दसरा, दिवाळी अन नागपंचमी. वेगवेगळ्या सणांना आपल्याकडे काही तोटा नाही. सण पण कसे नानावीध प्रकारचे. रंगात रंगायची रंगपंचमी तर तोंड गोड करणारी संक्रांत. अगदी उत्साहात आपण सारे हे सण साजरे करतो. जगभर पण असेच असते. सण म्हणजे भावनांचा जल्लोष.
पण जगात काही देशात अगदीच विचित्र सण साजरे केले जातात. स्मार्टदोस्तने अशाच वेगळ्या सणांची यादी बनवली आहे. वाचा तर 5 मजेशीर सणांची माहिती. फक्त वाचा साजरे मात्र करू नका.

1. रडणाऱ्या बाळांचा उत्सव : जपान

कोनाकी सुमो नावाच्या या सणामध्ये लहान लहान बाळे गलेलठ्ठ सुमो पैलवानांच्या हातात दिली जातात. ज्या कोणाच्या हातात दिलेले बाळ आधी रडेल त्याला विनर घोषित केले जाते. रडल्यामुळे बाळांची वाढ चांगली होती आस समज जपानमध्ये आहे. त्यामूळेच आपल्या नवजात शिशूंना राक्षसांसारख्या सुमोच्या नाजूक हातात देण्याचे धाडस जपानी पालक करतात. आपल्यां डोळ्यासमोर सुमोचे महाडोके बघितल्यावर कोणते बाळ रडणार नाही?

2. मरण साजरे करायचा उत्सव : स्पेन

फिएस्टा डी सांता मार्टा डी रीबर्तेम या नावाने ओळखला जाणारा एक वेगळा महोत्सव स्पेन मध्ये साजरा केला जातो. पुनर्जन्म होऊन आलेल्या लोकांची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. लास निव्स टाऊन मध्ये शवपेटीमध्ये झोपवून लोकांची अक्षरशः अंत्ययात्रा कधी जाते. अगदी कब्रस्तानापर्यंत यात्रा नेवून नंतर आशीर्वाद दिले जातात.

    3. माकडांसाठी बफे जेवणाची दावत : थायलंड

नावावरूनच समजले असेल, ही माणसांसाठी नसून तर वानर सामुहासाठीची पार्टी आहे. हेतू चांगलाच आहे. हनुमान देवाच्या या सेनेसाठी साजरा केला जाणारा सण प्रवाश्यांचे एक आकर्षण असते. वेगवेगळी फळे, पालेभाज्या व आवडते पदार्थ मांडून ठेवल्यावर माकड कंपू त्यावर तुटून पडतात. माणसाळलेली ही सेना हजर असलेल्या लोकांचे भरपूर मनोरंजन करतात.

4. बकरे टाकण्याचा उत्सव : स्पेन

बहुदा स्पेनमध्ये बरेच आगळे वेगळे सण साजरे करतात असे वाटते. पहा ना बकरे उंचावरून फेकणे हा काही सांगण्यासारखा उत्सव नाही. म्हणूनच स्मार्टदोस्तने यादीत याची नोंद केलीय (?) जानेवारीच्या चौथ्या रविवारी मँग्यासेंस टाऊनमध्ये सेंट विन्सेंट डी पॉलना समर्पित हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गावातल्या चर्चच्या घंटाघराच्या टॉवरवरून सुमारे 50 फुटांवरून बकऱ्यांना फेकले जाते. खाली उभे असलेल्या लोकांनी वरून जोरात खाली येणाऱ्या बकऱ्याला मग झेलायचे असते. निट झेलता आले नाही तर…. खैर नाही. बकऱ्याची.. अन बकरे डोक्यावर पडलेल्या माणसाची.
बकरे डोक्यावर पडलेला माणूस ? ? ?

5. बेबी जंपिंग सण : परत स्पेन

कास्त्रीलो डी मूर्शिया हा छोट्याश्या वाडीवजा गावामध्ये साजरा केला जाणारा उडया मारायचा सण. कोणी म्हणेल त्यात काय एवढे? उडी तर मारायची आहे. पण नाही येथे उडयां वर उडया मारायच्या नाहीत तर लहान लहान बाळांवरून उडया मारायच्या आहेत. लहान लहान बाळांना गादीवर झोपवून राक्षसासारखा मुखवटा तोंडाला लावून पळत येत बाळांच्यावरून उडी मारणाऱ्या माणसाचे नुसते चित्रच बघून विचित्र वाटते तर त्या बाळांच्या आई वडिलांना प्रत्यक्ष तेथे काय वाटत असेल?

537 total views, 1 views today