असे म्हटले जाते की सन 1969 हे वर्ष अखिल मानव जातीच्या इतिहासातील एक महत्वाचे वर्ष आहे कारण त्या वर्षी अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉग आणि त्याचा साथी आल्ड्रिन याने चंद्रावर मानवाचे पहिले पाउल उमटवले. पृथ्वीवरून रॉकेटने चंद्राजवळ जावून नंतर दुसऱ्या यानात बसून चंद्रावर उतरणे, काम करणे आणी परत मूळ यानात बसून पृथ्वीवर येण्याचा विलक्षण पराक्रम अमेरिकेने केला आणि साऱ्या जगाला सुपर पॉवर कोण आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. खरोखरीच ग्रेट आहे असे आपण म्हणू शकतो परंतू जवळ जवळ 20 टक्के अमेरिकन्सचा यावर विश्वास नाही. त्यांच्या मते सर्व जगाला फसवण्यासाठी आणि रशियापेक्षा आपण कसे प्रगत आहोत हे दाखवण्यासाठी अमेरिकेने केलेली ही एक चाल आहे अन चंद्रावर नील उतरला ही एक अफवाच आहे. ज्या 5 शंका अमेरिकन लोकांना आहेत त्या शंका तुम्ही वाचल्या तर तुम्हाला पण हीच आशंका येईल. वाचा तर चंद्रस्वारीची शंकरशाळा.

1. हवा नसताना फडफडणारा झेंडा :

जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरले अन तेथे जे काही झाले ते टीव्हीवर जगाने लाइव्ह दाखवले गेले. म्हणजे ज्यांच्याकडे तेव्हा टीव्ही होता त्यांना ते बघता येईल अशी सोय होती. सोबतचा फोटो टीव्ही फुटेजमधील आहे. बघा अमेरिकेचा झेंडा कसा चंद्राच्या जमिनीवर रोवलाय त्या नील आणी आल्ड्रिनने. मानवच्या या झेपेमुळे तो झेंडा कसा आनंदाने डोलू लागलाय. वाऱ्याची झुळूक झेंड्याला झोका देत आहे.
वाऱ्याची झुळूक?…
दोस्तहो, लहानपणापासून चंद्रावर अजिबात हवा नाही.. ऑक्सिजन नाही हे पाठ करत करत शाळा पार पडलेल्यांना हवेशिवाय फडफडनाऱ्या या झेंड्याबद्दल शंका येणे जायज आहे. अमेरीका आजपर्यंत याचे उत्तर देत आले आहे पण शंकेखोरांची शंका काही जात नाही.
तुम्हालापण शंका आली का?

2. लाईट कॅमेरा फोटो … :

हा पहा दुसरा फोटो. कॅमेऱ्यामध्ये एक अंतराळवीर दिसतो, काही दगडे, सपाट जमीन. सगळे काही परफेक्ट. परंतु शंकेखोराचे लक्ष फोटोमधील सावल्यावर आहे.. म्हणजे बघा चंद्राला सूर्याकडून लाईट येणार. जशी आपलाल्या येते तशी. जर दोन व्यक्ती वा वस्तू पृथ्वीवर जवळ जवळ असतील अन सूर्याचा लाईट त्यांच्यावर पडत असेल तर त्या दोन्हीची सावली ही एका रेषेत वा समांतर पडते हा नियम. फोटो चंद्रावरचा आहे हा क्लेम खरा मानायचा तर सावल्या समांतर पडायला पाहिजेत. परंतु दगडाची सावली एका दिशेने तर विराची दुसऱ्या दिशेने जात आहे हे दिसते. जणू दोन वेगवेगळे दिवे सेटच्या मागे लावले आहेत. सेटच्या मागे..? म्हणजे तो एक चंद्राचा सेट आहे..? अन हीच शंका अनेकांना आहे. बघा पटतंय का. (सुधीर मोघे लिखित मराठीतील एक गाणे उगीचच आठवले. “रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्याचा… संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा… हा चंद्र ना स्वयंभू रवितेज वाहतो हा… ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा”)

3. हेल्मेटमध्ये कैद सेटवरील स्पॉटलाईट :

अपोलो 12 च्या मिशन नंतर अमेरिकेने जारी केलेला हा फोटो. जणू चंद्रावरून ब्रेकिंग न्यूज देत असलेल्या सध्यांच्या टीव्ही रिपोर्टर्स सारखे… हातात माईक, समोर कॅमेरामन आणि एक जोश…. जणू मी काय सांगतो ते जगात नव्हे अख्ख्या विश्वात कोणीच सांगितले नाही. तर दोस्तांनो या फोटोतही तसाच काहीसा माहोल दिसत आहे. पण गोची अशी झाली आहे की चंद्रावरून बातम्या देताना हेल्मेटच्या काचेत कशाचीतरी प्रतिमा दिसून येत आहे. कदाचित कॅमेरामनच्या मागील सेटवरच्या बंद स्पॉटलाईटचीच ती प्रतिमा आहे. असे मी नाही तर हाजारो अमेरिकन्सना वाटते.

4. अकेली पृथ्वी, तारोंके बिना… :

आज रात्री चंद्र पहा. म्हणजे अमावस्या नसेल तर. काय दिसते? तो चंद्र. मंद हवा, रम्य रात्र अन … हो.. हो.. हो… विषयांतर नको. चंद्रासभोवती काही चमकणारे तारे, काही चांदण्या दिसतात ना. हो तर. मग अमेरिकेने प्रसिध्द केलेल्या या चंद्रावरून काढलेल्या पृथ्वीच्या फोटोत अकेली पृथ्वीच..? कयामत से कयामत मधलं गाणं म्हणत “अकेले है, तो क्या गम है”…. बाकिके तारे कहां गये..?
बघा पटतय का? शंका येणारच ना?

5. स्मूथ लँडिंग. ना डाग, ना खरोच… :

आता ही शेवटची शंका.. फोटोत अपोलो यान तथाकथित चंद्रावर उतरलेले दाखवलेले आहे. यानाच्या पायाजवळील चित्र काय दाखवते? की अपोलो हाजारो लाखो किलोमीटरवरून चंद्रावर उतरले ते अगदी फुलासारखे, अलगद. म्हणजे हे जरा जास्तच होतेय. कारण अंतराळवीर चंद्रावर नुसते चालले तर त्यांच्या बुटाच्या सोलची आकृती चंद्राच्या मऊशार मातीत उठू शकते. पण भले मोठे यान मातीवर काही परिणाम करू शकत नाही.
म्हणूनच शंकेखोर म्हणतात की तो एक सेटच होता अन नाटका प्रमाणे स्क्रिप्ट लिहून शुटींग केले होते.
बघा आता तुम्हाला काय वाटते ते….

1,490 total views, 3 views today