विज्ञान आणी तत्वज्ञान याचा सरळ संबंध लावणे कठीण. म्हणजे एकामध्ये पुराव्यांती दाखवले जाणारे सत्य तर दुसरीकडे महान ऋषी मुनींनी हजारो वर्षापूर्वी मिळवलेले अन जगापुढे मांडलेले ज्ञान, ज्याचे संदर्भ अन पुरावे शोधणे क्लिष्ट. जागतिक इतिहासात आपल्या भारत देशातील समृध्द अन प्रगत तत्वज्ञानाने एक अनोखे स्थान मिळवले आहे हे आपण नाकारू शकत नाही. पौराणिक वेद अन उपनिषद म्हणजे ज्ञानाचा अमृतकुंभ. प्रगत जगात लागलेल्या अनेक शास्त्रीय शोधांचा अन उपकरणांचा उल्लेख भारतीय वेद अन उपनिषदामध्ये सापडतो हे अनेक जागतिक शास्त्रज्ञांनी ठामपणे सांगितले आहे. इतकेच नव्हे अनेक जागतिक शास्त्रज्ञ नोबेल पुरस्काराचे मानकरी, भारतीय पौराणिक ग्रंथाचे नियमित वाचन करत होते हे जगापुढे आले आहे. स्वामी विवेकानादांबरोबरच्या भेटीमुळे जगप्रसिध्द शस्त्रज्ञ निकोलस टेसला याला वेदांचा अभ्यास करावा वाटला अन त्यासाठी त्याने संस्कृत भाषा शिकली हे टेसला सोसायटीच्या वेब साईटवर स्पष्टपणे लिहिले आहे. नुसता टेसला नव्हे तर आईन्स्टाईनही वेदाचे नियमित वाचन करत होते. वाचा तर या 5 शास्त्रज्ञांची माहिती ज्यांनी भारतीय वेदांमध्ये विज्ञानाची तत्वे शोधली.

    1. अल्बर्ट आईनस्टाईन (Albert Einstein) : भौतिक शास्त्राचे नोबेल 1921

थेअरी ऑफ रिलेटिव्हीटी म्हणजे सापेक्षतेचा सिद्धांत ज्यांनी जगापुढे मांडला ते हे थोर संशोधक. E = mc2 हे जगातील सर्वात जास्त पॉप्युलर समीकरण ज्यांनी मांडले त्यांनी आपल्या मॅक्स बोर्न या मित्राला जर्मन भाषेतील पत्रात लिहिले आहे: “Es gibt keine spukhafte Fernwirkung….”

समजले नसेल तर सांगतो. ते म्हणतात “मी जादूवर विश्वास करत नाही. मी विज्ञान हेच प्रमाण मानतो..मी भगवत गीता नेहमी वाचतो” त्यांचे गीतेबद्दलचे विचार त्यांनी असे मांडले आहेत. “When I read the Bhagavad-gita and reflect about how God created this universe everything else seems so superfluous.”

रवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबर झालेल्या भेटीत विज्ञान आणी भारतीय तत्वज्ञान या बद्दलचे त्यांचे  मत अधिकच पक्के झाले.

2. निल भोर (Niels Bohr) : भौतिक शास्त्राचे नोबेल 1922

ऑटोमिक स्ट्रक्चरचा (संरचना) शोध डेन्मार्कचे निल भोरनी लावला. जगातील लहानात लहान कणाला अणू म्हणतात. त्या डोळ्यांना न दिसणाऱ्या अणूंची संरचना, प्रोटॉन अन न्यूट्रॉन भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन, ह्याचा शोध लावणारे भोर भारतीय पौराणिक ग्रंथाचे वाचन करत होते हे त्यांनी स्वतः मान्य केले आहे. भारतीय ग्रंथात अणू रेणूंच्या अस्तित्वाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल वेळोवेळी लिहिले आहे. निल भोर त्यांच्या “भोर मॉडेल”मुळे ते आज जगात अजरामर आहेत. 1922 ला त्याना फिजिक्स मधील नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यांनी एका पत्रात लिहिले आहे “I go into the Upanishads to ask questions.”- “ मी मला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे उपनिषदामध्ये शोधतो.

