“ड्रायव्हिंग करताना सुंदर मुलीचे चुंबन घेणे म्हणजे चुंबनाचा अपमान होय कारण तेव्हा तुमचे पूर्ण लक्ष चुंबनावर नसते” अशी रोमँटिक वाक्ये म्हणणारे, E = mc2 असे नुसते म्हणले तरी ज्यांची आठवण होते ते, मुळचे जर्मन पण हिटलरच्या भीतीने अमेरिकेत स्थाईक झालेले, प्रचंड बुद्धीमत्तेचे आईनस्टाईन जितके हुशार होते तितकेच गूढ होते. प्रवासादरम्यान आपल्या पत्नीला दररोज पत्रे लिहिणारे व प्रसिद्धीपासून दूर पळताना “सॉरी मी आईनस्टाईनसारखा दिसतो पण तो मी नव्हेच” असे म्हणणाऱ्या या प्रसिध्द संशोधकाबद्दल स्मार्टदोस्तने जमवलेली ही माहिती. गुरुत्वाकर्षणच्या वेव्ह फॉर्मबद्दल त्यांनी मांडलेला विचार आधुनिक संशोधकांनी 100 वर्षे झगडून आधुनिक सामग्रिंचा वापर करून नुकताच पटवला. म्हणून हा लेख…

1. आईनस्टाईन फेलर नव्हते :

आईनस्टाईन शाळेत फेल झाला होते आसे आपण समजतो. पण ते सत्य नाही. खरे म्हणजे ते गणितात फार पुढे होते. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी गणितावर लिहलेला निबंध फार गाजला. असे असताना ते नापास झाले होते ही वायर का पसरली ते सांगतो. आईनस्टाईन जर्मन शाळेत शिकत होते पण नंतर त्यांनी शाळा बदलली अन एका स्विझर्लंड देशातील शाळेत दाखला घेतला. या दोन्ही देशातील ग्रेडिंग सिस्टीम एकदम उलटी आहे. म्हणजे जर्मन शाळेत “A” ग्रेड म्हणजे अतिउत्तम तर स्विस शाळेत “A” ग्रेड म्हणजे कनिष्ट. मग काय, रँकर आईनस्टाईन फेलर होता ही वायर 100 वर्षे ….

2. आईन्स्टाईनचा ब्लाउज :

हे गृहस्त फार अवलिया होते. शास्त्रज्ञ आहे म्हणून फक्त सायन्स प्रमेय अन सिद्धांत मांडून  जागतील मोजक्याच लोकांना समजेल अन इतरांच्या डोक्यावरून जाईल असे काम त्यांनी केले नाही. तर सर्वांना समजेल अन डोळ्यातही शिरेल अश्या आधुनिक ब्लाउजचा सिद्धांत (?) त्यांनी मांडला. या पोलक्याला बटणाच्या दोन पट्ट्या होत्या. म्हणजे एक्झरसाइस करून जाडी कमी झाली वा बर्गर पिझ्झा खाऊन जाडी वाढली तरी एकच ब्लाउज वापरता येईल. आहे ना आयडीया. पण ही चालली नाही. लोक तेव्हापण फँशन बाळगून असणार हे शास्त्रज्ञ साहेबाना समजले नसेल.

3. आईनस्टाईन रशियाचे गुप्तहेर ? :

आईनस्टाईन आयुष्याच्या शेवटच्या काळात अमेरिकेचे नागरिक होते. पण का कोणास ठावूक वूमन पॅट्रीयोट नावाच्या ग्रुपला ते अमेरिकेत नको होते. अशातच ते रशियाचे गुप्तहेर आहेत असा एफ बी आय – फेडरल ब्युरो ऑफ अमेरिका या संघटनेला वाटायचला लागले. त्यामुळे 1933 ते मृत्यू पर्यंत म्हणजे 1955 सालपर्यंत या त्यांच्यावर वॉच ठेवण्यात आला. म्हणजे आगदी त्यांच फोन टॅप करण्यापर्यंत मजल गेली होती. खरे पाहता आईनस्टाईननी अमेरिकेचे नागरिकत्व पत्करावे ही अमेरिकेचीच इच्छा होती अन त्यांनी तशी विनंतीही केली होती.

4. लेडीज, पाईप अन आईनस्टाईन :

“एल्सा” ह्या आईन्स्टाईन यांच्या पत्नी. हे सेकंड कुटुंब. एल्सा बरोबरच एलेस्तेल्ला, इथेल, टोनी, मार्गारिटा अश्या  एक नव्हे एकूण सहा गर्लफ्रेंडस बरोबर साहेबांचे नाव जोडले गेले. एकाच स्त्री बरोबर जास्त काळ आईनस्टाईन व्यतीत करू शकले नाहीत. एल्साला या एक्स्ट्रा मॅरीटल  अफेअर्स बद्दल ते पत्राद्व्यारे कळवत होते. आईनस्टाईनच्या मते या सर्व स्त्रिया मनापासून त्यांच्यावर प्रेम करत होत्या. एकंदरीत माणूस दर्दी होता हे त्यांच्या आणखीन एका प्रेमावरून कळून येते. अन हे प्रेम कोणा एका लेडीवर नव्हते तर त्यांच्या पाईप (धूर कांडी) वर होते. चेन स्मोकर असलेल्या या शास्त्रंज्ञाला डॉक्टरनी स्मोकिंग सोडायला सांगितले होते. एकदा बोटीत बसताना चुकून ते पाण्यात पडले. पण तसे असतानाही आपला हात पाण्यावर ठेवून बोटातली पाईप व त्यातली मंद जळणारी खरपूस तंबाखू त्यांनी भिजू दिली नाही. वा जनाब वा ….
हे ऐकून डॉक्टरनी तोंडात बोटेच घातली असतील … अन कानातून धूर आला असेल …

5. राष्ट्राध्यक्ष व्हायची ऑफर :

स्टेट ऑफ इस्राईलला ह्या महान शास्त्रज्ञाने आपल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष व्हावे असे 1952 साली वाटले. तशी त्यांनी आईन्स्टाईननां विनंतीही केली. परंतु मी एक संशोधक असून शास्त्रीय विचार अन शोध लावण्यासाठी माझी बुद्धी ट्रेन झाली आहे असे सांगून त्यांनी ती विनंती नाकारली. कदाचित पुढारीपणा करत मनात येईल तसा देश चालवणे आपल्या बुद्धीच्या पलीकडले आहे हे त्यांना वाटले असेल. ते मनस्वी होते. मृत्युच्या आधी आजारी असताना त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करावयाची होती. त्यामुळे त्यांचे आयुष्य वाढू शकले असते. परंतु त्यांनी त्याल नकार दिला. “मला पाहिजे तेव्हा मी जाणार. उपचाराने वाढवलेले आयुष्य टेस्टलेस असते. या जगातले माझे काम मी केले आहे, आता मला जावूदे” असे म्हणत एका लढवय्याप्रमाणे सांगून त्यांनी आपला देह 1955 सोडला. अमेरिकेतल्या गुरुत्वाकर्षणामुळे शरीर तेथेच राहिले पण “आईनस्टाईन” जगात घराघरात पोहचला.

1,851 total views, 1 views today