घरात एखादे तरी ओरिजिनल पेन्टींग असावे असे अनेकांना वाटते. हॉलमध्ये प्रसिध्द चित्रकाराचे पेन्टींग घराची आणि घरातील लोकांची कलारसिकता दाखवून देते. बऱ्याच वेळा ही ओरिजिनल चित्रे सहजासहजी मिळत नाहीत व ती महागही असतात. म्हणून त्यांच्या ऑफिशीयल कॉपीज फ्रेम करून आपण लावतो. परंतु, ओरिजिनल चित्रे किती रूपयांना मिळतात याचा शोध स्मार्टदोस्तने केला तेव्हा तयार झाली महागड्या पेन्टिंगची यादी.

1. पोट्रेट ऑफ एडेल ब्लॉक (Portrait of Adele Bloch):

गुस्ताव क्लिम याने सन 1906 साली रंगवलेले हे चित्र. नाझींच्या ताब्यात घेतलेले हे चित्र नंतर मूळ मालकाला परत देण्यात आले, जे त्याने सन 2006 ला अमेरिकेच्या रोनाल्ड लाउडरला फक्त रूपये 640 कोटींना (त्यावेळच्या)विकले.

2. ले रेव्ह (Le Reve) :

फ्रेंच भाषेत ले रेव्ह म्हणजे ‘स्वप्न’. सन 1932  ला हे स्वप्न तत्कालीन प्रसिध्द चित्रकार पाब्लो पिकासोने तैलरंगात रंगवले. पिकासो तेव्हा पन्नास वर्षांचा होता व चित्रात त्याने त्याची 22 वर्षांची प्रेमिका ‘‘मेरी वॉल्टर’’ चा विचार करून रंग भरले. सिम्बॉलसचा वापर भडक रंगातील हे चित्र नंतर त्याच्या किंमतीमूळे गाजले. सन 1941 ला चार लाख रूपयांना विकल्या गेलेल्या ह्या चित्राची सन 2013 मध्ये फक्त 950 कोटी रूपये मिळाले. स्टिव्हन कोहेन हा सध्या या चित्राचा मालक आहे.

3. वूमन 3 (Woman 3) :

विल्यम डी कोनिंग या चित्रकाराचे हे ऍबस्ट्रॅक्ट पेन्टिंग. सन 1951 ते 1953 मध्ये विल्यमने वूमन या नावाची सहा चित्रे काढली. सन 1994 पर्यंत तेहरान म्युझीयमची मालकी असलेले हे चित्र सन 1969 च्या यादवी युध्दात थॉमस अम्मानने विकत घेतले आणि 2006 ला स्टिव्हन कोहेनला (अधी उल्लेख आलाच आहे) सुमारे 850  कोटी रूपयांना विकले.

4. नं. 5, सन 1948 :

अमेरिकेच्या जॅकसन पोलॉक या चित्रकाराचे 8 फूट बाय 4 फूट फायबर बोर्डवर काढलेले चित्र तपकीरी व पिवळ्या रंगाचे जाडसर ओघळ पडून तयार झालेल्या एखाद्या सारखे दिसणारे पेन्टिंग. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते सन 2006 ला सूदबी या लिलाव कंपनीने हे चित्र लिलाव केले. फक्त 830 कोटी रूपयांना. डेव्हीड मार्टिनेझ या संग्रहाकडे हे चित्र पहावयास मिळेल.

5. दि कार्ड प्लेअर्स :

यादीतील हे सर्वांत महागडे चित्र. किंमत 2014 सालाची 1500 कोटी रूपये. पॉल सेझेन या चित्रकाराने काढलेले हे चित्र किंमतीच्या बाबतीत जगात भारी ठरले.

570 total views, 1 views today