वाहतूकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात का? हा बहूतांशी भारतीयांचा प्रश्‍न. न कळणार्‍या गूढ नंबरप्लेट्स, कान बधीर करणारे भोंगे आणि मिळेल त्या जागेत वाहन घूसवून पूढे जाण्याची शर्यत. या सर्व सर्कशीत वाहतूकीचे काही नियम असतात याचाच मूळी अनेक भारतीयांना विसर पडलेला असतो. म्हणूनच स्मार्ट दोस्तने वाहतूकीच्या नियमांची ही यादी केली आहे. अर्थातच नियम शिकवण्याचा दोस्तचा हेतू नसल्याने मजेशीर नियमच यादीत आहेत.

(१) जर्मनी – इंधन नसताना गाडी चालवण्यास मनाई :

इंधन नसताना गाडी चालवता येती का? हा खरा प्रश्‍न आहे. म्हणजे फक्त हवेवर गाडी चालली किंवा हवा खावून गाडी चालल्याचे कोठे बघण्यात नाही. भविष्यात कदाचित तशी वेळ येईलही कारण, भाववाढ. परंतू टाकीत कमी इंधन असताना हायवेवर गाडी चालवायला जर्मनीमध्ये बंदी आहे. हायवेवर टाकी फूल्लच पाहीजे…

(२) रशिया – अस्वच्छ गाडी चालवण्यास दंड :

खरे पाहिले तर गाडी चकाचक ठेवण्याची आपल्याला भारी हौस. परंतू काही आळशी महाभाग दिवसें दिवस गाडीवरची धूळ देखील पूसत नाहीत. अशा महाभागांसाठी रशियामध्ये खास नियम आहे. अस्वच्छ गाडी चालवायची नाही. गाडी धूतली नाही तर कदाचित पोलिस धूत असतील… मालकाला.

(३) सायप्रस – गाडी चालवताना खायचे वा प्यायचे नाही… पाणी सूध्दा :

एका हातात सूकाणू दुसर्‍या हातात मोबाईल, तोंडात गुटखा. या तयारीतच गाडी चालवणारे आपण बघतो, किंवा हे तिन्ही एकदम येत असेल तरच कदाचित भारतात लायसेंन्स मिळते असा काहींचा समज. असो, सायप्रस या देशात गाडी चालवताना फक्त गाडी चालवायची असाच नियम. म्हणूनच काही खायला वा प्यायला संपूर्ण बंदी, अगदी पाणी देखील वर्ज्य.

(४) ओहीयो – चौकात विनाकारण गाडी फिरवणे गुन्हा :

शायनिंग करायला स्वत:ची, मित्राची, शेजाऱ्यांचीसुध्दा गाडी घेवून फिरवायला अनेकांना आवडते. त्याच-त्याच चौकात घिरट्या घालून रस्ता अगदी गूळगूळीत करण्यात काही औरच मज्जा, परंतू ओहीयोमध्ये एकाच चौकात गाडीवरून सारख्या चक्करा मारणे अपराध आहे. जर तुम्ही १०० पेक्षा जास्त वेळा चक्कर मारताना सापडला तर दंड होणारच असे समजा. पण स्मार्टदोस्तचा प्रश्न असा की चक्करा १०० झाल्या का नाही हे कोण ठरवणार? असो नियम म्हणजे नियम. हो ना?

(५) कॅलीफोर्नीया – गाडीतून गोळ्या मारायला बंदी :

अनेकांना शिकारीचा भारी नाद. ओपन जीप, डोक्यावर हॅट, हातात दूबारी (रायफल) घेवून रात्रीची शिकार करणारी भरपूर मंडळी आपण बघतोच. वाघ नाहीच पण किरकोळ शिल्लक राहिलेले प्राणी मारून त्यांच्या आठवणी भूसा भरून ठेवायची खानदानी हौस आजही आहे. असो, शिकारीशी संबधीत एक वाहतूक नियम कॅलीफोर्नीयामध्ये आहे. येथे गाडीतून बंदुकीने गोळी मारायची बंदी आहे. पण त्यालादेखील अपवाद आहे. जर तुम्ही व्हेल माश्याची शिकार गाडीतून गोळी मारून करणार असाल तर ओ.के. समुद्रातील व्हेलमासा मारायला गाडी घेवून जायचे? आणि बंदूकीने व्हेलमासा मारायचा? अजबच.

2,965 total views, 2 views today