27 कोटीपेक्षा जास्त जनता जेथे दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत अश्या भारत देशात ओबेस म्हणजे ढब्बू लोकांची संख्या जास्त नसेल असे कोणालाही वाटेल. परंतू ढब्बू लोकांच्या संखेत भारताचा जगात तिसरा नंबर लागतो असे जेव्हा स्मार्टदोस्तच्या वाचनात आले तेव्हा स्मार्टदोस्तने कारणाचा शोध घेतला. चुकीच्या सवयी, जीवनशैली अन गोष्टीमूळे येणाऱ्या जाडीत आता नवीनच कारणाची अॅडीशन झाली आहे. सोशल नेटवर्कींग आपणाला ढब्बू करू शकते. होय आपले व आपल्या मित्रांचे आवडते नेटवर्किंग त्रासदायक ठरू शकते. तेव्हा वाचा अन काळजी घ्या.

1. पोस्ट वाचताना खायचे, ट्वीट करताना खायचे, सेल्फी काढतानाही खायचे ? ?

कमालच आहे. सोशल नेटवर्कच्या प्रभावाखाली सतत असणाऱ्या लोकांचे खाण्यावर लक्ष कमी अन नेटवर्किंगवर जास्त असते. खाण्यामध्ये सतत व्यत्यय आल्यामुळे तुमचे खाणे जास्त होते हे आता सिद्ध झाले आहे. कारण तुमच्या मेंदूला सतत अर्धवट खाल्ल्यामुळे कळतच नाही की तुम्ही किती खाल्लं आहे. अन जेव्हा पुन्हा थोड्यावेळाने तुम्ही परत खाणे सुरु करता तेव्हा पुन्हा नव्याने पोट भरायचे  असे मेंदू ठरवतो. म्हणजे काय की तुम्ही एक्स्ट्रा खाता. अन एक्स्ट्रा खावून माणूस बारीक थोडेच होणार आहे?
उपाय एकच : खाताना फक्त खा.

2. खाण्याचे अन खात असतानाचे फोटो शेअरिंग :

पिझ्झा, बर्गर वा मिसळ, वडापाव खातानाचे फोटो लगेचच हॉटेलमधून पोस्ट करून तुमचे मित्र नुसते ते कुठे आहेत वा काय करत आहेत हेच कळवत नाहीत तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल अशाच कृती करतात. नॅचरली तुम्हालापण काहीतरी खावेच वाटण्याची शक्यता असते. अन मग जर का तुम्ही मनावर ताबा ठेवू शकला नाहीत तर आहेच… अवेळी तोंडात लाळ तयार होणे हे देखील ढब्बू होण्याचे एक कारण होवू शकता.
उपाय : खाऊचे फोटो शेअर करू नका… मित्रांनाही सांगा.

3. ओबेसिटी संसर्गजन्य असते. नेटवर्कमध्ये असणारे जास्त हेल्दी मित्र …

होय स्थूलता संसर्गजन्य असते. तुमचे मित्र जर जास्त हेल्दी असतील तर तुम्हीपण जाड होण्याचे चान्सेस असतात. कारण तुम्हा सर्वांच्या आवडी नवडी समान होवू शकतात. त्या केसमध्ये तुम्हीपण अनहेल्दी खाणे (जे तुमची जाडी वाढवू शकते) ते सुरु करू शकता. तेव्हा नेटवर्कमधील हेल्दी दोस्त तुम्हालापण जाड करू शकतात.
उपाय : खुदकी सुने दुनियाकी नाही.

4. भावनाभरे जेवण.. इमोशन मध्ये कूचकामी खाणे :

मित्रांच्या वा मैत्रिणींच्या काही कॉमेंट्स, पोस्ट्स तुमच्या भावनांना ठेच पोचवू शकतात. अशावेळी अंडर स्ट्रेस तुम्ही बऱ्याच चुका करू शकता. अन त्यातली एक चूक म्हणजे इमोशन मध्ये कूचकामी खाणे. कोठल्याही काम भावपूर्ण करावे मग ते खाणे असो व इतर काही. भावनेच्या भरात चुकीचे खाणे फट वाढवू शकते. तेव्हा नेटवर्कमधील भांडणे, रुसवे फुगवे अॅक्चूअल लाईफमध्ये त्रास देत असेल तर खाणे संभाळा.
उपाय : सोशल मेडिया आभासी दुनिया तयार करते हे जाणा. त्यात जास्त अडकू नका.

5. नेटवर्किंग रात्रीसुद्धा वर्क करायला लावते :

फेसबुक, व्हाट्स अॅप अन ढेर सारे नेटवर्किंग तुम्हाला सतत जागे ठेवतात हे लक्षात ठेवा. 24 तास 7 दिवस सतत ऑन असणारी ही सारी मंडळी तुमची झोप उडवत असतील तर सावधान. कारण झोपेचा अन जाडपणाचा डायरेक्ट संबध आहे. अपुरी, अवेळी घेतलेली झोप तुमची भूक नियंत्रण करणाऱ्या सिस्टमला पूर्ण झोपवते. तुम्हाला अतिभूक लागण्याचा धोका होवू शकतो. झटपट कॅलरीज मिळवण्याकडे तुमचा कल होतो अन मग तुम्ही काही बाही खाऊन परत रात्र जागवत बसता.
उपाय : स्वतःची झोप महत्वाची. नेटवर्कला रात्री बंदी. हे ठरवा अन ठरवल्याप्रमाणे वागा.

527 total views, 1 views today