भारताच्या मंगळ मोहिमेबद्दल जगभरातून भारताचे कौतुक झाले अन सर्व भारतीयांची छाती आनंदाने फुलून गेली होती. भारताचा तो पहिलाच प्रयत्न होता. संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या सॅटेलाईटने सुमारे 24,92,09,300 किलोमीटर अंतर फक्त 12 रुपये प्रती किलोमीटर इतक्या कमी खर्चात पार केले अन इतिहास रचला. जगात असे करणारा तो पहिला देश ठरला. भारताने नंतर एकाचवेळी 104 सॅटेलाईट अंतराळात पाठवून आणखीन एक रेकॉर्ड केले. आज स्पेस सायन्समध्ये भारत एक नावाजलेला देश आहे.  भारतीय रॉकेट्स अमेरिकेसहित इतर अनेक देशाचे सॅटेलाईटस स्पेसमध्ये पाठवतोय. पण दोस्तहो, तुम्हाला कदाचित हे माहित नसेल, जगातील पहिले रॉकेट भारतात तयार झाले होते. नुसते रॉकेट्सच नव्हे तर भारताने  इतर अनेक शोध लावले जे जगाला वरदान ठरले.

वाचा तर  भारताने ज्या अनेक गोष्टी जगात प्रथम केल्या त्यापैकी 5 शोधांची यादी..

खरोखरच मेरा भारत महान असे तुम्ही म्हणाल.

1. 5000 वर्षांपूर्वी तयार केलेले बटन:

समुद्र शिम्पल्यापासून बटने तयार करायची कल्पना जगात प्रथम भारतीयांनी मांडली. इंडस खोऱ्यामध्ये विशेषतः मोहेंजोदारो येथे ख्रिस्तपूर्व 2000 वर्षामध्ये अशा बटनांचा उपयोग केल्याचे पुरावे सापडले आहेत. सुरुवातीला त्या बटणांचा वापर अभूषणामध्ये, माळेमध्ये ओवण्यासाठी केला गेला परंतु त्यातूनच सध्याच्या बटणांचा उगम झाला. Buttons were first used in Mohenjo-daro for ornamental purpose rather than for fastening. They were first used in the Indus Valley Civilization by 2000 BCE.

2. बुद्धीबळाचे पहिले रूप, चतुरंग :

इ.स.पुर्व 280 – 550 दरम्यान गुप्त साम्राज्यात चतुरंगाचा खेळ उदयास आला. संस्कृतमध्ये चतुरंग म्हणजे सैंन्याच्या चार डीव्हीजन्स. नंतर या खेळाचे रूप बदलत गेले आणि सध्याचा बुद्धीबळ अस्तित्वात आला. बौद्ध साधूंनी आणि सिल्क रूट व्यापार्यांनी या खेळाला अतिपूर्व देशांमध्ये नेले. पर्शियन आणि अरब साम्राज्यांनी तेथून पुढे हा खेळ युरोपला पोहचवला. मुघल साम्राज्यांनी शतरंज या नावाने हा खेळ उत्तर आफ्रिका व स्पेनपर्यंत वाढवला. अशारितीने भारतीयांनी तयार केलेला हा बुद्धीचा खेळ जगभर प्रसिद्ध पावला.

3. हिंदुस्तानचा “चाँपो” म्हणजे आजचा शाम्पू :

आजच्या शाम्पुचे मूळ रूप 16 व्या शतकात मुघल साम्राज्यात सापडते. बंगालच्या नवाबाच्या काळात डोक्याचे मालिश करण्यासाठी हे तेल (ज्यामध्ये नैसर्गिक तेल व अत्तर असते) तयार झाले. बिहारच्या शेख – दिन – मोहमद या हुशार व्यापऱ्याने इंग्रजांना प्रथम या तेलाची ओळख करून दिली. इतकेच नव्हे तर 19 व्या शतकाच्या सुरुवतीस इंग्लंडमध्ये जावून त्याने “मोहमद स्टीम अँड व्हेपर बाथ” या नावाने मालिश व आंघोळ करण्याचे सेंटर सुरु केले. स्वतःची “चम्पी” करून घ्यायला इंग्लिश लोक तेथे जायचे. हळू हळू मोहमद इतका प्रसिद्ध झाला कि जॉर्ज चौथा व विल्यम चौथा या राजांनी मोहमदला “चाँपो” (शाम्पू) सर्जन म्हणूनच अपाँटईट केले.
तर अशी आहे चम्पीच्या म्हणजे आजच्या शाम्पूच्या भारतीय जन्माची कहाणी.

संदर्भ : इन.अकॅडेमिक.रु.


4. मिलीमीटरमध्ये अंतर मोजणारी पट्टी :

शाळेमध्ये सरांनी फुटपट्टीचा वापर पाठीवर नक्षी काढण्यासाठी केलेला अजूनही अनेकांना आठवत असेल. परंतु पट्टीचा खरा उपयोग अंतर मोजण्यासाठीच असतो हे सर्वांना माहीत आहे. जगातील सर्वांत पहिली अंतर मोजण्यासाठीची पट्टीचे पुरावे इ.स.पुर्व.सुमारे 2400 सालच्या पूर्वीच्या भारतातील पण आता पाकिस्तानमध्ये असलेल्या लोथाल या ठिकाणी सापडले आहेत. अगदी बारीक म्हणजे 2 मिलीमीटरपेक्षा कमीचे अंतर मोजण्यासाठी त्याचा वापर होत होता हे सिद्ध झाले आहे. मोहेंजोदारोमध्ये सापडलेली हस्तिदंती पट्टी हे त्याचेच उदाहरण.
संदर्भ : इन. विकीपेडिया. ओआरजी

5. जगातील पहिले रॉकेट : मैसूर रॉकेट

जगातील पहिले धातूने बनवलेले आणि एखाद्या सिलेंडर सारखे असणारे रॉकेट भारतात, हो भारतातच बनवले होते. इंग्रजाच्या विरुद्ध त्या रॉकेटचा वापर युद्धात केला गेला. ही गोष्ट आहे सन 1780 मधील. ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीविरुद्धच्या लढाईत मैसूरच्या तत्कालीन राजा टिपू सुलतानने यशस्वीपणे जगातल्या या पहिल्या रॉकेटचा उपयोग केला. धातूच्या नळीमध्ये पेट घेणारी दारू ठासून भरून ही रॉकेट्स तयार केली होती. दोन किलोमीटरचा मारा करू शकणारी ही रॉकेट्स ब्रिटीशांची डोकेदुखी बनून राहिली होती. विमान विद्या शास्त्राचे जाणकार प्रोफेसर रॉडमच्या मते “All the rockets in the world today can be traced to those used during the wars in Mysore”

कालांतराने भारतावर राज्य करताना ब्रिटीश सरकारने मैसूर रॉकेट ब्रिटनला पळवून नेले व त्याचाच वापर नंतर नेपोलियनच्या युद्धात केला गेला.
संदर्भ : इनसायक्लोपिडीया ऑफ ब्रिटानिया

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

1,229 total views, 1 views today