भारतीयांना दोन हजार वर्षांपूर्वी, मातीच्या भांड्यात कृत्रिम वीज तयार करायची कला अवगत होती हे सांगितले तर कदाचित खरे वाटणार नाही. परंतु उजैनच्या प्रिन्स लायब्ररी मध्ये जर तुम्ही गेला अन तेथील प्राचीन कागदपत्रे जर तुम्ही चाळली तर स्मार्टदोस्त जे सांगतोय ते नक्कीच तुम्हाला पटेल. जर तेथे जायला वेळ नसेल तर वाचा.. ब्रिटीश रसायनशास्त्रज्ञ जॉन एफ डॅनियलने 1736 साली तयार केलेल्या बॅटरीच्या आधीची, इतिहासातील प्रगत भारतीयांची, मातीच्या भांड्यात वीज तयार करण्याऱ्या यंत्राची माहिती. जगात सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोलीटीक बॅटरीचे मूळ कोठे आहे हे दाखवणारे पाच पुरावे..

हे सारे लक्षात आले ते सन 1891 ला.. पुण्यातील इंजिनिअर रावसाहेब कृष्णाजी वाझेंच्या वाचनात “आगस्त संहिता” ची काही जीर्ण पाने आली. उजैनच्या दामोदर त्रंबक जोशींच्या बरोबर त्या संहितेचा अभ्यास केल्यावर जी माहिती पुढे आली ती उजेड पाडणारी होती.. असे काय होते त्या शोल्कांत ?

1. मातीचे भांडे अन मोराची मान :

कालांतराने ती कागदपत्रे ब्रिटीश प्रोफेसर पी. पी. होल यांच्याकडे गेली. प्रोफेसर साहेबांनी त्यांच्या डोक्याने संहितेत सांगितल्या प्रमाणे प्रायोग सुरु केले. एक मातीचे स्वच्छ पात्र घेतले. त्यात “काष्ठ” म्हणजे लाकडाचा भुसा ओला करून भरला. “ताम्र” म्हणजे तांब्याचा तुकडा घातला. भूश्यावर पारा व जस्ताचे आच्छादन घातल्यावर मित्रवरूण (“वरूणाचे” म्हणजे पाण्याचे सेपरेशन तयार होणारी शक्ती) शक्ती तयार होती हे ही समजले. परंतु त्यासाठी “शिखग्रीवा” ही लागते हे समजल्यावर ते “शिखग्रीवा” शोधायला ते बाहेर पडले. “शीख” म्हणजे मोर व “ग्रीवा” म्हणजे मान हे माहित असलेल्या सरांनी तत्कालीन राजाकडे मोराच्या मानेची मागणी केली. नंतर समजले की मोराची मान नको तर त्यासारखा रंग असणारे रसायन हवे. अन हे म्हणजे कॉपर सल्फेट…

प्रयोग झाला अन 1.38 चा झटका होल साहेबांना बसला. डॅनीयल सेलमध्ये हेच तंत्र वापरून वीज तयार केली जाते हे लक्षात असू दे.

2. पाण्यापासून पॉवरफूल हायड्रोजन :

संहितेत म्हटले आहे की शंभर कुंभात वरील कृती केली अन ते कुंभ एकमेकाना जोडले अन “जल’ म्हणजे पाण्यावर याचा प्रयोग केला तर विघटन होवून “प्राण” व “उदान” वायू तयार होतो. म्हणजे ऑक्सिजन व हायड्रोजन तयार होतो. दोस्तहो हायड्रोजन एक शक्तिशाली वायू आहे व त्याचा वापर गाड्यांचे इंधन म्हणून करायचा विचार अलीकडे होतो आहे. पेट्रोल, डीझेल ऐवजी टाकीत शुध्द पाणी भरायचे. इंजिनमध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन तयार होईल व विना प्रदूषण गाडी धावेल हे स्वप्न पाहणाऱ्या आजच्या शास्त्रद्यांना अगस्त ऋषींनी हजारो वर्षापूर्वीच मार्ग दाखवला असे वाटत नाही का ?

3. बॅटरीवर विमान :

हे सारे डोक्याबाहेर जाते असे वाटेल परंतु वाचायचे सोडू नका. “उदान वायू” म्हणजे हायड्रोजन जर “बंधक वस्त्र”, एखाद्या एअरटाईट उपकरणात ठेवला तर त्याचा वापर “यान” म्हणजे विमान अवकाशात उडवायला करता येईल. असे वरील लाईन्समध्ये म्हटले आहे. दोस्तहो भारतीय डोक्यांना परदेशात का मागणी आहे हे जरा जरा लक्षात येत असेल…

4. एलेक्ट्रोप्लेटिंग तथा धातूचा मुलामा :

“कृत्रिमस्वर्णरजतलेपः” म्हणजे “स्वर्ण” सोने अथवा “रजत” चांदीचा “लेप” मुलामा करता येईल हेही शुक्रनीतिमध्ये नमूद केले आहे. असे केले तर त्याला “सत्कृती” म्हणता येईल असे म्हटले आहे. अन हे कसे करायचे त्याचे उत्तर अगस्तानी संहितेत दिले आहे.

5. दागिन्यावर सोन्याचा मुलामा – गोल्ड्प्लेटिंग :

लोखंडाच्या पात्रात “सुश्क्तजल” म्हणजे तेजाबाच्या सानिध्यात “यवाक्षर” म्हणजे सोने वा चांदीचे नायट्रेट “ताम्र” म्हणजे तांब्यावर सोन्याचा वा चांदीचा मुलामा चढवतात. सोन्याचा मुलामा असणारे तांबे म्हणजे “शातकुंभ” तथा कृत्रिम सोने.

दोस्तहो हे सारे अजबच आहे… आधुनिक भारत खरेच आधुनिक आहे का ? असा प्रश्न उगाचच मनात आला अन फार पूर्वी याना गुप्ताने “बाबूजी जरा धीरे चलो, बिजली खडी यहा बिजली खडी….” असे म्हणत “दम” पिक्चरसाठी केलेला करंट मारणारा डान्स आठवला. त्या बिजलीसाठी तडफडणारी माणसे स्मार्टच्या अजूनही लक्षात आहे. आता याना गुप्ताबाई कोठे दिसत नाहीत. पण त्याचबरोबर अजूनही देशातील अनेक शहरे-गावे वीजेसाठीही तडफडत आहेत हे मात्र सत्य. प्राचीन भारताचे कार्य पाहिल्यावर आपला वैचारिक दुष्काळ कधी संपणार असा प्रश्न पडतो…

1,764 total views, 6 views today