जगातील सर्व देशांमध्ये जेम्स बॉंडचे नाव नवीन नाही. आपल्या धाडशीपणामुळे व चकित करणाऱ्या कारनाम्यामुळे बॉंड हा लाखो चाहत्यांचा लाडका व खलनायकांचा नंबर एकचा दुश्मन आहे. बॉंड चित्रपटातील खासीयत म्हणजे जेम्स वापरत असलेल्या अनोख्या वस्तू. त्यातीलच चमत्कारीक पाच वस्तूंचा स्मार्टदोस्तने केलेली यादी.

१) अद्रृष्य होणारी कार

ऍस्टन मॉर्टीन कार व जेम्स बॉंडचे अतूट नाते. पिअर्स ब्रॉन्सन हा नट जेव्हा बॉंड होता तेवहा अदृश्य होणाऱ्या ’ऑस्टीन मार्टीन’ कारचा त्याने वापर केला होता. कारची बॉडी म्हणजे एक स्क्रिन व आपण ज्या कारकडे ज्या दिशेने पाहतो त्या भागाचे चित्रण विशिष्ट कॅमेर्याव्दारे स्क्रिनवर पडेल अशी कल्पना.गम्मत म्हणजे बॉडच्या या काल्पनीक कारवरुन या देशात खरोखरच अदृष्य होणारा टॉवर बांधला जात आहे.आहे का नाही बॉंड आयडीया?

२) ’’सी मास्टर’’ घड्याळ

कारप्रमाणेच बॉंडला घड्याळाचेही वेड. ’’गोल्डन आय’’ या बॉंडपटात जेम्सने वापरलेलो ओमेगा घड्याळातून लेझर किरण आलेले व त्यामुळे रेल्वेडब्याच्या भिंतीना ००७ ने कापून काढले होते हे आपण पाहिलेच. गम्मत म्हणजे ’गोल्डन आय’’ पूर्वी बॉंड रोलेक्स किंवा सिको कंपनीची घड्याळ वापरायचा नंतर त्याचा ब्रँड ’’ओमेगा’’ झाला.

३) ’’लोटस इस्पीरीट’’ पाणबूडी

व्हिलनच्या भरपूर साऱ्या कार्स गुंडांनी खचाखच भरलेल्या. बॉंड आपल्या कारमध्ये पाठलाग सुरु पुढे बॉंड मागे गुंड. बॉंड पूर्ण स्पिडने गाडी चालवतो पण काय करणार समोर रस्ता संपतो व एकदम समुद्र. बॉंड खल्लास, नाही दोस्तांनो, बॉंडची ’लोटस इस्पीरीट’ गाडी पाण्याखाली सुध्दा चालते.सर्व चाके आत घेवुन पाणबुडीमध्ये रुपांतर होणारी ही ’’लोटस इस्पिरीट’’ कार एक अनोखे बॉंड हत्यार होते. पाण्याखालून मिसाइलचा मारा करुन व्हिलनचे हेलीकॉप्टर उठवल्याचाही चित्रपटात पुरावा आहे.

४) वॅलीस WA-116 उर्फ ’’लिटर नेली’’

’’यू ओनली लिव्हड ट्वाइस’’ या चित्रपटातील एकदम छोटे पण मिसाइल ने मशीन गनने लोडेड हेलीकॉप्टर म्हणजे जेम्सचे आवडते हत्यार. एका बॅगमध्ये सुध्दा मावू शकणारे हे हेलीकॉप्टर म्हणजे भविष्यातील ड्रोन विमानांची सुरवातच.

५) ’’रिंग कॅमेरा’’ व ’’ट्रिक ब्रिफ ब्रिफकेस’’

रॉजर मूर हिरो असलेल्या ’’ए विव्ह टू किल’’ मध्ये अंगठीतील कॅमेरा दाखवला होता. शटरचा आवाज न करणारा हा कॅमेरा व्हिलनची प्रत्येक हालचाल टिपून घेण्यास मदत करत होता. ’’फ्रॉम रशिया विथ लव्ह’’ या दुसऱ्या बाँडपटात जेम्सने एक ’’ब्रिफकेस’’ वापरली होती. चुकीच्या पध्दतीने उघडण्याचा प्रयत्न केल्यास विषारी वायू सोडणारी ही बॅग एक हुकमी हत्यार होते. एक रायफल, चाकू, बॉम्ब आणि २० सोन्याची नाणी मावणारी ही ब्रिफकेस बाँडच्या शत्रूंना एक धोकाच होता.

432 total views, 1 views today