3. वार्नर हास्बर्ग (Werner Heisenberg) : भौतिक शास्त्राचे नोबेल 1932

न्युक्लीअर फिजिक्स मधील जर्मनीतील जानेमाने शास्त्रज्ञ. त्यांनी जटील भौतिक शास्त्र समजण्यासाठी वेदांचा कसा उपयोग होतो याबद्द्ल लिहिले आहे, “Quantum theory will not look ridiculous to people who have read Vedanta.” Vedanta is the conclusion of Vedic thought. आधुनिक शास्त्र व वेदांमधील तत्वज्ञान यामध्ये फार समानता आहे हे त्याना जाणवले होते. इतकेच नव्हे तर ते भारतात येवून रवींद्रनाथ टागोर यांना भेटले होते. टागोर यांच्याकडून वेदांमधील ज्ञानाची ओळख करून घेतली होती.

4. इर्विन श्रेदिंगर (Erwin Schrödinger ) : भौतिक शास्त्राचे नोबेल 1933

क्वांटम थेअरी आणी वेव्ह सिद्धांत ज्यांनी जगापुढे मांडला ते ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ. ज्याबद्दल त्याना नोबेल पुरस्कार मिळाला. परमाणु, उर्जा व तरंग लहरी याबद्दल त्यांनी लावलेल्या शोधाबद्दल शास्त्रीय माहित येथे देत नाही पण ते वेदांबद्दल काय लिहितात ते वाचा. ते म्हणतात… “ The unity and continuity of Vedanta are reflected in the unity and continuity of wave mechanics. This is entirely consistent with the Vedanta concept of All in One.”

पुढे जावून ते जीवनाबद्दल मुकुंद उपनिषदाच्या ओळींचाही संदर्भही देतात.

ब्रह्मैवेदममृतं पुरस्तात् ब्रह्म पश्चात् ब्रह्म उत्तरतो दक्षिणतश्चोत्तरेण ।
अधश्चोर्ध्वं च प्रसृतं ब्रह्मैवेदं विश्वमिदं वरिष्ठम् ॥ 2.2.11

आपल्या “माय विव्ह ऑफ दी वर्ल्ड” मध्ये ते लिहितात “….The only solution to conflict in so far as any is available to us at all lies in the ancient wisdom of the Upanishad” (p. 31)…

5. निकोला टेसला (Nikola Tesla) :

आधुनिक अल्टरनेटिंग करंट (AC) इलेक्ट्रिक सप्लाय उपकरणामुळे जगप्रसिध्द झालेले सर्बियन अमेरिकन संशोधक. टेसला कॉईल, वायरलेस वीज वहन, एक्सरेवर कार्य, रेडियो रिमोट कंट्रोल, ब्लेडलेस टर्बाईन अश्या अनेक संशोधनानी गाजलेले व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंदांच्या विचाराने भारलेले होते हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु विवेकानंदांच्या अमेरिकेतील तीन वर्षांच्या वास्तव्यात टेसला त्याना भेटले होते. त्यांनी भारतीय वेदांबद्दल सखोल ज्ञान प्राप्त केले.  इतकेच नव्हे तर ते पूर्णपणे शाकाहारी झाले. आपल्या उपकरणांच्या प्रात्यक्षीक दाखवताना “प्राण”, “आकाश” असे संस्कृत शब्द वापरू लागले.

विवेकांदानी आपल्या एका पत्रात टेसला वरील त्यांचा विश्वास त्यांनी या शब्दात लिहिला आहे : “Mr. Tesla thinks he can demonstrate mathematically that force and matter are reducible to potential energy. In that case the Vedantic cosmoloqy will be placed on the surest of foundations.” संदर्भ : Swami Vivekananda (Complete Works, VOL. V, Fifth Edition, 1347, p. 77).

उर्जा चराचरात भरली आहे हे भारतीय आध्यात्म जाणलेल्या टेसलांनी चकित करणारे शोध लावायला सुरु केले. विश्वातील ही उर्जा आपल्या उपकरणाद्वारे जगाला फ्रीमध्ये देण्याचा त्यांचा विचारच त्याना मारक ठरला. नोबेलपासून त्याना वंचित ठेवण्यात आले. याउपर तत्कालीन भांडवलशहांनी त्याचा खून केला अन भारतीय तत्वज्ञान अन आधुनिक विज्ञानातील एक महत्वाचा दुवा निखळला..

दोस्तहो, भारताच्या इतिहासात, पौराणिक ग्रंथात असे अनेक पुरावे सापडले आहेत जे आधुनिक जगाने मान्य केले आहे..

आपण या गोष्टींकडे कानाडोळा करतो हे दुखः दायक…

1,900 total views, 2 views today