जगबुडी होणार होणार असे अनेक वेळा आपण ऐकतो. काही काही वेळा तर जगबुडीची तारीख अन वेळ देखील कोण कोण जाहीर करताना आपण पहिले आहे. परंतु सर्व काही संपणार, आता आपले काही खरे नाही म्हणून बोरा बिस्तारा बांधून अंतिम प्रवासाला तयार झालो की लक्षात येते की सर्व काही आलबेल आहे अन जगबुडी होणार नाही. जोक्स अपार्ट, परंतु स्मार्टदोस्तने असे किती तरी पुरावे गोळा केले आहेत जे दाखवतात की जगबुडी होणार म्हणून अनेक विद्वानांनी भूतकाळात आडाखे बांधले होते अन प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. या यादीत अश्याच भविष्यवाणींच्या नोंदी. कोणाचीच भविष्यवाणी खरी ठरल नाही म्हणून स्मार्टदोस्त ही यादी लिहू शकला. नाहीतर काय….

1. निबिरू ग्रहाचा हल्ला : 21 डिसेंबर , 2012 :

सुर्यमालेच्या टोकाला असणाऱ्या निबिरू नावाच्या ग्रहाचा हल्ला आपल्या पृथ्वीवर 2003 साली होणार अशी एक थेअरी त्याकाळी खूप जोरात मांडली गेली होती. निबिरू आहे की नाही या बद्दल देखील काहीना शंका होती कारण निबिरू तसा उघड्या डोळ्याना दिसत नाही. परंतु काही अतिउत्साही मंडळीनी हा निबिरू 2003 ला पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आणी त्यामुळे महापूर, भूकंप, ज्यालामुखी असे बरेच पराक्रम तो घडवणार हे जाहीर केले. म्हणजे थोडक्यात पृथ्वी गायब. 2003 ला तसे काही झाले नाही. मग काय नवी डेट. परत कॅलक्यूलेशन करून 21 डिसेंबर 2012 ही तारीख फिक्स करण्यात आली. आता डिसेंबर 2014, 15, 16.. सारे झाले. पण परीस्थिती जैसे थे.

हा… काही हुशार निर्मात्यांनी यावर पिक्चर काढून तुंबडी भरली हे काय सर्वांनाच माहित आहे.

2. हेरॉल्डची रेडीओ वाणी : 15 ते 17 सप्टेंबर 1994 :

आजकल भारतात आर. जे. म्हणजे रेडीओ जॉकीचा बराच बोल बाला आहे. तसाच काहीसा भाव पश्चीमात्यात हेरॉल्ड काम्पिंग या रेडीओ जॉकीला त्याकाळी होता. या पठ्यांने काय गणिते मांडली कोण जाणे पण येशू 15 ते 17 सप्टेंबर 1994 दरम्यान पृथ्वीवर परत येणार आणि काही गिन्या-चुन्या लोकांना वाचवणार, बाकी सगळे मरुन जाणार असेच जाहीर केले. हातात तोंडासमोर माईक असल्यामुळे त्याचे हे भाकीत सगळीकडे पसरण्यास वेळ लागला नाही. सुदैवाने तसे काही झाले नाही. परंतु हेरॉल्डला मात्र जाहीर माफी मागावी लागली. ती त्याने आनंदाने मागितली असेल. कॅलक्यूलेशन मिस्टेक बॉस.

3. गुरुचा तडाखा अन नवग्रहांची साखळी : 3 ऑक्टोबर 1982

जॉन ग्रीबन आणी स्टेफन प्लाग्मान या दोघा खगोल वैद्यानिकांच्या मते सूर्यमालेतील नऊ ग्रहे जेव्हा एका रेषेत येतील तेव्हा त्या सर्व ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामूळे सूर्यावर प्रचंड सौर वादळे, ज्यालामुखी निर्माण होतील व त्याचा परिणाम म्हणून पृथ्वी नष्ट होईल. सर्व ग्रहे एका रेषेत यायचा दिवस 3 ऑक्टोबर 1982 हा होता. या दोघांनी या सिद्धांताला ज्युपिटर इफेक्ट (गुरुचा तडाखा) असे नाव दिले होते. परंतु कदाचित सूर्याच्या ताकदीपुढे समोरील सर्व नऊ ग्रहांची ताकद फिकी पडली असेल. उपरवाला जाने …

4. हॅले धूमकेतूची धूम : 18 मे 1910 :

दर 75 वर्षांनी पृथ्वीजवळून जाणाऱ्या हॅले नावाच्या धूमकेतूने सन 1910 ला धुमाकूळ घातला होता. तसा तो आधी पण जवळून गेला होता पण काही शास्त्रज्ञांच्या मते तो यावेळी अगदी जवळून जाणार होता. अन जाता जाता आपल्या शेपटीचा तडाखा तो पृथ्वीवासियांना देणार होता. धुमकेतूच्या शेपटीत विषारी वायू आहे अन त्यामुळे शेपटीत सापडलेले सर्व या वायुमूळे गुम होणार ही भीती मिडीयामध्ये जोर पकडून होती. मग काय. परत बोरा बिस्तारा बांधून सर्व तयार. यावेळी सुद्धा काही हुशार कंपन्यांनी धुमकेतू रोधक गोळ्या बाजारात आणल्या आणी धूम धडाक्यात विकल्या. पृथ्वीवर असा धुमाकूळ घालणारा धूमकेतू काही न करता धूम ठोकून पळाला हे काय सांगायला नको. धूम… धूम…

5. जोअॅना साउथकॉटची अधुरी ख्वाईश : जुलै 1814

अगदीच वेगळी कहाणी. जोअॅना साउथकॉट नावाच्या तत्कालीन धार्मिक स्त्रीला एक विचित्र स्वप्न पडले त्यामध्ये ती एका मुलाला जन्म देणार असून तो पृथ्वीच्या शेवटाची तारीख डीक्लेअर करेल. गमतीचा भाग असा होता की जोअॅना कुमारिका होती. अन त्याहून पुढे ती 65 वर्षांची होती. परंतु साउथकॉटना त्याकाळी समाज खूप मानत होता. त्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून तयारी सुरु केली. साउथकॉटना जेव्हा प्रेग्नन्सीच्या खाणाखुणा दिसू लागल्या तेव्हा तर लोकांना जगबुडी होणार याची खात्रीच झाली. साउथकॉटवर भेटींचा वर्षाव सुरु झाला. परंतु नोव्हेंबर उजाडला तरी जगबुडी डीक्लेअर करण्यासाठी बाळाने जन्म घेतला नाही तेव्हा सारे काही संपले. 27 डिसेंबरला जोअॅना साउथकॉटचा मृत्यू झाला. नंतर डॉक्टरांनी जोअॅनाना ड्रॉप्सी (dropsy) नावाचा आजार असल्यामुळे डोक्यावर परिणाम झाला होता व त्यामुळे त्याना मुलगा होणार असे वाटत होते हे डीक्लेअर केले. तरीसुद्धा लोकाना हे पटले नाही व त्यांनी मृतदेह अनेक दिवस साउथकॉट परत येतील म्हणून तसाच ठेवला होता. परंतु ख्वाईश अधुरीच राहिली.

1,277 total views, 1 views today