हार्ट अटॅक हा कोणालाही आणि कुठेही येऊ शकतो. बऱ्याचवेळा हार्ट अटॅक येण्यापूर्वी तो आपल्या आगमनाची रुग्णाला अनेक लाक्षणाद्वारे जाणीव करून देतो. म्हणूनंच हार्ट अटॅकच्या नेमक्या लक्षणांबाबत स्मार्टदोस्तने गोळा केलेली माहिती कदाचित तुम्हाला उपयोगी पडेल. हार्ट अटॅक दरम्यान एक किंवा त्यापेक्षा अधिक लक्षणं आढळू शकतात. म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या मनाने काही औषध किंवा घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.

1. घाम – ह्द्याला पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनमध्ये अडथळा आल्यास त्याचे संकेत मेंदूला पोहचवले जातात. ह्द्याचे कार्य सुरळीत ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये शरीरातून घाम वाहण्याचे प्रमाण वाढते. शरीरात काही बिघाड झाल्याचा हा एक संकेत असतो. त्यामुळे हार्ट अटॅकच्या वेळेस खूप घाम येणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षण आढळतात. त्यावेळेस तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.

2.हातामध्ये, छातीमध्ये वेदना होणं – छातीच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना होणं हे हार्ट अटॅकचे लक्षण आहे. अनेक जणांमाध्ये या वेदना डाव्या हातांमध्येही पसरतात. या तीव्र वेदना इतर आजारांमध्ये आढळत नाहीत. त्यामुळे तात्काळ डॉक्टरांची मदत घेण्याचा प्रयत्न करा.

3.गरगरणे – मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याने अनेकदा हार्ट अटॅक दरम्यान चक्कर येते. हृद्याचे स्नायू अधिक कमजोर झाल्यास शुद्ध हरपते. अशावेळी रुग्णाला anxiety attack ही येऊ शकतो.

4.पोटात वेदना होणं : अनेकदा हृद्यविकाराचा झटका की केवळ अॅ सिडीटी म्हणजेच पित्ताचा त्रास आहे. असा समज अनेकांमध्ये होतो. त्यामागील एक लक्षण म्हणजे पोटदुखी. पोटदुखीसोबतच मळमळणे, उलट्या होणं असा त्रास जाणवत असल्यास हे हार्ट अटॅकचे लक्षण आहे. हृद्यविकाराचा धोका वाढवणाऱ्या भारतीय खाद्यसंस्कृतीतील काही त्रासदायक सवयी तुम्ही बदल्यास सर्वांना नक्कीच मदत होईल.

817 total views, 2 views today