एखादी चांगली मैत्रिण असावी जी तुमचे सुख व दु:ख शेअर करु शकेल असे तुम्हाला वाटत असेल पण तशी मैत्रिण नसेल तर ’’स्मार्ट दोस्त’’ तुम्हाला नक्की मदत करु शकेल. तर या आहेत टीप्स ज्या तुम्हाला गर्लफ्रेंड मिळवून देण्यास मदत करतील.

१) लोकांचा सहवास वाढवा
वेगवेगळ्या अॅक्टीव्हीटीजमध्ये भाग घ्या. जर तुम्हाला एखादा छंद असेल तर त्यावर जास्त काम करा. त्यातून तुमच्या आवडीनिवडी सारख्या असतील अशा मुलीशी आपली भेट होईल. कदाचित त्यातच एक तुमची गर्लफ्रेंड असेल.

२) प्रशंसा करा
मुलींना ज्याच्याबद्दल चांगले रिमार्क आवडतात. त्यांचे कौतुक, प्रशंसा केल्यास तुमच्याबद्दल ओढ निर्माण होईल. परंतु खोटी प्रशंसा नको. कोणतेही रिलेशन खरेपणावरच टिकून राहते.

३) चांगले दिसा, चांगले बोला
प्रत्येक मुलीचा स्वप्नातील राजकुमार एक मितभाषी, सॉफ्ट बोलणारा परंतु आत्मविश्वास असणारा असाच असतो. ड्रेससेन्सलाही फार महत्व असते. गबाळा, आपलेच खरे असे म्हणणारा बॉयफ्रेंड मुलींना नक्कीच आवडत नाही. तेव्हा बोलताना दोघांना आवडतील अशा गोष्टींवर बोला, गर्लफ्रेंडला तुमच्याबद्दल कॉन्फिडेंन्स वाटेल असे वागा.
४) विनोदाची जाण असावी
सेन्स ऑफ ह्यूमर असणारी मुले मुलींना आवडतात. वाक्या वाक्याला जोक करुन जोकर बनू नका. परंतु एकदमच सिरीयस बोलणारा मुलगा नको रे बाबा.

५) एटीकेटस पाळा
मुलींशी वागताना काही नियम जरुर पाळा. त्यांना रिस्पेक्ट द्या, मदत करा. हॉटेलमध्ये गेला तर तीला प्रथम चेअर ऑफर करा, तिच्यासाठी दरवाजा उघडा आणि दरवाज्यातून प्रथम जावू द्या.

914 total views, 1 views today