काळी पांढरी स्वप्ने : स्वप्नाच्या 5 विलक्षण बाबी

गुगलच्या निर्मात्या लॅरी पेगला गुगल कंपनी चालू करण्यापूर्वी स्वप्नामध्ये त्याने काय करायचे हे आले होते हे जगासमोर कबूल केले आहे असे स्मार्टदोस्तच्या वाचनात आले. म्हणजे आज जे गुगल आहे त्याचा जन्म स्वप्नात झाला होता हे कळाल्यावर स्वप्नावर लेख लिहायचे डोक्यात आले. दोस्तहो ! स्वप्ने आपणा सर्वांनाच पडतात. स्वप्ने येतात का स्वप्ने पडतात हा एक वेगळा विषय पण झोपेत स्वप्ने कधीच बघितली नाहीत असे सांगणारे सापडत नाहीत हे नक्की. माणसाला स्वप्ने का अन कशी अन कोणती पडतात या अनेक प्रश्नाची उत्तरे अजूनही पूर्णपणे सापडली नाहीत. यामूळेच स्वप्न एक रहस्यच बनून राहिले आहे. वाचा तर याच रहस्याबद्दल पाच अनोख्या गोष्टी.

1. अंध लोकांची आवाजी स्वप्ने :

तुम्हा आम्हाला म्हणजे जे रंग, चित्रे, वस्तू इत्यादी जे काही डोळ्यासमोर येते ते पाहू शकणाऱ्याना स्वप्नात असलेच काही ना काही दिसणे हे मान्य. पण ज्यांनी अंध असल्यामुळे आयुष्यात काहीच बघितले नाही, ज्यांना कोण कसे दिसते ते माहित नाही, लाल, पांढरा, पिवळा असे रंग असतात कसे हे माहित नसणारे अंधही स्वप्ने बघतात. असे सिध्द झाले आहे की अंध लोकांच्या स्वप्नात आवाज, गंध अन कंपने येतात. डेन्मार्क देशाच्या एका संशोधकाच्या मते डोळे असणाऱ्यापेक्षा अंध लोक जास्त स्वप्ने पाहतात.

2. जे पाहिले तेच स्वप्नात येते :

अनेकाना वाटते की स्वप्नात कोणी अनोळखी व्यक्ती आली अन तिने अमुक अमुक केले. किव्हा स्वप्नात शिंगवाला राक्षस आला अन त्याने कोणाला तरी खावून टाकले. त्या राक्षसाला वा त्या अनोळखी व्यक्तीला आम्ही आयुष्यात कधी आधी बघितले नव्हते. पण हे सत्य नाही. आपण हजारो लाखो लोकांना पाहत असतो. त्यापैकी अनेकांना आपला मेंदूकोणत्या तरी स्वरूपात सेव्ह करून ठेवत असतो अन तेच सेव्ह केलेले चेहरे मग स्वप्नात येतात नकळत. स्वप्नात आलेला शिंगवाला राक्षस देखील असाच कोणत्या तरी कॉमिक वा चित्रपटातून चोरलेला.

3. काळी पांढरी स्वप्ने:

हो! हे सत्य आहे. सन 2008 अमेरिकेतील एका विद्यापीठात एक अनोखा अभ्यास केला गेला. प्रयोगासाठी निवड केलेल्या लोकाना स्वप्नातून, झोपेतून जागे झाल्या झाल्या रंगाविषयी प्रश्न विचारले गेले. रंगाचे शेड कार्ड दिले असता त्यापैकी काही लोकांनी फार सौम्य रंग सिलेक्ट केले. जणू त्याना भडक रंगाची अलर्जी होती. नंतर असे लक्षात आले की लहानपणापासून जे काळे पांढरी चित्रे दाखवणारे टीव्ही पहात मोठे झाले ते बऱ्याचदा स्वप्नेपण काळी पांढरीच पाहतात.

4. स्वप्न पडायचे औषध :

काही काही लोकाना स्वप्नाचे फार आकर्षण असते. त्याना स्वप्ने आली नाहीत तर झोपच लागत नाही. म्हणूनच ते डीएमटी – DMT (Dimethyltryptamine) नावाचे नशा देणारे ड्रग घेतात. हा सगळा प्रकार बेकायदेशीर आहे पण सन 1990 – 95 मध्ये डॉ. स्ट्रासमननी काही पेशंट्सवर प्रयोग केले असता असे लक्षात आले की डीएमटी घेतल्यावर पेशंट्सना स्वप्नेच स्वप्ने पडली. काहींना परग्रहवासीयांनी पळवून नेले तर काहींनी रहस्यमय राक्षसाशी लढाई केली. स्वप्नातच. स्वप्नाची आटतीव आस हा एकप्रकारचा रोगच आहे.

5. पुरुष अन स्त्रीची स्वप्ने वेगळी :

ही एक मजेशीर माहिती. स्त्रीयांना पुरुषांपेक्षा जास्त स्वप्ने पडतात. अन मजेशीर बाब म्हणजे त्या पुरुषापेक्षा जास्त स्वप्ने लक्षात ठेवतात. 67 टक्के केसेस मध्ये पुरुषाच्या स्वप्नात येणाऱ्या व्यक्ती या इतर पुरुषच असतात. अन त्यांच्या स्वप्नांत बऱ्याचवेळा इतर पुरुषाबरोबर होणारी भांडणेच असतात. स्त्रियांना स्वप्ने पडतात तेव्हा बहुतांशीवेळा कुटुंब अन कुटुंबीयाविषयी बाबीच स्वप्नात येतात. कदाचित पुरुष व स्त्री ज्या ज्या गोष्टी दिवसभरात अनुभवतात त्याच स्वप्नात वेगळ्या रूपाने येत असतील.

762 total views, 3 views today