स्मार्टदोस्तच्या नवीन लग्न झालेल्या मित्राांना शुभेच्छा. आपले वैवाहीक आयुष्य सुखा-समाधानाचे जावो अशी प्रामाणीक आशा. लग्न करू इच्छिणार्‍यांना देखिल बेस्ट लक. तर लग्नानंतर हनीमूनला जाण्याचा प्लॅन करताय? स्मार्टदोस्तने जगातील रोमँटीक ५ ठिकाणांची यादी बनवलीय, एखादे ठिकाण नक्कीच ट्राय करा.

१) फीजी बेटे :

पॅसीफीक सागरातील हा बेटांचा प्रदेश. प्रत्येकाच्या बजेटप्रमाणे सूट होणारी रीसॉर्टस हे फिजीचे वैशिष्ठ. फीजीच्या शांत सुंदर बेटांवर मिळणारी हवीहवीशी वाटणारी शांतता तुम्हाला नक्कीच भावेल. येताना फीजीमधील आठवण म्हणून एखादी सुंदर वस्तू घेवून यायला विसरू नका. आणि हो फिजीचे लोक फार मनमिळावू आणि हेल्पींग नेचरचे असल्याने तुमचा एक दिवसाचा स्टे देखील अगदीच आठवणीत राहण्यासारखा होइल याची खात्री.

२) मालदीव :

भारताच्या पश्‍चिम बाजूस हिंद महासागरात असणारी ही अतिसुंदर बेटे. पोर्तूगीज, डच आणि इंग्रजांनी राज्य केलेला हा देश आता स्वतंत्र देश आहे. परंतू एैतिहासीक खाणाखूणा तुम्हाला वेगळ्याच विश्‍वात नेतील. काहीसे महागडे परंतू इतर सर्व बाबीत हनिमून साठीचे परफेक्ट डेस्टीनेशन म्हणून स्मार्टदोस्तने मालदीवची निवड केली आहे.

३) टोंगा :

पॅसीफीक सागरातील एकमेव देश जो आत्तापर्यंत कधीही कोणत्याही परकीय देशाच्या अधीपत्त्याखाली नव्हता. १७६ छोट्या बेटांचा हा समूह येथील आदरातीथ्यासाठी जगभर प्रसिध्द आहे. टोंगाटापू बेटांवर अनेक रीसॉर्टस आहेत जे तुम्हांला वेगळ्या विश्‍वात घेवून जातील.

४) जमैका :

उत्तर अमेरीकेतील दोस्तांना जरासे जवळ पडेल असे हे ठिकाण. एका विशीष्ठ कॅरेबीयन टच असलेले. जमैका तुम्हाला एका वेगळाच अनुभव देईल. पांढरीशुभ्र वाळूची किनारे, वॉटर स्पोर्टसचा थरार, नैसर्गीक जंगले ज्यामध्ये कोठेही न आढळणार्‍या पक्षांच्या विविध प्रजाती आणि प्राणी समूह. भूतलावरील एका स्वर्गात गेल्याचा अनुभव जमैका देईल.

५) लँगकावी :

जगभरातील प्रवाश्यांचे आकर्षण असलेला देश म्हणजे मलेशीया. या देशाबद्दल सांगावे ते थोडेच. पण स्मार्टदोस्त आज मलेशिया मधील लँगकावी या हनीमून डेस्टीनेशन बद्दल बोलतोय. निसर्गप्रेमी युगूलांसाठी लँगकावीकडे देण्यासारखे खूप काही आहे. सुंदर पक्षी, मनमोहक फूलझाडे , जंगल वॉकचा अनुभव, खूप सार्‍या या गोष्टी लँगकावीला परफेक्ट जंगल बिच हनीमून डेस्टीनेशन बनवतं. तर मग काय ?

शूभस्य शिर्घम!

651 total views, 2 views today