पुनर ये चक्रुः पितरा युवाना सना यूपेव जरणा शयाना |
ते वाजो विभ्वां रभुर इन्द्रवन्तो मधुप्सरसो नो ऽवन्तु यज्ञम ||

अर्थ : ज्या “रभू”नी आपल्या वृध्द पालकांना पुन्हा तरुण केले त्या “रभू”नी यज्ञाला यावे हे अवाहन.

ऋग्वेदामधील ४थ्या भागातील ३३व्या श्लोकातील ह्या ओळी… दोस्तांनो ज्यांनी यज्ञाला यावे असे आवाहन करण्यात आले आहे ते “रभू” कोण याचे कोडे तुम्हाला कदाचित पडले असेल. तर हे “रभू” म्हणजे तीन भाऊ (वज्र, विभू अन रभू), ज्यांच्याबद्दल कण्व, अंगिरस, विश्वामित्रांसारख्या सात प्रसिद्ध ऋषींनी वेगवेगळ्या काळात गुणगान गायले होते ते, ज्यांनी 25000 वर्षापुर्वी प्राण्याच्या DNA मधील सेल्स वापरून तसाच दुसरा प्राणी तयार केला होता ते.

एका शास्त्रीय कॉन्फरन्समध्ये सन 1971 ला डॉक्टर वर्तक यांनी ही माहिती दिली. तेव्हा लोकांनी त्याना वेड्यात काढले पण गम्मत म्हणजे सोकॉल्ड प्रगत मानवाने 1997 साली डॉली नावाची क्लोन मेंढी तयार केली. अगदी पुराणात दिलेल्या डीटेल्सप्रमाणे… स्मार्टने डॉ. वर्तक यांनी उल्लेख केलेली माहिती तुमच्यापुढे मांडली आहे. वाचली तर तुम्हालाही वाटेल की पुरातन भारतात क्लोनीग होत होते…

1. डॉली नव्हे तर विश्वरूपा : ऋग्वेद 1-20-3

गायीच्या पाठीवरील त्वचेच्या पेशी वापरून क्लोन केलेल्या विश्वरूपा नावाच्या गायीचा उल्लेख ऋग्वेदात आहे. विशेष म्हणजे ज्या पद्धतीचा वापर करून ही गाय तयार केली ती पद्धत अन सध्या क्लोनिगसाठी वापरतात ते तंत्र सेम आहे. शरीरातील जिवंत पेशीमधील उच्च दर्जाच्या पेशी बाजूला काढून त्याच्याद्वारे नविन जीव निर्माण करणे म्हणजे क्लोनिग. रभूनी याच पद्धतीचा वापर केला होता हे वाचून मती गुंग होते. पेशीचे विभाजन करून एकापासून चार जिवंत बीजांड (zygote) लहान भाऊ विभूने तयार केल्याचा उल्लेख म्हणजे पुरातन भारतीय, प्रगत भारतीय होते असा अर्थ आहे का?

रभवो गामपिंशत सं निश्चर्मण वत्सेनास्र्जता मातरं पुनः |
सौधन्वनासः सवपस्यया नरो जिव्री युवाना पितराक्र्णोतन ||

2. हरीचे क्लोन : (1-161–7)

रभू भावंडानी इंद्रासाठी एक ताकदवर घोडा तयार केला होता. इंद्राचा रथ ओढण्यासाठी या हरी नावाच्या घोड्याचा वापर होणार होता. परंतु रथासाठी आणखी एका घोड्याची आवश्यकता असल्याने रभूनी हरीच्या गुणसूत्राचा वापर करून हरीच्या ताकदीचा दुसरा घोडा क्लोन केला. नंतर या दोन्ही अश्वांना रथास जोडण्यात आले अशी एक नोंद पुराणात आहे.

कोणी म्हणेल ह्या सगळ्या पुरावा नसलेल्या स्टोरीज आहेत. या वादात आपण पडायला नको. पण 25000 वर्षापुर्वी नोंद केलेले हे उल्लेख अन बारकावे आजच्या क्लोनिग तंत्राशी मिळतात हे मात्र नक्की.

