमुळे आहे.

हा.. पण कायद्याला पळवाटा असतात… वेगासला लागून असलेल्या हाताच्या अंतरावरील गावांचे पॉप्यूलेशन सातलाखापेक्षा कमी आहेना…

2. जुगारामुळे वाचली फेड एक्स (FedEx) कंपनी :

44 बिलियन डॉलरची फेडरल एक्सप्रेस ही 2015 ची जगातील एक प्रचंड मोठी कंपनी वेगासमधील जुगारामुळे वाचली हे वाचले तर आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. कंपनीच्या मालकाला, म्हणजे फ्रेडरिक डब्ल्यू स्मिथला 1970 च्या सुमारास दिवाळखोरीत जायची वेळ आली. जेव्हा कंपनीकडे फक्त 5000 डॉलर्स शिल्लक राहिले तेव्हा हे उरलेले पैसे घेवून फ्रेडरिक चक्क लास वेगासला गेला अन त्याने ते पैसे जुगारात लावले. दोन दिवसात त्याचे 27000 झाले. त्या पैश्यात त्याने पुन्हा काम सुरु केले अन आज ती जगातील एक श्रीमंत कंपनी आहे. म्हणतात ना देता है तो वो छप्पर फडके देता है.

“वॉल स्ट्रीट इंस्यानीटी” च्या समंथा ली यांच्या लेखात दिलेली ही माहिती.

3. वेगासच्या हॉटेलमध्ये कोणीच मरत नाही :

वेगासवर मरणारी अन तेथे आयुष्यात एकदा तरी जावे असे वाटणारी माणसे कोट्यांनी. म्हणजे बघा 2014 या फक्त एका वर्षात चार कोटी टूरिस्ट तेथे पोहचले. वेगास मधील वेग वेगळ्या हॉटेलमध्ये ते वर्षभर राहिले. परंतु हॉटेलमध्ये गेलेल्या या करोडो लोकांपैकी वर्षभरात कोणीही परलोकी (म्हणजे मृत्यू) गेले नाही.. म्हणजे रुममध्ये रात्री दारू ढोसून झोपला तो सकाळी उठलाच नाही, अथवा जुगारात कंगाल झाला म्हणून त्याने हॉटेलात गळफास लावून घेतला, इ. रूममधील मृत्यूवार्ता वेगासमध्ये कोठेही ऐकिवात आल्या नाहीत. थोडक्यात काय हॉटेल रुममध्ये कोणीच मरत नाही. अन हे असे दरवर्षी होते.

कारण सोपे आहे. जर कोणत्या रुममध्ये अशी घटना घडली तर ती रूम पुढील दोन आठवड्यासाठी बंद ठेवायची असा नियम जो आहे. त्यामुळे जो मारतो तो फक्त हॉटेल बाहेर…

आता सांगा कोण आपला बिझिनेस तोट्यात करेल? काय होत असेल ते समजलेच असेल..

4. एका रूममधून 75 लाखाचा फायदा :

जर वेगासमधील हॉटेलच्या प्रत्येक रुममध्ये रोज एक दिवस रहायचे असे ठरवले तर किमान 288 वर्षे लागतील इतकी हॉटेल्स तेथे आहेत. अमेरिकेतील 20 मोठ्या हॉटेल्सपैकी 17 अन जगातील टॉप 50 हॉटेल्सपैकी 27 हॉटेल्स फक्त लास वेगास मध्ये आहेत. एका ठिकाणी इतका श्रीमंती टुरिझम बिझिनेस जगात इतरत्र कोठेही सापडणार नाही. वेगासमधील सहा किलोमिटरच्या प्रमुख रस्त्याच्या (ज्याला “दी स्ट्रीप” असेही नाव आहे) अजुबाजुला जगातील एकसे एक हॉटेल्स विथ कॅसिनो आहेत. एमजीएम, वेगास सँड, वेन (Wynn) अशी अनेक हॉटेल्स आपल्या झगमगाटासाठी प्रसिध्द आहेत. अन तशीच ती त्यांच्या कमाईसाठी सुद्धा चर्चेत आहेत. वेन हॉटेलची एक एक रूम मालकांना दरवर्षी पाउण कोटी रुपये मिळवून देतात. या हॉटेलमध्ये 2716 रूम्स आहेत अन अजून 1000 रूम्स वाढवायचा मालकांचा विचार आहे.

3716 गुणिले 75,00,000 म्हणजे किती रुपये रे भाऊ ?

5. जुगारात दीड हजार कोटीचा चुना :

फेडएक्स च्या फ्रेडरिकसारख्या अनेकांनी जुगारात जिंकलेल्या पैश्यात दिवाळी साजरी केली. पण त्याचबरोबर वेगास मध्ये जुगारात आपली दौलत घालवलेलेही अनेक. त्यामध्ये वरच्या क्रमांकावर टेरी वाटण्बे (Terry Watanabe) याचेच नाव घ्यावे लागेल. या पठ्ठ्याने 2007 या एकाच वर्षात 900 कोटी उधळले. तो जेव्हा खेळायला येणार असे लोकाना कळायचे तेव्हा त्याचा खेळखंडोबा बघायला लोक दूर दूरहून यायचे. एकूण दीड हजार कोटीचा चुना स्वतःला लावून घेतल्यावर खिशात काय कुठेच पैसे शिल्लक नसल्यामुळे व देणगीदार मागे लागल्यामुळे ह्या बहाद्दरांला पोलीस कोठडीत रहायची वेळ आली.

1,914 total views, 1 views today