सौंदर्य प्रसाधनांच्या जाहीरातबाजीमूळे क्रिम आणी क्लिनसरमूळे चेहर्‍याची त्वचा सुंदर होते असा काहीसा समज होत आहे. कंपन्यांच्या मोठमोठ्या दाव्यांमध्ये काही खरे  असेल ही, परंतू हे अर्धसत्य आहे कारण चेहर्‍याची सुंदरता आपण काय खातो त्यावरसुध्दा अवलंबून असते. निसर्गांने मानवाला अगणीत सौंदर्यसाधने दिली आहेत. काही फळे देखील आपली त्वचा सुंदर बनवण्यास अंत्यंत गुणकारी असतात. स्मार्टदोस्तने अशाच ५ फळांची यादी केली आहे, जी तुम्हाला सुंदर त्वचा देतील.

१) पपया :

 पपयांना ‘‘व्हिटॅमीन फ्रूट’’ असेही समजले जाते. व्हिटॅमीन ए, सी, आणि ई ने भरपूर असलेल्या या फळाला ऍन्टीऑक्सीडेंट चा कारखानाच म्हटले जाते. याचा अर्थ त्वचेमधील विषारी तत्वे कमी करून चेहरा उजळवण्यास पपया मदत करतात. नैसर्गिक अल्फा हैड्रॉक्सी ऍसीड (Aha) ने परिपूर्ण पपया निसर्गाचे बाजारू स्किन क्रिमला दिलेली उत्तर आहे. पपयांच्या गरांचा फेशीयलसाठी वापर केल्यास चेहर्‍यावरील काळसर डाग कमी होण्यास मदत होती. एक चांगले मॉइश्‍चराझर म्हणून पपया फार उपयोगी आहेत.

२) संत्री :

व्हिटॅमीन ‘सी’ ने भरपूर संत्र्याचे वैशिष्ठ म्हणजे संत्र्यांच्या सालींमध्येसुध्दा आवश्यक तत्वे, न्यूट्रीयंटस असतात. सॅलडमध्ये सालींचा किस घालून चव वाढवण्यास काहीच हरकत नाही फेशीयल करण्यासाठीही सालींचा वापर केला जातो. मूख्य म्हणजे संत्र्याचा खाण्यात वापर, हवेतील विषारी तत्त्वे जी तुमच्या चेहर्‍यावर सुरकूत्या पाडते त्याविरूध्द लढण्यास मदत करते. म्हणजे खाण्यातून आणि बाह्य उपचारातून संत्रे चेहर्‍यासाठी फार उपयोगी आहे.

३) स्ट्रॉबेरी :

भारतीय बाजारामध्ये स्ट्रॉबेरीचा शिरकाव जोरदार झाला आहे. त्यामूळे चेहरा सुंदर ठेवण्यासाठी आपल्याला आणी एक नैसर्गिक उपाय मिळाला आहे. चेहर्‍यांवरील मुरूमे, काही प्रमाणात होणारी रखरख कमी होण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि गूलाबपाण्याचा वापर केला जातो. सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून बचाव करणारे इलॅजीक (ellagic) ऍसीड असल्यामूळे स्ट्रॉबेरी तूमच्या खरेदी लिस्ट मध्ये नक्की असू द्या.

४) चेरी :

बाजारात सहजासहजी न मिळणारे परंतू चौकशी केली तर नक्की मिळेल असे फळ. हॉटेलला खाद्यपदार्थ पूरवणार्‍या दूकानांमध्ये जरूर मिळेल असे हे ऍन्टी ऑक्सीडंट ने भरलेले फळ, सुरकूत्या नसलेला चेहरा हवा असल्यास चार-पाच चेरींचा गर कुटून त्याचे मिश्रण त्वचेवर लावा. सुरकूत्या कमी होण्यास वा सुरकूत्या लवकर न येण्यास मदत होती. व्हिटॅमीन ‘सी’ असल्यामूळे लाल चुटूक गोडसर चेरी तोंडात टाकण्यास काहीच हरकत नाही.

५) केळी :

बर्‍याच जणांना/ जणींना केळी या फळा बद्दल अकस असतो. परंतू व्हिटॅमीन ‘सी’ आणि बी ६ (B6) असलेले हे फळ चेहर्‍यासाठी खूप उपयोगी आहे. ७५% पाणी असलेले हे फळ चेहर्‍यातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थीत राखण्यास मदत करते. केळ्याचा फेशीयला मध्ये वापर केल्यास चेहर्‍याचे ओघळणे थांबून, मऊ  मुलायम त्वचा मिळण्यास मदत होती.

1,245 total views, 2 views today