दोस्तहो, अॅ्पलनं आपल्या मेगा लॉचिंग इव्हेंटमध्ये आयफोनच्या 10व्या वर्धापनदिनानिम्मित आयफोन-X लॉन्च केला. आयफोन 8 अन आयफोन 8 प्लस नंतर अॅनपलनं एकदम 10व्या वर उडी मारली. आयफोन 9 च काय असा प्रश्न आला तर उत्तर एकच. आयफोन 9 नसणार. जसा पहिल्या आयफोन iPhone (1st generation) नंतर बाजारात एकदम आयफोन 3 आला होता. दुसऱ्याला जसे गाळले तसे नवव्यालाही.

असो, Apple phone ‘आयफोन’ मुळात इतर मोबाईल फोनपेक्षा महागडा; पण जगात आयफोनबद्दल आकर्षण फार. सुविधांमुळे जगभरात सुमारे 70 कोटी जनता आयफोन वापरते. हा आकडा मार्चपर्यंतचा. त्यापैकी सुमारे 22 कोटी लोक सेकंड हँड आयफोन वापरतात. आधीचा आयफोन विकून नवा घेणाऱयांचे प्रमाण अॅपल ग्राहकांमध्ये सातत्याने जास्त राहिले आहे. दोस्तहो, आज आयफोन-X ची माहिती घेवून स्मार्ट आलाय.

कंपनीच्या मते आयफोन-X मध्ये 5.8 इंचाचा एचडी सुपर अमोलेड ऑल स्क्रीन डिस्प्ले आहे, होम स्क्रीनची जागा टॅप टू वेकअप हे विशेष फिचर घेणार आहे. फेस आयडी फिचरमुळे फोन लॉक/अनलॉक करता येणार आहे. मशीन लर्निंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय. यामुळे वय वाढलं तरी शरीरात बदल झाला तरी फोन लॉक/अनलॉक करण्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत असे कंपनीनं स्पष्ट केलंय.

फेस आयडी असणारा हा स्मार्टफोन कुणीही हॅक करू शकणार नसल्याचा दावाही अॅहपलनं केलाय. फेस आयडी अॅणपल पे या डिजीटल पेमेंट सिस्टिमशी ऑप्टिमाईज्ड करण्यात आलंय.आयफोन-एक्स या मॉडेलमध्ये अॅपनिमोजी म्हणजेच अॅेनिमेटेड इमोजी फिचर असणार आहे. 12 मेगापिक्सल्सचे ड्युअल रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. यातला एक कॅमेरा f/1.4 तर दुसरा f/2.4 अपार्चरच्या सोबत असेल. विशेष म्हणजे हे दोन्ही कॅमेरे रिअरवर आडवे नाही तर उभे आहेत.

ह्या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा कडा कमी असलेला डिस्प्ले, बेझेललेस डिस्प्लेची वाढती मागणी व इतर स्मार्टफोन निर्मात्यांनी (सॅमसंग,एलजी,शायोमी) आघाडी घेतल्याने शेवटी अॅपललासुद्धा बेझेललेस फोन आणावा लागला. यामुळे आयफोनचा डिस्प्ले फोनची पुढील बाजू जवळपास व्यापूनच टाकतो! केवळ इन्फ्रारेड सेन्सर, फ्रंट कॅमेरा व इतर सेन्सर यांना थोडी नाममात्र जागा जाते! होम बटन आता नसल्यामुळे स्क्रिनच्या खालच्या बाजूने वर स्वाईप केल्यास होमवर जाता येईल.

ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनचे फिचर यात आहे. शिवाय रिअर आणि फ्रंट या दोन्ही कॅमेर्यांममध्ये पोर्ट्रेट मोड आणि पोर्ट्रेट लायटिंग फिचर आहे. यामध्ये फ्लड इल्युमिनेटर, इन्फ्रारेड कॅमेरा, फ्रंट कॅमेरा, डॉट प्रोजेक्टर, प्रॉक्झीमिटी सेन्सर, अँबिअंट लाईट सेन्सर, स्पीकर आणि मायक्रोफोन हे देण्यात आलंय. फ्लेड इल्युमिनेटर या फिचरच्या मदतीने हा कॅमेरा अंधार असताना युजरच्या चेहर्यालवर प्रकाश पाडतो. म्हणजे अंधारात व्हिडिओ चॅटिंग शक्य आहे.

वायरलेस चार्जिंगचा सपोर्टसह असणारी आयफोन X ची बॅटरी ही आयफोन 7 प्लसपेक्षा दोन तास जास्त चालेल असा कंपनीचा दावा आहे. हा स्मार्टफोन 64 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आलाय. यातल्या 64 जीबी व्हेरियंटची किंमत 999 डॉलर्स (89000 रुपये) आहे, आणि हा स्मार्टफोन नोव्हेंबरमध्ये उपलब्ध होणारेय. हायर एंड 256 जीबीची किंमत 1,02,000 रुपयापर्यंत.

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

502 total views, 1 views today