श्रीमद भगवतगीतेमध्ये (9-3-27 to 36) राजा काकुदमी त्याच्या मुलीबरोबर म्हणजे रेवतीबरोबर ब्रम्हलोकात गेल्याचे लिहिले आहे. त्यावेळी ब्रम्हदेव त्यांना म्हणतो की तुम्ही केवळ एक सेकंदासाठी येथे आला आहात परंतु तिकडे पृथ्वीवर 27 त्रेतायुगे (216 वर्षे) संपली. पुढे असे लिहले आहे की रेवती पुन्हा पृथ्वीवर येते तेव्हा तिच्या नंतरच्या अनेक पिढ्या त्याकाळात जीवन जगून मृत्यू पावल्या असतात. परंतु रेवती बालवयातच असते. तिचे व वडीलाचे वय आजीबात बदलेले नसते. मृत्यूवर त्यांनी मात केली असते. व्यासमुनींनी हजारो वर्षापुर्वी जे वर्णन भगवतगीतेमध्ये केले तेच 20व्या शतकात आईन्स्टाईननी शास्त्रीय भाषेत मांडले. “अंतराळात प्रचंड वेगाने जर प्रवास केला तर शरीरावर वयाचा परिणाम होत नाही. थोडक्यात आपण म्हातारे होत नाही” याचा अर्थ प्राचीन भारतीयांना आधुनिक जगातले शोध आधीच माहित होते. इतर अनेक शोधाबद्दल असेच आहे. वाचा तर…

1. भास्कराचार्याना गुरुत्वाकर्षणाची माहिती : माजी इस्रो अध्यक्ष

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) चे माजी आध्यक्ष जी. माधवन नायर यांनी एका अंतरराष्ट्रीय संमेलनात भास्कराचार्याना गुरुत्वाकर्षणाची माहिती होती हे ठामपणे सांगितले. झाडाखाली बसलेल्या न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावायच्या 1200 वर्षे आधी भास्कराचार्यांनी 11 व्या शतकातील “लीलावती” मध्ये असे लिहले आहे की ग्रहांमध्ये अशी एक शक्ती आहे ज्याला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात व ती शक्ती ग्रहांना अंतराळात पकडून ठेवते. न्यूटन यांचा जन्म 16व्या शतकातलां. गुरुत्वाकर्षणाबद्दल अशीच माहिती “प्रश्नोपषद” ग्रंथामध्येही (3/8) आहे. आदी शंकराचार्यांनी याबद्दल विवेचन केले आहे. “पंचप्राणामधील एक प्राणाला (“आपान”) पृथ्वीमाता सदोदित आपल्याकडे खेचून ठेवते. तसे नसते तर आपला देह अंतराळात तरंगत राहिला असता…” हा प्रश्नोपषद ग्रंथ इसविसनपूर्व 6000 वर्षापुर्वी लिहला आहे अन शंकराचार्य इसविसन 800, म्हणजे तेराशे वर्षापूर्वीच.

2. प्रकाशाचा वेग वेदामध्ये :

फारच थोड्या भारतीयाना हे माहित आहे की प्रकाशाचा वेग मोजण्याचे अलौकिक कार्य प्राचीन भारतीयांनी केले होते. वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. एखादी घटना पापणी लावायच्या आत झाली तर झटक्यात झालेल्या या गोष्टीला “निमिषभरात” हा शब्द अनेकवेळा वापरतो. एक निमिष म्हणजे सेकंदाचा एक दशांश भाग. प्रकाशाचा वेग हा अर्ध्या निमिषात 2202 योजने. “योजना” म्हणजे 9.06 मैल. अन अर्धा निमिष म्हणजे सेकंदाचा एक दशांश वेळ. दोस्तहो जर गुणाकार केला तर येणारी संख्या अन आधुनिक जगाने शोधलेला प्रकाशाच्या वेग यामध्ये काही फार फरक नाही.

3. पृथ्वी चपटी नसून गोल आहे : “भूगोलः सर्वतो व्रीत्तः”

भास्काराचार्यांनी आपल्या कन्येला म्हणजे लीलावातीला ज्ञान देताना फक्त गुरुत्वाकर्षणाची माहिती दिली नाही तर पृथ्वीच्या आकाराबद्दलसुद्धा कल्पना मांडली. ते म्हणतात “ पृथ्वी आपल्याला सरळ आहे असे वाटते पण जे दिसते तसे नसून पृथ्वी एक मोठा गोल आहे.” हे समजवताना त्यांनी लिहले आहे की जर आपण एक प्रचंड मोठा गोल रेखाटला अन त्याच्या परीघाचे निरीक्षण केले तर आपणास ती एक सरळ रेषाच दिसते. परंतु ती सरळ रेषा गोलाचाच भाग असते. ऋग्वेदामध्ये (1.33.8) “चक्रनासः परीनाहम पृथिव्यां” म्हणजे “मनुष्य पृथ्वीच्या परीघावर राहतो…” याचा अर्थ त्यांना पृथ्वी गोल आहे हे माहित होते तर.

4. पृथ्वी सूर्याभोवती फिरते : ऋग्वेद

सूर्यमालेतील गृह सूर्याभोवती फिरतात असे मत कोपर्निकसनी 1453 साली मांडले जे जगणे फेटाळून लावले. त्यानंतर गॅलीलीओने सन 1632 मध्ये त्याच री ओढली अन लोकांचा रोष ओढवून घेतला. जगाने त्याला ठार मारले परंतु पृथ्वी सूर्याभोवती फेर्या मारते हे नंतर जगाने मान्य केले. आता जरा हे वाचा. ““सूर्य त्याच्या आकर्षण शक्तीने पृथ्वी आणी आवकाशांतील इतर गृह ताऱ्यांना पकडून ठेवतो” ऋग्वेदाच्या 3.5.59.1 भागातील चक्राकार सूर्यमाले बद्दलच्या या ओळी तुम्हाला चक्रावून ठेवतात. याचा अर्थ पुराणकाली भारतीयाना सूर्यमाला व त्याचा मध्य सूर्य हे केव्हाचेच माहित होते.

5. न्यूटनच्या शोधाआधीचा लघु गुरु न्याय :

न्यूटन यांचा लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हीटी असे सांगतो की सर्व वस्तूंमध्ये आकर्षण असते व ते त्यांच्या वस्तूमान व अंतरावर अवलंबून असते. म्हणूनच मोठ्या वस्तूमानाचीची पृथ्वी किरकोळ वस्तूमानाच्या माणसाला पकडून ठेवते. पण हेच तर हजारो वर्षापुर्वी आर्यभट्ट यांनी आपल्या “लघु गुरु न्याय” मध्ये मांडले होते. लघु म्हणजे लहान व गुरु म्हणजे मोठा. “लहान वस्तू मोथ्या वस्तुमानाच्या वस्तू भोवती आकर्षित होवून फिरतात, जणू एखाद्या गुरु भोवती त्याचे शिष्य” तर दोस्तहो असे अनेक शोध जे आपण आधुनिक जगाने लावले असे छातीठोकपणे सांगतो ते खरेच तसे आहे का ही एक शंकाच. बघाना शाळेत आपण “भूगोल” हा विषय शिकलो. भूगोल हा संस्कृत शब्द हजारो वर्षांपूर्वीचा. भू म्हणजे “भूमी” अन ती गोल आहे हे त्यांना माहितच होते. हे कसे?

779 total views, 1 views today