“बाप्पा मोरया” चा गजर आसमंतात घुमू लागला अन भारतवर्षासहित सारे जगच गणेशमय झाले. “Bollywood’ नेदेखील आपल्या स्टाईलमध्ये उत्सव साजरा करायाला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी तर बिग बी अमिताभजींनी सिद्धीविनायकासमोर स्वतः आरती म्हटली तर रितेशने आपल्या अनोख्या  अंदाजात “थॅँक गॉड बाप्पा” रॅप सॉंग गायले जे युट्यूबवर धूम माजवत होते…. या वर्षी अमिताभ बच्चन यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले अन ट्विटरवर फोटो अपलोड केला. ते म्हणतात, “Divinity calls .. divinity blesses .. divinity be upon us .. “

संकटाला दूर करणाऱ्या या गणरायाला आपल्या घरी आमंत्रित करायची प्रथा अनेक बॉलीवूडपटू गेले कित्येक वर्षे मनोभावे पाळत आहेत. अलीकडच्या काळातील यंग आर्टिस्ट पासून गेलीकडील काळातील यंग अॅट हार्ट “एव्हरग्रीन” जितेंद्र पर्यंत अनेक या काळात आपल्या बाप्पाला आपल्या घरी आणतात. वाचा तर अश्या पाच गणेशवेड्या बॉलीवूड स्टार्स बद्दल.. Bollywood Stars Who celebrates Ganesh Chaturthi..

1. सल्लुमियाचा इकोफ्रेंडली गणेश :

दोस्तो दबंग सलमानके घर गणेश उत्सव बहुत धूम धामसे और  शानो शौकतसे मनाया जाता है. और ये पिछले एक दशकसे देखा जा रहा है. सलमानच्या बहिणीने म्हणजे अर्पिताने आपल्या घरच्यांच्या समोर जेव्हा गणाधीश गणेशाचा उत्सव साजरा करायची इच्छा व्यक्त केली तेव्हा चुलबुल पांडेने काही चुलबुल न करता आनंदाने होकार दिला. नुसताच होकार नाही तर आपल्या बांद्रेस्थित गॅलेक्सी आपार्टमेंटमध्ये गणेउत्सव साजरा करायची प्रथा सुरु केली. बॉलीवूडचे रथी महारथी अन रती लोक या दीड दिवसाच्या गणेशाचे मनोभावे दर्शन करण्यास रांग लावतात. एकदम इकोफ्रेंडली असलेल्या या उत्सवानंतर घराच्या प्रांगणात तयार केलेल्या पाण्याच्या साठ्यामध्ये श्रीच्या मूर्तीचे विसर्जन होते. त्यावेळी न गोंगाट करता ढोलताशांच्या तालावर एकदन्तासमोर नाचणाऱ्या टायगर सल्लूला बघितल्यावर बॉलीवूडच्या या सुलतानाबद्दल अप्रूप वाटते.

देवी लाला .. जय हो….

2. शाहरुख खान :

बजरंगी भाईजान प्रमाणेच बादशाह शाहरुख खानही गौरीसुताचा फॅन आहे. ह्या देव दासाचा गणेशउत्सव तो कौटुंबिक वातावरणात विदाउट मच आवाज साजरा करतो. फक्त जवळचे मित्र व खान कुटुंबातील सदस्य अत्यंत धार्मिकपणे ह्या उत्सवात सामील होतात. समुद्राशेजारी असलेल्या मन्नत बंगल्यामध्ये लंबोदराची विधिवत प्रतिस्थापना केली जाते. व उत्सव संपल्यावर बाजीगर स्वतः ओंकाराला नजीकच्या किनाऱ्यावर मुलांबरोबर जातो व विधिवत विसर्जन केले जाते.

ओम शांती ओम….

3. कपूर खानदानाचा विघ्नहरता :

कपूरांची बॉलीवूड मधील सणांवर एक अनोखीच छाप असते. Ganesh Chaturthi 2017 मी भी “आर के” स्टुडिओमध्ये होळीच्या रंगामध्ये रंगण्यासाठी चमकत्या तारे तारकांची जशी झुंड लागते तशीच गर्दी गणेशवंदनेसाठीही स्टुडीओमध्ये होती. राज कपूरांच्यापासून सुरु झालेली ही परंपरा नंतर शम्मी, ऋषी व आता ज्युनिअर कपूर रणबीर पुढे चालवत आहे. संपूर्ण खानदान प्रथमेश्वराच्या आगमन व निरोपावेळी एकत्र जमते…


4. धडकन शिल्पाचा प्रथमेश्वर :

मेंगलोरच्या शिल्पाच्या मुंबईस्थित घरीसुद्धा मंगलमूर्तीची दीड दिवसासाठी स्थापना होते. या उत्सवाचे आकर्षण म्हणजे नक्कीच शिल्पाचा मनमोहक डान्स असणार हे सांगायला नकोच. भक्तिभावाने हा उत्सव साजरा करणाऱ्या या कुंद्रा कुटुंबाच्या घरी बॉलीवूडकर मोठ्या संखेने हजेरी लावतात. गणेशविसर्जनाच्यावेळी भर पब्लिकमध्ये शिल्पा स्वतः आपले नृत्य साजरे करते तेव्हा मिस्टर राजना सुद्धा ठेका धरावा असे आपसूकच वाटते हे यु ट्यूबमध्ये स्पष्ट दिसते.

5. नाना पाटेकर :

नुसत्या मराठी मनांवर नव्हे तर समग्र जागतिक कलारसीकांना आपल्या जबरदस्त आदाकारीने मोहवून टाकणाऱ्या क्रांतिवीर नानांकडे लंबकर्णाचे 10 दिवस वास्तव्य असते. नानांची ही चतुर्भुज मूर्ती दगडूशेठ स्वरूपातील असते. एका वाहिनीच्या मते स्वतः नाना मूर्तीच्या रंगकामात लक्ष घालतो व प्रसंगी हातात ब्रश घेऊन मूर्तीची शोभा वाढवतो. आपण करतो तशीच आरास तो स्वतः करतो. नानांच्या या बुद्धीविधात्याचे विसर्जन तो दादर चौपाटीवर अत्यंत साधेपणे करणाऱ्या नानांच्या उत्सवाला नुसते बॉलीवूडकरच नव्हे तर इतर सर्व कलाक्षेत्रातील अनेक जानेमाने हजेरी लावतात.

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

598 total views, 1 views today