दिल तो पागल है. दिल दिवाना है….. खरचं, दिल है तो मानता नही असे म्हणत म्हणत दोन दिल कधी एकमेकांच्या प्रेमात पडतात ते कळतसुद्धा नाही. पण काही अभागी दिलांची नैया कभी इस पार कभी उस पार अशी हेलकावे खात डुबकी खाते. गैरसमजूतीने झालेल्या ब्रेकअपनंतरचे दिवस व जीवन दोघांनाही भकास असते. पण अशा दोस्तांनी हार मानायची गरज नाही. खरोखरच तुमचे प्रेम असेल आणि तुम्हाला एकत्र यायचे असेल तर स्मार्टदोस्तच्या या 5 टिप्स तुम्हाला जरूर मदत करतील. लक्षात घ्या ही काही जादू नाही तर तुम्हाला हो तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. पण म्हणतात ना… कोशिश करनेवालोंकी कभी हार नाही होती.

1. पहिले पावूल तुम्ही टाका

जर तुम्हाला तुमच्या हरवलेल्या प्रेमाची रुखरुख लागली असेल आणी तुमचे प्रेम परत मिळावे वाटत असेल तर पहिले पावूल तुम्ही टाका. तुमचा इगो आड येत असेल तर त्याला बाजूला करा आणी हात मिळवणी करा. प्रसंगी तुम्हाल सॉरी म्हणावे लागले तरी बेहत्तर. शेवटी हे तुम्ही तुमच्या प्रेमासाठी करत आहात. आणी सर्व काही गैरसमजूतीने झाले आहे हे तुम्ही जाणताच.

2. बोला… बोलते रहा….

बऱ्याचवेळा चुकीचे व अपुरे संभाषण ब्रेकअपला कारणीभूत ठरते. ब्रेकअपनंतर तर अश्या संभाषणामुळे अधिकच दुरावा निर्माण होतो. तेव्हा प्रथम बोलते व्हा. थोडे का असेना पण संभाषण असुद्या. दोघांमध्ये कम्यूनीकेशन गॅप राहू देवू नका. प्रेम कमी झाले वाटत असेल तरी मैत्री असू द्या. कदाचित तुमच्या बोलण्यातून झालेले गैरसमज समजण्यास व दूर होण्यास मदत होईल.

3. स्वतःला जाणून घ्या. कदाचित प्रोब्लेमचे सोल्युशन तुम्हीच असाल.

दोघांमध्ये कोणत्या गोष्टीमुळे दुरावा झालाय ते जाणण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या पर्सनॅलिटीचा शोध घ्या. काही वेळा व्यक्तीमत्वातील बदल पार्टनरला नाराज करू शकते. आपल्या व्यक्तीमत्वाचा आभ्यास करा. कदाचित त्यातच तुम्हाला प्रोब्लेमचे सोल्युशन सापडेल.

4. प्रेम दुतर्फी असावे लागते हे जाणा

प्रेमामध्ये एक गोष्ट फार महत्वाची – प्रेम दुतर्फी असावे लागते ही जाणीव. प्रेम चिरंतन राहण्यासाठी दोघांमध्ये प्रेम टिकवून ठेवण्याची आस असावी लागते. एकतर्फी प्रेम कधीही दुसऱ्याला आनंद देवू शकत नाही. बऱ्याचवेळा ब्रेकअप होण्यामागे एकतर्फी प्रेम हे प्रमुख कारण असते. तेव्हा दुसऱ्याला जाणा. त्यांच्या आवडी निवडी ओळखा. स्वतःची मते दुसऱ्यावर लादू नका. दोघांनीही याची जाणीव ठेवणे गरजेचे. तरच हरवलेल्या प्रेमची गाडी रुळावर येण्यास मदत होईल.

5. हरवलेल्या सुवर्णक्षणांना, आठवणीना उजाळा द्या.

त्या नेहमीच्या फेवरीट स्पॉटना दोघांनी भेट द्यायचा प्रयत्न करा. तो हॉटेलमधील कोपरा अन मित्रांची गँग सर्व काही सुवर्णमय…. हरवलेले प्रेम परत मिळवण्यासाठी त्या आठवणीना उजाळा देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. दोघांनाही त्या आठवणी अन ती ठिकाणे परत प्रेमात पडायला मदत करतील.

2,005 total views, 1 views today