Category: हेल्थ

भिजवलेल्या बदामांचे 5 आरोग्यदायी फायदे

बदाम म्हटलं की स्मार्टला आठवतात ते अडॅम अन इव्ह. प्रेमाचा प्रतिक बदाम. असो आता आपण त्या प्रेमाबद्दल बोलायचे नाही तर बदामा बद्दल बोलायचे आहे. म्हणजे बदाम नावाच्या कुरकुरीत ब्राउनी नट्स बद्दल. काही स्त्रीवर्ग त्याला खिरीत घालून नवरोबाला अर्पण करतात तर काही बाबा लोक सर्वांगाला चॉकलेट लावलेले बदाम बेबी लोकांना. कदाचित प्रेमाची सुरुवात पोटातून होते यावर त्यांचा ठाम विश्वास असेल. असो आज बदामाच्या हेल्दी फायद्याबद्दल बोलायचे आहे. बदाम हेल्थ साठी फार उपयोगाचा आहे हे हजारो वर्षापासून जगाला माहित आहे. पण जाता येता वाळके बदाम खाण्यापेक्षा भिजवलेले बदाम खाणे कधीही फायद्याचे असे नेट वर वाचले. रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून...

Read More

परफेक्ट बॉडीसाठी जीममध्ये जाताना स्वत:च्या या 5 गोष्टींची लाज वाटणे थांबवा

टोन्ड बॉडी, झिरो फिगर अश्या शब्दांची सध्या चालती आहे. प्रत्येक पुरुषाला चवळीची शेंग पाहिजे असते अन बहुतांशी महिलावर्गाची स्वतःच्या बॉडी फॅट बद्दल एक वेगळीच आवड निवड असते. आपल्या नको तिथे वाढणाऱ्या शरीराचे काय करायचे या विचारात अनेक भगिनी जीमिंगचा पर्याय निवडतात. तर “To get perfect body” अनेक बंधू बॉडी बनवायला भली मोठी फी भरून जिममध्ये नाव नोंदवतात. अन सुरु करतात एक प्रवास नवीन बांधा बनवायचा. ही एक चांगली गोष्ट जरी असली तरी अनेक जीमर्सना त्याचा हवातसा इफेक्ट मिळत नाही. कारणे अनेक असतील पण त्या सर्वांमधील महत्वाचे कारण म्हणजे जिम मध्ये जाताना वाटणारी स्वतःची लाज. जीममध्ये जर प्रथम जाणार असाल...

Read More

हार्ट अटॅकच्या या लक्षणांकडे कधीच दुर्लक्ष करू नका.

हार्ट अटॅक हा कोणालाही आणि कुठेही येऊ शकतो. बऱ्याचवेळा हार्ट अटॅक येण्यापूर्वी तो आपल्या आगमनाची रुग्णाला अनेक लाक्षणाद्वारे जाणीव करून देतो. म्हणूनंच हार्ट अटॅकच्या नेमक्या लक्षणांबाबत स्मार्टदोस्तने गोळा केलेली माहिती कदाचित तुम्हाला उपयोगी पडेल. हार्ट अटॅक दरम्यान एक किंवा त्यापेक्षा अधिक लक्षणं आढळू शकतात. म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या मनाने काही औषध किंवा घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा तात्काळ वैद्यकीय मदत घ्या. 1. घाम – ह्द्याला पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनमध्ये अडथळा आल्यास त्याचे संकेत मेंदूला पोहचवले जातात. ह्द्याचे कार्य सुरळीत ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये शरीरातून घाम वाहण्याचे प्रमाण वाढते. शरीरात काही बिघाड झाल्याचा हा एक संकेत असतो. त्यामुळे हार्ट अटॅकच्या वेळेस खूप...

Read More

लिंबूपाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे

सकाळी उठल्यावर दिवसाची सुरवात कडक चहा वा कॉफीने करणाऱ्या परंतु हेल्थचा पण विचार अधुनमधून करणाऱ्यासाठी ’स्मार्ट दोस्त’ ने शोधून काढलेली लिंबू पाण्याची किमया सांगणारी यादी. लिंबू म्हणजे न्युट्रीशियनने भरलेला एक छोटा बॉम्बच. ज्यामध्ये व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर असते. अन हो एखाद्या सफरचंद वा द्राक्षांपेक्षा जास्त पोटॅशियम लिंबामध्ये असते असेही आढळून आले आहे. दोस्तहो.. लिंबू पाणी म्हणजे ग्लासभर शुध्द व कोमट पाणी ज्यामध्ये अर्धा लिंबाचा रस.. हे लक्षात असूद्या. नुसता लिंबू खाणे आपल्या दातांच्या इनॅमलला (आवरण) हानिकारक होवू शकते म्हणून लिंबूरस डायरेक्ट न पिता त्यामध्ये कोमात पाणी मिसळून पिणे योग्य. बरेच लोक जेवण झाल्यावर ताटातल्या...

Read More

सकाळी सकाळी या 5 गोष्टी करू नका

कराग्रे वसते लक्ष्मिः करमध्ये सरस्वति । करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥ हाताच्या बोटांच्या टोकांवर लक्ष्मी, तळव्यामध्ये सरस्वती, मनगटात गोविंद असल्यामुळे सुप्रभाती म्हणजे सकाळी सकाळी जागे झाल्यावर हाताचे दर्शन घ्यावे, नामस्मरण करावे व दिवसाची सुरुवात करावे. असा प्रघात होता. काही घरांमध्ये असेलही. परंतु जागे झाल्यावर बेडमध्येच “करमध्ये मोबाईल” घेवून “प्रभाते व्हॉटसअॅप, फेसबुक दर्शनम” करणारे अनेक. असो. परंतु हे करण्याने वा “प्रभाते परत लोळनम” केल्याने दिवसाची वाट लागू शकते हे अनेकाना पटले आहे. म्हणूनच जागे झाल्यावर कोणत्या 5 गोष्टी नक्की करायचच्या नाहीत याची नेटवरून गोळा केलेली माहिती तुमच्या समोर ठेवत आहे. दिवस नक्की चांगला जाईल. 1. बेडवरून जिममध्ये : अनेक...

Read More

उपाशीपोटीची खरेदी महाग : खरेदीचे 5 रुल्स

खरेदीसाठी सतरा पिशव्या घेवून आठरा दुकाने फिरायचे दिवस आता गेले. आता एकच गाडी (पिशवी नव्हे) घेवून डिपार्टमेंट स्टोअरच्या समोर मिळेल तेथे पार्क करायची, मग लाईनमध्ये गुमान उभे रहायचे, अंगावरून त्या सुरक्षारक्षकाकडून बॉम्ब डिटेक्टर फिरून घ्यायचा, आत जायचे अन मग …. बाबा गाडी सारखी बास्केट गाडी धरून फिर फिर फिरायचे. इकडून तिकडे, तिकडून इकडे मग ट्राफिक जाम असेल तर इकडून इकडे. असेच काहीतरी. जे काही दिसेल त्यात हात घालायचा. पायात घालायच्या पँटसाठी अन पाय ज्यावर ठेवतो त्या पायपुसणीसाठी वेगळा साबण, साडीसाठी सॉफ्ट, शर्टसाठी हार्ड अन कॉलर साफ करायसाठी वेगळा साबण घेता घेता खिसा कधी साफ होतो हे कळत देखील नाही....

Read More
  • 1
  • 2