टोन्ड बॉडी, झिरो फिगर अश्या शब्दांची सध्या चालती आहे. प्रत्येक पुरुषाला चवळीची शेंग पाहिजे असते अन बहुतांशी महिलावर्गाची स्वतःच्या बॉडी फॅट बद्दल एक वेगळीच आवड निवड असते. आपल्या नको तिथे वाढणाऱ्या शरीराचे काय करायचे या विचारात अनेक भगिनी जीमिंगचा पर्याय निवडतात. तर “To get perfect body” अनेक बंधू बॉडी बनवायला भली मोठी फी भरून जिममध्ये नाव नोंदवतात. अन सुरु करतात एक प्रवास नवीन बांधा बनवायचा. ही एक चांगली गोष्ट जरी असली तरी अनेक जीमर्सना त्याचा हवातसा इफेक्ट मिळत नाही. कारणे अनेक असतील पण त्या सर्वांमधील महत्वाचे कारण म्हणजे जिम मध्ये जाताना वाटणारी स्वतःची लाज. जीममध्ये जर प्रथम जाणार असाल तर कदाचित तिथे जाताना तुम्हाला संकोचल्यासारखे वाटू शकते. अशा वातावरणामध्ये सुरुवातीला अवघडल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे.त्यामुळे असे वाटत असल्यास लक्षात ठेवा स्मार्टने गोळा केलेल्या या 5 टिप्स. (Tips which will help you in Gym, tips to follow in gym which will help you in achieving your health goals..)

1. स्वत:चे शरीर :

जिम मध्ये गेल्यावर प्रत्येकजण पहिली गोष्ट करतो ती म्हणजे दुसऱ्यांचे वाजन बॉडी बघून स्वतःला कम्पेअर करतो. दोस्तहो असे करण्याने होते असे की तुमचा आत्मविश्वास कमी व्हायला सुरुवात होते. कदाचित त्यामुळे तुम्ही जिम मध्ये जायचे टाळू लागाल. तेव्हा जर तुमचे वजन इतरांपेक्षा जास्त असल्यामुळे लाज वाटून घेणे थांबवा. कदाचित त्यांचे वजन काही महिने सतत केलेल्या व्यायामामुळे नियंत्रित झालेले असेल.त्यामुळे जीममधील फीट व सडपातळ लोकांकडे पाहून स्वत:बद्दल लाज वाटून घेण्यापेक्षा त्यांच्याकडून प्रेरीत व्हा व व्यायामाला लागा.

2. कपडे :

दोस्तहो, जीममध्ये कोणताही फॅशन परेड नसतो.त्यामुळे जर तुमचे कपडे स्वच्छ व आरामदायक असतील तर तुम्हाला त्याबाबत संकोच वाटण्याचे काहीच कारण नाही. अनेकाना जिम मध्ये जायचे तर ब्रॅन्डेड कपडेच लागतात. त्यासाठी ते अनेक दुकाने पालथी घालत फिरतात. पण ब्रॅन्डेड कपडे घालून तुमचे वजन कमी होणार नाही हे लक्षात असू द्या. त्यामुळे इतरांच्या कपड्यांशी आपल्या कपड्यांची तुलना करीत बसण्यापेक्षा तुम्ही जे कपडे घातले आहेत त्यामध्ये मोकळेपणाने व आत्मविश्वासाने वावरा. इतरांच्या कपड्याचे दडपण घेऊ नका.

3.परक्या व्यक्ती :

जिममध्ये असणारी प्रत्येकजण तुमचे मित्र वा मैत्रिणी असतील असे नाही. कदाचित सर्वजणच अनोळखी असतील. अनेकवेळा कोणी ओळखीचे नाही याचे तुम्हाला दडपण येऊ शकेल. कोणीच बोलत नाही तेव्हा काय करू जिम मध्ये जावून असे विचार येऊ लागतील. परंतु जिम मधील प्रत्येक व्यक्ती फ्रेन्डली असेल असे नाही. काही लोक चांगल्या स्वभावाचे असतील तर काही लोक शिष्ट स्वभावाचे असू शकतील. कोणी कोणत्याही स्वभावाचे असले तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम व्हायची काही गरज नाही. जर तिथे तुमच्याशी कोणी नीट बोलत नसेल तर ठिकच आहे. कारण तुम्ही तिथे मैत्री करण्यासाठी नक्कीच जाणार नाही आहात.


4. नवीन मशिन वापरणे :

अनेक वेळा जिममध्ये गेल्यावर तिथले हटके ब्राईट वातावरण तुम्हाला बिचकवू शकेल. त्या नवीन मशीन्स पाहून त्याना हात लावू का नको असा विचार तुमच्या मनात येवू शकेल. आपण आपले डंबेल्स उचला उचालीचे काम करावे असे वाटेल. परंतु दोस्तहो गोंधळून न जाता जिम ट्रेनर्सकडून सर्व मशीन्सची माहिती करून घ्या अन ती साधने वापरायला सुरु करा. हा पण हे सर्व ट्रेनर्सना विचारून. कारण जरी तुम्ही पहिल्यांदा जीममध्ये आलेला नसलात तरी प्रत्येक मशिनबाबत योग्य ज्ञान करुन घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही तज्ञांच्या मदतीशिवाय एखादे मशिन वापरले तर तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता असते. जीममधील इतर माणसे जलदगतीने सर्व मशिनवर वर्कआऊट करु शकतात कारण त्यांना काही महिन्यांपासून तिथे व्यायाम करण्याचा सराव असतो.तुम्हाला देखील तसे करणे नक्कीच जमेल पण त्यासाठी मनात संकोच नको.

5.स्टॅमिना कमी असणे, चांगले न दिसणे :

जिम मधील इतर लोकांचा स्टॅमिना तुमच्यापेक्षा जास्त असेल तर काहीच हरकत नाही. त्यासाठी स्वत:ला झटपट स्टॅमिना वाढविण्यासाठी पूश करु नका. तुमचा स्टॅमिना हळूहळू व दररोज व्यायाम करुन वाढू लागेल.तुमचे ट्रेनर त्यासाठी तुम्हाला मदत करतील. उगाचच दाखविण्यासाठी तुमचा क्षमता नसताना स्टॅमिना वाढवून दाखवू नका.

काही महिला जीममध्ये मेक-अप करुन अथवा थोड्याफार अॅक्सेसरीज घालून जातात.तर काही जणी मेक-अप न करता देखील अतिशय आकर्षक दिसतात. पण भगिनींनी उदास होण्याची गरज नाही.कारण जसजसा तुम्ही व्यायाम करु लागाल तुमच्या चेह-यावर देखील ग्लो येईल.त्यामुळे फक्त स्वत:च्या वर्कआऊटवर लक्ष द्या.

तुमच्या स्टॅमिन्याची, तुमच्या इतरांसारखे न दिसण्याची काळजी तुम्हाला जिमपासून दूरू नेऊ शकेल. तुमच्या जिमला जाण्याच्या ऑब्जेक्टव्हला हासील करण्यापासून रोखू शकेल हे लक्षात असू द्या.

तर दोस्तहो, don’t worry about these things at the gym.. मंझील तुम्हारे सामने होगी.

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

787 total views, 1 views today