अनुष्का शर्माचे ब्रेकअप सॉंग मध्यंतरी फारच गाजले. “ये दिल है मुश्कील” या चित्रपटात आपला रणबीर अन अनुष्का कोणत्यातरी क्लबवजा जागेत डान्स करत “मैने ब्रेकअप किया..” असे खुलेआम सांगतात. बरे वाटते..पण खरच इतके का हे सोपे असते?

असो.. मिलना बिछडना ये तो होता रहेगा. आयुष्यात सर्वच गोष्टी मनासारख्या होतील याची कोणी गॅरंटी देवू शकणार नाही. पण हो स्मार्ट त्याच्या लेडी वाचकांना ब्रेकअप मधून सावरायचे कसे त्या टिप्स मात्र नक्की देवू शकतो. जेन्ट्स वाचक पण आपल्या लेडी मित्राच्या दुसऱ्या जेन्ट्स बरोबर झालेल्या ब्रेकअप नंतर ह्या टिप्सचा वापर करू शकतो.

आजकाल सारे झटपट मिळवण्याच्या घाईमध्ये संयम ही गोष्ट कमी होत चालली आहे. प्रेम आणि आकर्षण यामधील पुसट रेषा ओळखता न आल्याने सारीच रिलेशनशिप्स टिकतात असे होत नाही. प्रेमाचा बुडबुडा फुटला की ब्रेकअप्स होण्याचे प्रमाण अधिक आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तीचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांना सावरणे गरजेचे असते. मुली अनेकदा ब्रेकअपनंतर मानसिकदृष्ट्या कमजोर होतात. म्हणूनच मैत्रीवर परिणाम होऊ न देता तुमच्या मैत्रिणीला Break Up मधून बाहेर काढताना याचा उपयोग होवू शकतो.

1. तिच्या “एक्स”बद्दल वाईट बोलू नका :

ब्रेकअपनंतर तुमच्या मैत्रिणीचा त्रास बघून तिच्या बॉयफ्रेंडबद्दल तुमच्या मनात राग, चीड उत्पन्न होऊ शकते. परंतू त्या भावना तुमच्या मैत्रिणीसमोर बोलू नका. त्यामुळे तिला होणारा त्रास अधिक वाढू शकतो. तसेच त्याच्या चूकांबद्दल, वागणूकीबद्दल किंवा घरच्यांबद्दल कोणतीही थेट टिप्पणी करू नका. कारण अनेकदा ब्रेकअपनंतरदेखील मुलींच्या मनात त्याच्याबद्दल काळजी असू शकते. ब्रेकअप मधून बाहेर पडणे हे लगेचच शक्य नसते. तेव्हा कलाने घ्या. तुमच्या त्याच्याबद्दलच्या वाईट कॉमेंटसचा चुकीचा अर्थ घेतला जावू शकतो.

2. शांतपणे ऐकून घ्या :

ब्रेकनंतर दुखावलेली व्यक्ती मोकळी होणं गरजेचे आहे. त्यांच्या मनातील राग, भावना त्यांना मोकळेपणाने बोलायची संधी द्या. अशावेळी त्यांना उपदेश करण्यापेक्षा  त्यांच्या मनातील भावना, मत जाणून घेण्यासाठी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करा. मन हलके झाल्यानंतर साऱ्यांच गोष्टी पुन्हा सुरळीत होण्यास मदत होते. तुमच्या जवळच्या व्यक्तीला या नाजूक ट्प्प्यावरून बाहेर काढताना विशेष खबरदारी घेणेदेखील आवश्यक आहे. मानसोपचार तज्ञांच्या मते रडणे राग अन दुखः कमी करण्यासाठी मदत करते. जर तिला तुमच्यासमोर अश्रुंना वाव द्यायचा असेल तर शांतपणे तसे होवू  द्या.

3. मन दुसरीकडे गुंतवण्याचा प्रयत्न करा :

ब्रेकअपनंतर तुम्ही भेटल्यावर सतत जुन्या रिलेशनशीपबद्दल बोलत राहण्याला काही मर्यादा ठेवा. मन हलके करण्यासाठी बोलणे ठीक आहे. परंतू सतत त्यामध्ये गुंतून राहू नका. तुमच्या मैत्रिणीचे मन दुसरीकडे गुंतवण्यासाठी प्लान करा. आवडत्या ठिकाणी जेवायला जा, फिरायला जा. तुम्ही तिचे भले चाहाणारे फ्रेंड आहात अन “अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड” हे लक्षात असू द्या. पॉझीटीव्ह थिंकिंगच्या व्हिडीओज, पुस्तके आपल्या मैत्रिणीला जरूर भेट द्या.

4. विनाकारण सल्ले देणे टाळा :

कोणतेही नाते हे त्या दोन व्यक्तींवर अवलंबून असते. त्यावर तिसऱ्या व्यक्तीने निर्णय घेणे काहीवेळेस धोक्याचे ठरू शकते. कारण तुमचा हेतू जरी चांगला असला तरी जीवनाकडे बघण्याचा तुमचा अन मैत्रिणीचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. म्हणूनच तुमच्या मैत्रिणीने समोरून विचारल्याशिवाय कोणताही सल्ला देऊ नका. त्याऐवजी तुम्ही ब्रेकमधून बाहेर पडताना मदत करा. ‘एक गेला तर दुसरा येईल’, ‘त्याच्यापेक्षा चांगले खूपजण अजून आहेत’ असे डायलॉग मारू नका. तुमच्या अशा बोलण्याने त्या अधिक दुखावण्याची शक्यता असते. तसेच ब्रेकअपनंतर तुमच्या मैत्रिणीला समजवताना खोचक टीपण्णी किंवा डायलॉगबाजी टाळा. ती एका कठीण परीस्थितीतून जात आहे अन तो त्रास तिलाच जास्त होतोय हे जाणून घ्या. तुमच्या लिमिट्स क्रॉस करू नका.

5. त्याच्याशी पुन्हा संपर्क करणे टाळा :

आपले मनात विचार “बंद-चालू” करण्यासाठी असा कोणता स्वीच नाही. त्यामुळे ब्रेकअपनंतरही आठवण येऊ शकते. अशावेळी पुन्हा संपर्क टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा सोशलमिडियाच्या मार्फत हा एकमेकांच्या संपर्कात राहणे टाळता येत नाही. परंतू शक्यतो संपर्क टाळण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगा. त्याच्या फेसबुक पेज वा व्हॉटसअप पोस्ट्स बघणे टाळण्याचा सुझाव द्या. इतर सोशल नेटवर्क ग्रुपमधून जमले काही काळासाठी का होईना तरी बाहेर पडता येते का ते पाहण्यास सुचवा. ब्रेकअप गाण्यामध्ये अनुष्का म्हणते “कुछ दिन तो रोना धोना बम्पर किया और फिर डिलीट उसका नंबर किया.. आंसू जो सूखे, सीधा पार्लर गया पार्लर में जाके शैम्पू जमकर किया.. वा क्या बात है..
असो हे झाले गाण्यातले. असे शक्य नसेल तर धीराने सोशल मिडीयाला सामोरे जायला मदत करा.

दोस्तहो.. आशा आहे कोणाच्या आयुष्यात असे प्रसंग येऊ नयेत. पण आले तर स्मार्ट टिप्स जरूर लक्षात ठेवा. तुमच्याकडे काही  नवीन टिप्स असतील तर जरूर कॉमेंटमध्ये सुचवा.

2,075 total views, 1 views today