3. पेशी विभाजन अन टेस्ट ट्यूब बेबी :

डॉ. वर्तकांच्या मते रुग्वेदामध्ये (1-110-3) तसेच महाभारतात सध्याच्या मेडिकल सायन्स मधील टेस्ट ट्यूब बेबीसारखाच उल्लेख आहे. द्रुपद राजाला एक धुरंदर मुलगा हवा होता. त्याला अनेक मुलगे होतेही पण द्रोणाचार्याला हरवू शकेल असा एकही नव्हता. द्रुपदाने “यज” आणी “उपयज” ऋषींना एका ताकदवर मुलाची निर्मिती करायला सांगितली. या ऋषींनी द्रुपदाच्या शुक्राणूंचे विभाजन करून त्यातील सर्वोत्तम गुणांना वेगळे केले. येथे “23 गुणविधी” हा शब्द वापरला आहे. दोस्तहो हा नंबर महत्वाचा आहे. कारण आधुनिक सायन्सने हे दाखवून दिले की मनुष्याच्या सेल्समध्ये 23 क्रोमोझोम्सच्या जोड्या असतात. त्यातील एक जोडी मुलगा होणार की मुलगी हे ठरवतात. व उरलेल्या 22 जोड्या क्वालिटीज म्हणजे “गुण” अन क्रिया “विधी” ठरवतात. (शाळेत शिकलो ते एक्स वाय आठवते का?) ऋषींनी पाहिजे ते चांगले सेल्स बाजूला काढले अन राणीच्या गर्भात त्याचे प्रत्यारोपण करायचे ठरले. पण राणीने ऐनवेळी नकार दिला तेव्हा सध्या प्रगत जगात करतात तसे “सरोगेट मदर”चा वापर करण्यात आला असा उल्लेख आहे.

 4. वादग्रस्त मानवी क्लोनिग :

 

जिवंत मेंढीपासून डॉली मेंढी तयार केली हे पाहिले. जुरासिक पार्क नावाच्या चित्रपटात डायनोसॉरच्या फ्रोझन रक्त पेशीचा वापर करून नवीन डायनोसॉर तयार केले हे ही पाहिले. पण मानवाच्या पेशी वापरून नवीन क्लोन माणूस कोणी तयार केला नाही. म्हणजे तसे करावे का हा वाद आहे. परंतु भगवतगीतेमध्ये (4/15) तसा उल्लेख आहे. विणा नावाचा एक चांगला राजा कालांतराने राक्षशी बनला. रागावून धरतीमातेने पिक उगवायचे थांबवले. त्यामुळे ऋषींनी राजाला ठार मारले. अन ठरल्याप्रमाणे लगेचच त्याच्या शरीरातील गुणसूत्रांपासून “पृथू” नावाचा चांगला मुलगा तयार केला. त्याने भूमातेला पूर्वपदावर आणले म्हणून तिला “पृथ्वी” असेही म्हणतात. नंतर त्याच पेशीपासून एक मुलगीही तयार करण्यात आली. पुरुषामध्ये एक्स आणी वाय अशी दोन्ही गुणसूत्रे असतात अन ते योग्य रीतीने सेपरेट केल्यास मुलग्याला वा मुलगीला जाणीवपूर्वक जन्म देता येतो हे तेव्हा माहित होते असा उल्लेख बरेच काही सांगून जातो.

5. अहिरावण व महिरावण : रक्तापासून क्लोन

ऐकायला विचित्र व काल्पनिक वाटते. पण परत एकदा बघुया काय माजरा आहे ते. अहिरावण व महिरावण दोन राक्षस. युद्धामध्ये सांडलेल्या त्यांच्या रक्तापासून ते त्याच्यासारख्याच राक्षसांची फौज तयार करायचे म्हणे. परंतु सन 2013 मध्ये जपानच्या शास्त्रज्ञांनी रक्ताच्या एका थेंबापासून एका उंदराच्या 600 कॉपीज तयार केल्या अशी माहिती “जर्नल ऑफ बायोलॉजी ऑफ रीप्रॉडक्शन” या शास्त्रीय मासिकात प्रसिध्द झाले. बी. बी. सी. ने यावर भालीमोती न्यूज दिली. रक्तातील पांढऱ्या पेशीपासून हे शक्य आहे असे म्हटले. अहिरावण व महिरावण जरी काल्पनिक आहेत असे कोणाला वाटत असेल तरी हजारो वर्षांपूर्वीचा हा उल्लेख आधुनिक सायन्सला मिळता जुळता…

Source: Medical Science from ancient Indian Shastras.

936 total views, 3 views today