भारतात प्रमुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे तीन सिझन असतात. त्यातही हल्ली उनपावसाळा, पाउसहिवाळा, उष्णहिवाळा, हिवपावसाळा असे डबल धमाल कॉम्बो सिझनही असतात. सध्या उन्हापाववाळा असा ट्रिपल कॉम्बो सिझन ज्या मध्ये सकाळ सकाळी अंघोळीच्या वेळी नभातून पाऊस, लगेचच नंतर कपडे कडक वाळवण्यासाठी सुरजमामाचे कडक आगमन व त्यामुळे तापलेल्या डोक्यासाठी लगेचच हिवाळ्यासारखी थंडी. हे सगळे अनऑफीशियल, लगे लगेच. पूर्वी सारखे तीन चार महिने ब्रेक नाही. सगळे इस्टंट. असो विषय तो नाही. या सगळ्या सिझन मध्येच लग्नाचा सिझनपण आला आहे. आणि लग्न म्हणजे हनिमून पण आलाच. तर या ऑफीशियल उन्हाळ्यात हनिमूनला भारतात कोठे कोठे जावू शकतो याची स्मार्टदोस्तने यादी केली आहे. त्यासाठी नेटवरून ऑफीशियल माहिती काढली आहे.

1. अंदमान :

नितळ शांत सागर, धुंद करणारे किनारे, पाण्यातील खेळ अन पर्यटकाना प्रेमात पडणारी रिसोर्ट्स. अन हे सारे खिशाला परवडणाऱ्या पैशात. तीन महिने आधी बुक केले तर माणशी 20 – 25 हजारात 5-6 दिवस सर्व जग विसरून तुम्ही अंदमान साजरा कार शकता. हॅवलॉक, एलेफंटा, नील अशी बेटे तुम्हाला मोहवून टाकतीलच पण सुरक्षित सागरात विहार न विसरता येण्याजोगा.

2. लेह लडाख :

पृथ्वीवर उतरलेला स्वर्गाचा एक छोटासा तुकडाच जणू. हिमालयातल्या पर्वतरंगातील एक अप्रतिम ठिकाण. “मून लँड”, “छोटा तिबेट” व “लास्ट शांग्रीला” या नावानेसुद्धा ओळखला जाते. निसर्ग संपत्तीने नटलेल्या या भागात एक स्वर्गीय जादू आहे. सुंदर तलाव, बहारदार वनराई अन साथीला चमकदार पर्वतरांगा. खरोखरच स्वर्गीय. वेळ उरलाच तर बघण्यासाठी शांती स्तूप, लेह पॅलेस, सिंधू घाट अशी मानवनिर्मित अनेक सुंदर ठिकाणे. साधारण एका कपलला 50-55 हजार रुपयामध्ये आठवड्याचे ट्रीप पॅकेज मिळते.

3. केरळ :

हिल स्टेशन पासून किनाऱ्यापर्यंत सर्व काही जेथे मिळते ते केरळ. कडे कपाऱ्याचे वर्केला तुमच्यातल्या साहसीपणाला आव्हान देईल तर मुन्नारच्या रिसोर्ट्स मधून दिसणारे कॉफीचे मळे तुम्हाला एक वेगळीच तल्लफ आणेल. अल्लेपी अन कुमारकोम चे बॅकवॉटर व त्यातल्या टुमदार बोटी एका वेगळ्याच विश्वात तुम्हाला नेईल तर कोवालमचा फेसाळणारा किनारा तुमच्यातील मस्ती एका वेगळ्याच लेवलला नेईल. आयुष्यातील दोघातील ते सोनेरी क्षण भरभरून एन्जॉय कराल केरळमध्ये.

4. मनाली :

हनिमून म्हणजे कुलू मनाली असे समीकरण गेले कित्येक वर्षे भारतीय मनात रमलेले आहे. अन मनात रमलेले हे मनाली ठिकाण खरोखरच मधुचंद्रास एक उत्तम ठिकाण आहे. पीर पंजाल पर्वत रांगा, श्वास रोखून धरायला लावणारा धौलाधर चा नजारा. हृदयाचे ठोके हलवणाऱ्या साहसी खेळाची मालिका एक अमेझिंग वातावरणात हनिमून व्हावा वाटत असेल तर विश्वासाने जा मनालीला.

5. दार्जीलिंग :

पृथ्वीवरील एक जादुई ठिकाण. हिरवीगार गर्द वनराई, अनोखी फुलझाडे अन वावरणारे वन्य प्राणी, पक्षी. तुम्ही एका अविश्वसनीय प्रदेशात आहात असे जाणवून देते. म्हणूनच कदाचित दार्जीलिंगला हिलस्टेशन्सचा राजा असेही ओळखले जाते. मस्ती आणारी हवा, कांचनजुंगा पर्वतरांगातील उतरते चहाचे मळे, खेळण्यातील असावी अशी टॉय ट्रेन सगळे काही परफेक्ट. जास्तच साहस दाखवायचे असेल तर ट्रेकिंग, रिव्हर राफ्टींगची अशा खेळांची मजा जरूर लुटा.
चला तर बघुया “कोठे कोठे जायचे हनिमूनला… लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा….बेंगलोर, गोवा अन काश्मीरला…”
(अभीनेत्री रेखांनी या मराठी गाण्यावर काय सुपर्ब अदाकारी सादर केली होती.)

813 total views, 1 views today