आपल्या भारतात प्रेमात पडलेल्या मुला मुलींना लग्नाची स्वप्नेपण आपसूकच पडतात. या प्रेमाच्या कहाणीचे हॅपीवाले एंडिंग व्हावे अन दोघांनी लग्न करून सुखाने संसार करावा असे वाटणाऱ्यांची संख्या अगणित आहे. पण त्याचबरोबर प्रेमात पडून फसलेल्यांची संख्याही अगणितच आहे. थोडक्यात काय तर प्रेमाचे गणित औरच आहे. “आकाशातून चंद्र तारे आणून देण्याचे वादे करणारा “तो” खरोखरच वादा निभावेल का अशी शंका असणाऱ्या मुलींसाठी ही चेकलिस्ट..

प्रेमात पुढे सांगितलेली लक्षणे जर दिसून येत असतील तर… वागा जरा जपून..

1. भविष्याच्या प्लॅनिंगला नकार :

प्रेम आंधळे असते असे म्हणतात. सुरुवातीला जरी तुम्ही आंधळेपणा दाखवला असला तरी रिलेशन पुढे नेताना डोळसपणा दाखवायला हरकत नसते. आयुष्यभर नूसतेच फिरणे अन गिफ्ट घेणे जमणार नाही. तेव्हा भावी आयुष्याबद्दल “त्या”च्या बरोबर चर्चा करा. जर तो चर्चा टाळत असेल व तुम्हाला उडवा उडवीची, गुळमुळीत उत्तरे देत असेल, तर गडी रिलेशनबद्दल जास्त सिरीयस नाही हे जरूर समजा.

2. ओळख करून देण्यास टाळाटाळ :

तुमच्या बरोबर आयुष्य घालवण्याचे स्वप्न दाखवणाऱ्याने कधीतरी तुमची ओळख मित्रांना, घरच्यांना करून देणे आपेक्षित आहे अन हे नैसर्गिक आहे. भविष्य एकत्र घडवण्यासाठी तुमच्या मैत्रीची जाणीव त्याने इतराना करून देणे गरजेचे आहे. जर तुमच्या दोघांच्या मैत्रीबद्दल “तो” जाणीवपूर्वक लपवा लपवी करत असेल तर वेळीच विचार करा.

3. बिझी असल्याचा बहाणा :

त्याचे स्वतःचे एक वेगळे लाईफ आहे हे लक्षात असुद्या. त्याच्यावर सारखा हक्क दाखवणे त्याला आवडणार नाही. परंतु तुमच्या फोनला, हाकेला तो वांरवार उत्तर देत नसेल, आपल्या मित्रांबरोबरच वेळ घालवणे तो पसंत करत असेल तर त्याचा तुमच्यामधील इंटरेस्ट कदाचित कमी झाला आहे का हे जरूर पहा…. “समझने वालोंको इशारा काफी है…”

4. वारंवार हेकेखोरपणा :

जर तुमचा साथीदार तुमचा, तुमच्या विचारांचा आदर करत असेल तर नक्कीच एखाद्या गोष्टीवर तुमचे म्हणणे काय असेल किंबहुना आहे. याबाबत विचार करेल. तुमच्याकडून सल्ला जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखवेल. मात्र तसे होत नसल्यास तुमच्या मतांचा विचार केलाच जात नसल्यास त्याच्या आयुष्यातील तुमचे स्थान विचार करायला लावणारे आहे. हे नक्की जाणून घ्या.

5. मूड स्विंग :

तुम्ही दोघे एकमेकाना बराच काळ ओळखता. त्यामुळे त्याच्या मूड मध्ये झालेला फरक सुद्धा तुम्हाला जाणवता यायला पाहिजे. हल्ली उगाचच “तो” जास्त स्टायलिश वागायला लागला, कारण नसताना जास्त शायनिंग करायला लागला, दुसऱ्याच मुलीबद्द्ल तुमच्याशी बोलू लागला तर स्वारी बदलू लागलीय हे ओळखा.

तसेच तो वांरंवार साध्या सध्या गोष्टीबद्दल “चिडचिड” करू लागला तर तुमच्या प्रेमाची “चिव-चिव” कमी होत आहे हे जरूर समजा. वादा वादी करणाऱ्या बरोबर “वादा किया तो निभाना पडेगा…” असे मनाला समजावून कानाडोळा करू नका

1,139 total views, 3 views today