मसालेदार लोकांचा देश म्हणून प्रसिध्द असा आपला देश. इथले लोक मसालेदार पण मसालेपण मसालेदार. नानावीध नावाच्या, आकाराच्या, वासांच्या, अन चवीच्या मसाल्यांच्या प्रकारांनी जगाला वेडावून सोडणारा आपला देश. अनेक गोष्टी अन भानगडींना तीखट मिठ लावून चर्वण करणारे आपण (स्मार्ट) मसालेदार पदार्थही तितक्याच आवडीने भक्षण करतो. आज अशाच एका तिखट विषयावर जी माहिती गोळा केलीय ती टेबलवर आणतोय.

दोस्तहो, लवंगी मिरची म्हटले की डोळ्यासमोर येतो तो तिचा तिखटपणा, तिचे ते सडसडीत रूप अन नितळ कांती…. होय ना?

तर ही आपली लवंगी जगातली सर्वात तेज तर्रार तिखट अशी माझी समजूत होती. पण नेटवर तर कोणा एका कॅरोलीनाबद्दल जेव्हा मी वाचले तेव्हा माझे तोंडच कोरडे पडले. कारणही तसेच आहे. म्हणजे बघा जगातील दहा तिखट मिरच्यांमध्ये आपली “ही” कोठेच नाही.

मिरचीमध्ये किती प्रमाणात capsaicin नावाचा घटक आहे त्यावर तिचा तिखटपण अवलंबून असतो. त्याला SHU या प्रमाणात मोजले जाते. आपल्या लवंगीमध्ये साधारणपणे 2000 SHU असते. अन दोस्तहो ही जी कॅरोलीना आहे तिच्यात 20,00,000 SHU असतात. म्हणजे लवंगीपेक्षा एक हजारपट तिखट ही कॅरोलीना… म्हणजे आग डोंबच.

असो, ही परदेशी कॅरोलीना दिसायला काहीतरीच आहे… आपली देशी “लवंगी” च खास…हो..ना?

354 total views, 1 views today