समुहाने जगणे हे मनुष्य प्राण्यांचे एक वैशिष्ठ. समूहामध्ये भाग पाडून परत छोटे छोटे ग्रुप करणे ही पण खासियत. परंतु वेगवेगळ्या ग्रुप्स मधील वावर अन त्यामधील संदेशांची देवाण घेवाण कधीकधी अंगाशी येवू शकते. खासकरून व्हॉट्सअॅप वापरताना. म्हणजे एखादी नॉनव्हेज डिश शाकाहारी माणसाला खावू घालण्यासारखे…
परंतु चुकीची पोस्ट भलत्याच घरात गेल्यावर होणारे रामायण आता थांबणार आहे. व्हॉट्सअॅपने एक खास फीचर आणण्याची तयारी सुरु केली आहे, ज्याची प्रतीक्षा गेल्या कित्येक दिवसांपासून युझर्सना होती.
व्हॉट्सअॅप लवकरच रिकॉल फीचरची अपडेट जारी करणार आहे. यामुळे तुम्हाला सेंड झालेला मेसेज अनसेंड करता येईल. “व्हॉट्सअॅप बीटा इन्फो” च्या वृत्तानुसार लवकरच “आयओएस”साठी हे फीचर दिलं जाणार आहे. ज्यामुळे युझर्स सेंड झालेले मेसेजही डिलीट करु शकतील.
या फीचरमुळे डिलीट होण्यासोबत मेसेज नोटिफिकेशन सेंटरमधूनही गायब होतील. हे फीचर येणार असल्याचं वृत्त अनेकदा समोर आलं आहे. मात्र आता अनसेंड नावाने हे फीचर येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. You can now delete WhatsApp messages with this new feature.

व्हॉट्सअॅप सध्या या फीचरवर काम करत असून पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. लवकरच हे फीचर युझर्ससाठीही जारी केलं जाईल, असं ‘व्हॉट्सअॅप बीटा इन्फो’ ने म्हटलं आहे. व्हॉट्सअॅप बीटा इन्फो हे व्हॉट्सअॅपचं अधिकृत ट्विटर हँडल नाही. मात्र या ट्विटर हँडलद्वारे व्हॉट्सअॅप फीचर्सबाबत लीक रिपोर्ट दिले जातात.
पण दोस्तहो, ‘इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार व्हॉट्सअॅपचं अनसेंड फीचर केवळ पाच मिनिटांसाठी असेल. म्हणजे तुम्ही मेसेज सेंड करुन पाच मिनिट पूर्ण झाले असतील तर तुम्हाला तो मेसेज डिलीट करता येणार नाही. म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण येथे काम करणार नाही हे नक्की.

नवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.

505 total views, 1 views today