जेव्हा पोटापाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर तिकीट कलेक्टर म्हणून काम करणारा एक गरीब घरातला मुलगा केवळ दहा वर्षात एखाद्या राज्याचा हायेस्ट इन्कमटॅक्स पेयर होतो तेव्हा ती एक लॉटरी नसते तर प्रचंड कष्ट अन कर्तुत्व असते. फोर्ब्स मासिकाने ज्याची 14- 15 साली संपत्ती 2081818950 च्या आसपास आहे असे म्हटले आहे त्या कॅप्टन कूल एम एस धोनी उर्फ आपला “माही” च्या 5 हटके गोष्टी…

1. चुकून क्रिकेटर :

कोट्यांवधी क्रिकेटवेड्या भारतीयांच्या मनांचा ताबा घेणाऱ्या माहीच्या मनावर मात्र फुटबॉल अन बॅडमिंटन राज्य करून होते. जिल्हास्त्ररावर या दोन्ही खेळामध्ये त्याने भाग घेतला होता. मग हे क्रिकेट मधूनच कोठून आले त्याची मजेशीर कहाणी आहे. एकदा त्याच्या शाळेच्या क्रिकेट टीमचा रेग्युलर विकेटकीपर आजरी पडला अन ऐनवेळी कोणाला पाठवायचे ते कोचना समजेना. तेव्हा हा फुटबॉलचा मोठा बॉल पकडणार गोलकीपर “महेंद्र” क्रिकेटचा छोटा बॉलही पकडू शकेल असे मानून त्याला शाळेच्या टीममध्ये घेण्यात आले. नंतर काय झाले ते तुम्ही बघताच. म्हणतात ना बॉल बॉल पे लिखा होता है पकडनेवाले का नाम….

2. संतोष लालचा हेलीकॉप्टर शॉट :

“हेलीकॉप्टरच्या फिरणाऱ्या  पात्यांसारखी बॅट अशी हवेत फिरवायची की त्यामध्ये येणाऱ्या बिचाऱ्या चेंडूला काय आपण पाप केले अन उगाच याच्या नादाला लागलो असे वाटायला पाहिजे” असे संतोष लालने धोनीला सांगितले. नुसते सांगितलेच नाही तर शिकवले सुद्धा. संतोष लाल धोनीचा जवळचा मित्र अन झारखंड क्रिकेट टीमचा मेम्बर. आज “हेलीकॉप्टर शॉटचा” जनक म्हणून धोनीची जगास ओळख आहे पण धोनीच्या मते तो या शॉटचा विद्यार्थी. जनक तो संतोषच. दुर्दैवाने संतोष लाल वयाच्या 32 व्या वर्षी मृत्यू पावला. धोनीने आपल्या या मित्राच्या उपचाराची सर्व सोय दिल्ली मध्ये स्वखर्चाने केली होती.. संतोष या जगात नाही परंतु स्वर्गातून सुदर्शन चक्रासारखी फिरणारी बॅटची मजा अन शत्रूच्या चेंडूंना मिळणारी सजा पाहून संतोषला संतोष होत असेल.

3. पाची जगाचा राजा :

“माही” हा एकमेव भारतीय कप्तान आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप (2007), पन्नास षटकांचा वनडे वर्ल्ड कप (2011), चाम्पियंस ट्रॉफी (2013) वर कबजा केला. तसेच दोनदा आय पी एल विजेतेपद (चेन्नई सुपर किंग्स 2010 अन 2011), दोनदा चाम्पियंस लीग ट्वेंटी ट्वेंटी (2010 अन 2014) अश्या लढायाही धोनी ब्रिगेडने पादाक्रांत केल्या. त्याचा हा अश्वमेघ पाहता तो पाची जगाचा राजाच… म्हणूनच अंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या ICC “प्लेयर ऑफ द इअर अवार्ड”चा दोनदा मानकरी बनणारा धोनी हा एकमेव खेळाडू आहे.

4. स्टोरीसाठी चाळीस कोटी ? :

प्रचंड क्षमतेच्या हा प्रतिभावान खेळाडू सर्वांना हवा हवासा वाटतो. चित्रात बहिण जयंती अन भाऊ नरेंद्र बरोबर असणारा एकेकाळचा साध्या भोळ्या माहीचे आज करोडो फॅन्स आहेत व तो जाहिरातदारांच्या गळ्यातील ताईत आहे. यामुळेच कदाचित बॉलीवूडच्या नीरज पांडेंनी “धोनी : द अनटोल्ड स्टोरी” चित्रपट निर्माण करायचे डोक्यात घेतले असेल. सुशांत सिंग राजपूत धोनीच्या भूमिकेत. असे म्हणतात की या चित्रपटाचे सुरुवातीचे बजेट 80 कोटी अन त्यातले 40 कोटी फक्त नाव वापरण्यासाठी व आपली स्टोरी देण्यासाठी धोनीला देण्यात आले. हा भला मोठा आकडा बघता किती पैसे देण्यात आले हे एक गुपितच राहील असे वाटते. “एक अनटोल्ड स्टोरी…..”

5. माही रेसिंग टीम :

फुटबॉल, बॅडमिंटन मग क्रिकेट असा “खेळांचा प्रवासी” धोनी वेगावर फिदा. वेगवान मोटारसायकल्सचा ताफाच धोनीने बाळगलाय. 25 च्यावर एक से एक बढीया बाइक्स उसके खिदमतमें तय्यार.. दक्षिणपूर्व आशिया खंडात असणारी एकमेव “कॉन्फीडरेट x132 हेलकॅट” बाईक फक्त धोनिभाईकडेच. हर्ले डेव्हिडसन, डूकाटी तर केव्हाच घेतल्या आहेत. चार चाकी म्हणाल तर कोटी रुपयांची हमर एच 2 आहेच. तर अश्या या वेग वेड्याच्या वेग वेगळ्या दुचाकी अन गाड्या. त्यातच साउथ सिनेमास्टार अक्किनेन नागार्जुन बरोबर भागीदारी करत त्याने “सुपर स्पोर्ट्स वर्ल्ड चॅम्पियन” ही रेसिंग टीम खरेदी केली आहे अन त्याचे नामकरण “माही रेसिंग” असे ठेवले आहे.

दोस्तहो तिकीट गोळा करणाऱ्या ह्या आपलल्या हिरोने नंतर एअर इंडियामध्येही खेळाडू म्हणून थोडा काळ नोकरी केली. आज इंडिया सिमेंट या भल्या मोठ्या कंपनीचा तो व्हाईस प्रेसिडेंट आहे. प्रचंड कष्ट अन कल्पकता याचेच हे फळ ….

556 total views, 1 views today