एखाद्या कथेचा, चित्रपटाचा शेवट कायम चांगला व्हावा. नायीकेची शत्रूंच्या तावडीतून सुटका व्हावी व नायकाच्या प्रेमाचा विजय व्हावा असे अनेकांना (सर्वांना) वाटते. शोले चित्रपटाच्या बाबतीत ‘स्मार्टदोस्त’ ला असेच वाटत होते. उगाचच वाटायचे की अमीताभला मारायला नको होते. कोणीतरी असे पण अफवा उठवायचे की शोलेचा एंड बदलणार आहेत. अफवा ह्या अफवाच असतात. असो, तर बॉलीवूड मधील असे पाच चित्रपट ज्यामध्ये काहीसा वेगळा सूखद शेवट आपेक्षीत होता अशा सॅड पण सूंदर चित्रपटांची ही यादी.

१) कल हो ना हो :

सैफ अली खान बद्दल गिलाशीकवा नाही परंतू शाहरूख हृदयाच्या दुखण्यातून बरा झाला असता तर… असे अनेकांना वाटले. स्टोरी जरा कॉप्लीकेटेड झाली असती. परंतू क्या यार दिल तो पागल है… शहारूखने थांबायला पाहिजे होते यार.

२) रंग दे बसंती :

खर्‍या खूर्‍या जीवनाचा आरसा दाखवण्याच्या अमीर खानच्या प्रयत्नांचे कौतूक करावे तेवढे कमीच. परंतू रीयालीटीच्या भरात एक चांगले काम करणार्‍या तरूणांचा चित्रपटाच्या शेवटाला हा अंत मनाला चटका लावून जातो. अस वाटतं काहीतरी चूकतय. विचार करायला लावण हीच तर अमीरची खासीयत आहे म्हणायचे आणि गप्प बसायचे, काय करणार.

३) रांजना :

हिरोचे हिरॉइनवर प्रेम किंबहूना हिरॉइनचा त्यात पूढाकार, परंतू नंतर हिरोची ट्रॅजीक हत्या आणि कहर म्हणजे हिरॉइनचा त्यात सहभाग, अनेकांना चिड आणणारा हा रांजना. प्रेमाच्या परीभाषेला एका वेगळ्या टप्प्यावर नेणारा चित्रपट भाबड्या हिरोच्या जाण्यामूळे अनेकांना आवडला नाही. म्हणजे चित्रपट चालला पण शेवट बदलावा वाटला.

४) फना :

अमीरचा हा आणखी एक चित्रपट. काजोलच मोठ्या पडद्यावरचे पूनरागमन चाहत्यासाठी भावनीक होतेच परंतू अमीरचे काजोलच्या बाहूत श्‍वास सोडणे अनेकांचे डोळे पाणावून सोडणारे ठरले.खरच शेवट बदलायला पाहिजे होता, पण अमीर तो अमीरच.

५) आशिकी २ :

सन २०१३ चा ब्लॉकबस्टर सिनेमा. लाखो प्रेमीकांना आणि इतरांनाही चटका लावून गेला. मशहूर रॉकस्टार राहूलचे व्यसन त्याला प्रसिध्दीच्या शिखरावरून खाली आणते परंतू त्याचे आरोही नावाच्या एका पार्टटाइम सिंगर मूलीवर जडलेले प्रेम आणि तीच्या टॅलेंटला जगापूढे आणणार्‍यासाठी राहूलने केलेली धडपड आपल्याला प्रेमाची एक अनोखी दास्ता दाखवून देती. आरोहीची राहूलच्या भल्यासाठी होणारी धडपड आणि तितक्याच प्रमाणात राहूलचे आरोही प्रसिध्द गायक व्हावी म्हणून केलेले प्रयत्न मनामध्ये कल्लोळ उठवतात. खरोखरच राहूलने जायला पाहिजे होते का? हो किंवा नाही ही उत्तरे चित्रपटाचा शेवट वेगळा असावा असेच सूचवतात.

588 total views, 1 views today