सलग पंचवीस आठवडे एखादा चित्रपट चालणे म्हणजे त्या चित्रपटाच्या निर्मात्याला, कलाकारांना आनंदाचा परमोच्च क्षण असतो. अशा कठीण गोष्टी वारंवार होत नाहीत. परंतू दादा कोंडके नावाच्या अवलीयाने एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल नऊ असे चित्रपट तयार केले की सर्व चित्रपट २५ आठवड्यांच्या वर हाऊसफूल्ल चालले. आजअखेर जगातील कोणत्याही कलाकाराने हा अद्भूत पराक्रम केला नाही. म्हणून तर गिनीज बूक मध्ये दादांचे नाव सूवर्णअक्षरामध्ये नोंदले आहे. दादांच्या या अनोख्या गोष्टी आठवण्याचा स्मार्टदोस्तनी केलेला छोटा प्रयत्न.

1. दादा मुळचे कृष्णा :

 गोकूळ अष्टमीला एका गिरणी कामगाराच्या घरी जन्मलेल्या या मूलाचे नाव घरच्यांनी ‘कृष्णा’ असे ठेवले. नावाप्रमाणेच या मूलाने नंतर जगात किर्ती मिळवली.

2. लहानपणीचा काळ चाळीत :

 लहानपणीचा काळ चाळीत काढणारा हा मूलगा अत्यंत कठीण परिस्थितीत वाढला. हा चळवळ्या मूलगा, लालबागमध्ये मारा-मार्‍यांमध्ये सुध्दा सतत असायचा. एका मूलाखतीत त्यांनी स्वत: केलेल्या मारामार्‍यांचे रसभरीत वर्णन केले आहे. ते म्हणतात, ‘‘लालबाग मध्ये कोणी वाकड्या नजरेने मूलीकडे पाहिले तर तेथे मी दढामदिशी हजर व्हायचो, मग काय सोडा वॉटरच्या बाटल्या, विटा, दगड.. तुम्ही नुसते नाव काढा मी सगळ्यांचा वापर केला आहे’’, असा हा कृष्णा सुरूवातीस मुळीच विनोदी नव्हता तर काहीसा गुंड प्रवृत्तीचा होता.

3. साधा कामगार ते विनोदाचा बादशाह :

 कृष्णाचे पैसे मिळवण्याचे साधन महिनाकाठी मिळणारा फक्त ६० रू. पगार होता. अपना बाझार या किराणा स्टोअर मध्ये कृष्णा काम करायचा. एक साधा कामगार म्हणून, विनोदाचा काडीमात्र संबध नसणारा. परंतू एका दुर्देवी वर्षी कृष्णाचे जवळपास सर्व नातेवाईक (फक्त मोठा भाऊ सोडून) एका मागोमाग वारले आणि कृष्णा अचानकच शांत झाला. या आघांतामूळे जीवनाबद्दल एक वेगळा विचार कृष्णामध्ये सुरू झाला. आणि देवांने दिलेले हे दु:ख इतरांच्या आयुष्यात येवू नये या विचाराने कृष्णा विनोदाकडे वळला. आता त्याचे ध्येय फक्त इतरांना विनोदाव्दारे आनंदी करणे हेच राहिले.

4. ‘विच्छा माझी पूरी करा’

फावल्या वेळात गल्लीतील ऑक्रेस्टामध्ये विविध वाद्य वाजवण्याचा प्रयोग कृष्णा करू लागला. आणि ‘विच्छा माझी पूरी करा’ या नाटकाव्दारे त्याने रंगमंचावर दमदार पदार्पण केले. हे पदार्पण येवढे दमदार होते की १५०० रात्री लोकांची विच्छा कृष्णाला पूरी करायला लागली. तेव्हाच कृष्णाचे रूपांतर दादांमध्ये झाले. असे म्हणतात की, ज्या गावात दादांच्या प्रयोग असायचा तेव्हा विच्छाच्या संचाला लॉजमालक खोल्या द्यायला साशंक असत. कारण एकच अफाट उत्साही चाहत्यांची गर्दी काहीवेळा हाताबाहेर जायची.

5. प्रेक्षकांची पकडली नाडी :

एका चाळीतून आलेल्या या मूलाने ७० ते ८० च्या दशकात बेभान काम केले व उभ्या महाराष्ट्राचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केला. साधीसूधी कहाणी, ठरावीक कलाकारांच्या संच, आणि प्रेक्षकांची पकडलेली नाडी या जोरावर दादांनी महाराष्ट्रावर राज्य केले. विषेश म्हणजे अभीनया बरोबरच, लेखक, निर्माता, स्क्रिप्ट रायटर, या सर्व बाजू दादांनी सांभाळल्या. गाणी लिहताना प्राण्यांच्या चांगल्या गुणांवर दादांनी स्वत: अनेक गाणी लिहली, जी महाराष्ट्रात प्रचंड गाजली.

859 total views, 1 views today