१. अतीव्यायाम थांबवा व ट्रेनिंग सुरु करा – चरबीपासून मुकत पोटासाठी उपयोगी आणी नेहमी करता येईल असाच हेल्थ ट्रेनिंग प्रोग्राम करा. मसल वाढवणाऱ्या व्यायामामुळे पोट कमी होत नाही तर ठरावीक हलाचालीमुळेच शरीर बांधेसूद होते.
२. भरपूर पाणी प्या – शरीरातील टॉक्सिक म्हणजे नको असलेले द्रव्य बाहेर पडण्यासाठी व प्रसन्न राहण्यासाठी पाण्याचा फार उपयोग होतो. रोज किमान २-३ लिटर पाणी प्या. ३. तळलेले पदार्थ, जास्त कॅलरीयुकत स्नॅक्स टाळा. एक अतिरीकत आईस्क्रीमसुद्धा फॅट वाढवू शकते व आपली मेहनत वाया जावू शकते.
४. मल्टीव्हिटामिन व अॅटीऑक्सिडेंटचा वापर जपून करा – व्यायामामुळे शरीरातील फॅट बरोबरच व्हिटॅमिन व उपयोगी तत्वे कमी होत असतात. ही झीज भरून काढण्यासाठी जर तुम्ही काही सप्लीमेंट्स घेत असाल तर त्याचा वापर काळजीपूर्वक करा. आहारतज्ञाचा सल्ला जरूर घ्या कारण चुकीचा उपाय अपायकारक आसतो.
५. तुम्ही फॅट कमी करू शकता याची खात्री स्वतःला द्या. सकारात्मक दृष्टीकोन व ध्यास तूम्हाला तुमचे शरीर आरोग्यदायक ठेवण्यास मदत करेल.

925 total views, 1 views today