पुरानी जीन्स… वो पहला प्यार…
खरच दोस्तांनो कॉलेज लाईफ म्हणजे धमाल. काही खट्या काही मिठ्या आठवणीची शिदोरी आपण आयुष्यभर पुरवून पुरवून वापरतो. काहीवेळा धकाधकीच्या जीवनात या आठवणी हृदयाच्या कोणत्यातरी एका कप्प्यात दडून बसतात. पण फक्त काही काळच कायमच्या नव्हे. अन मग कधीतरी काही कारणाने अचानक एका सुंदर कारंज्यासारख्या त्या वर येतात आनंदाचे क्षण शिंपडायला. मग ते कारण तिचे व त्याचे अचानक दिसणे असो वा एखादा कॉलेज जीवनावरील चित्रपट पाहणे असो.. स्मार्टदोस्तने म्हणूनच बेधुंद कॉलेज जीवनाची आठवण करून देणाऱ्या चित्रपटांची यादी बनवली आहे. वाचा अन व्हा स्वार आठवणींच्या वारूवर.

1. कूछ कूछ होता है :

कूछ कूछ होता है ही स्टोरी सेंट झेवियर्स कॉलेजच्या राहुल, अंजली आणी टीना या तीन बडीजची आहे. 1988च्या या चित्रपटाने लाखो कॉलेज तरुंणांना वाद लावले होते. राहुल (शाहरुख) व अंजली (काजोल) ची कॉलेजमधील विना अट अतूट मैत्री फ्रेन्डशिपची व्याख्याच बदलून टाकते. टिनाचे राहुलच्या आयुष्यात पदार्पण आणि अंजलीचे राहुल बद्दलचे प्रेम व्यक्त न करता शहर सोडून जाणे अनेक कॉलेज गोअर्सना स्वतःची कहाणी बघत असल्याचा फील देवून गेली.

2. थ्री इडीयटस :

कॉलेज कॅम्पसमधील रँचो, फरहान आणि राजू रस्तोगीची इम्पेरियल कॉलेजमधील धमाल. चतुर रामलिंगमचा एडछापपणा, प्रिन्सिपल विरू सहस्त्रबुद्धेंची अजब विचारसरणी दाखवलेला हा चित्रपट इंजिनीरिंगच्याच नव्हे तर सर्व कॉलेजतरुणांना एकदम एका धुंद बेभान कॉलेजजीवनात घेवून गेला. 2009 चा हा चित्रपट आजदेखील ताजा वाटतो.

3. रंग दे बसंती :

डीजे उर्फ दलजित, सुखी, अस्लम आणी सोनी या 5 मित्रांची ही कथा. दिल्ली विद्यापीठातील या मैत्रीची अनोखी कहाणी दाखवणारा हा चित्रपट. मैत्रीचे रुपांतर अनेक छटा दाखवत नंतर देशासाठी बलिदान देण्यापर्यंत जाते अशी कथा असणारा 2006 चा चित्रपट कॉलेजजीवनात तयार होणारे संबंध फक्त कँटीन आणि मजा मारण्यापुरतेच नसतात तर त्यापलीकडे बाह्य जीवनातसुद्धा किती घट्ट असतात हे दाखवतो.

4. जाने तू या जाने ना :

जे. टी. जे. वाय. एन. असा चित्रपट ज्यामध्ये कॉलेज मधील अनेक गँग्ज, टॉमबॉय मुली, ट्रस्टीका बेटा, पप्पू लोग अगदी सर्व काही आपल्या कॉलेज मध्ये असते ते दाखवले गेले आहे. हा चित्रपट कॉलेज री युनियन करू वाटणाऱ्यांना फार भावला आणी आजदेखील आपली खुशबू टिकवून आहे. जेनिलिया तर मस्तच.

आता अलीकडच्या काळातील चित्रपट.

5. स्टुडंट ऑफ द इयर :

एस ओ टी वाय मधील कॉलेज खरोखरच असेल का हा वादाचा मुद्दा असेलही परंतु करण जोहरचा हा चित्रपट तरूणवर्गाला फार भावला. विद्यार्थीदशेतील भावनांचे दर्शन घडवणाऱ्या सेंट तेरेसा हायस्कूलमधील घटनां आपल्या त्या पूर्वीच्या धुंद आठवंणी जाग्या करतो. “स्टुडंट ऑफ द इयर” ट्रॉफीभोवती फिरणाऱ्या ये चित्रपटात कॉम्पिटीशन, जलन, प्यार और दिलोका टूटना और लास्टमी जितना सर्व काही या चित्रपटाने कव्हर केलेय.

तर ही होती कॉलेजची आठवण करून देणाऱ्या बॉलीवूडपटांची यादी. स्मार्टदोस्तला कॉलेज लाईफ नंतरच्या जीवनावरील “जिंदगी न मिले दोबारा” व “दिल चाहता है” हे चित्रपट पण आवडले. परंतु दोन्हीमध्ये कॉलेज कॅम्पस दाखवले नसल्यामुळे यादीत ते नाहीत.

701 total views, 1 views today