Category: रहस्यमय

Aarushi Murder Mystery : 5 न सुटलेले प्रश्न

15 मे 2008 ला चौदा वर्षाच्या आरुषीचा थंड डोक्याने बेडरूम मध्ये, एखादा डॉक्टर ऑपरेशन करताना वापरतो तश्या शस्त्राने खून केला गेला…त्यांच्याच घरात राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षाच्या हेमराज नावाच्या घरगड्याने आरुषीला मारले असा संशय आई वडिलांनी व्यक्त केला. परंतु दुसऱ्याच दिवशी टेरेसवर हेमराजचे पण मृत शरीर सापडले…म्हणजे खुनी हेमराज नव्हता तर कोणी दुसराच होता. परंतु ज्या रात्री घरात दोन खून झाले त्या रात्री घरात फक्त आरुषीचे डॉक्टर आई वडील होते. अन घराचे दरवाजे पण आतून बंद होते. मग दोन खून केले कुणी? Unsolved questions of Aarushi Murder Mystery.. नॉयडा पोलीस, सी.बी.आय. ज्या प्रश्नांचे उत्तर देवू शकले नाही अश्या जगावेगळ्या मर्डर मिस्टरीने...

Read More

भुवया नसलेल्या मोनालिसाच्या 5 विलक्षण बाबी

गेली 500 वर्षे मंद स्मित हास्याने जिने जगाला भुरळ पाडली ती.. 2015 साली जी 5120 कोटी 41 लाख रुपयांची.मालकीण होती ती…मोनालिसा..भुवया नसलेली मोनालिसा.. दोस्तहो, प्रख्यात चित्रकार लिओनार्डो द विन्चीने 1503 साली रंगवायला सुरु केलेले जे चित्र 1517 साली पूर्ण झाले त्या “मोनालिसा” पेंटिंग बद्दल आज स्मार्ट लिहतोय. मोनालिसा कोण होती पासून आज ती काय आहे हे सारे तुम्ही वाचणार आहात या विलक्षण यादी मध्ये…strange facts of Monalisa in Marathi.. आशा आहे तुम्ही ही विलक्षण पण सत्य गोष्ट नक्की शेअर कराल. 1. मोना डार्लिंग मोनालिसा “यादों कि बारात” पिक्चर मध्ये अजितचा फेमस डायलॉग आठवला. आपल्या पार्टनरला “मोना डार्लिंग”, “मोना डार्लिंग”...

Read More

1.5 लाख कोटीचा खजिना : पद्मनाभ मंदिराच्या पाच अजब कथा

दोस्तहो जर कोणी तुम्हाला सांगितले की पुऱ्या भारतातील लोकांचे जे उत्पन्न आहे ते एका मंदिराच्या खजिन्यापेक्षा कमी आहे तर ते कदाचित तुम्हाला पटणार नाही. परंतू हे सत्य आहे. गिनीज बुकच्या मते केरळ व तामिळनाडूच्या बोर्डरवरील थिरुअनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातल्या खजिन्याची किंमत एक ट्रीलीयान डॉलर्स पेक्षा जास्त आहे. आपल्या भारतातील प्रत्येक माणसाच्या उत्पन्नाची जर बेरीज केली तरी ती पद्मनाभस्वामी मंदिराच्या खजिन्यापेक्षा कमी असेल. मित्रहो अजब वाटेल पण एक लाख विस हजार कोटीच्या हा सारा खजिना हजारो वर्षे  जमिनीखाली पडून होता. जो कोणी खजिन्याच्या खोल्या उघडेल त्याचा विनाश होईल हा भयंकर शाप खजिन्यापासून लोकांना दूर ठेवत होता. वाचा तर जगातील सर्वात...

Read More

अपोआप आग लागणाऱ्या माणसांच्या 5 सत्य नोंदी

दक्षिण भारतातील विल्लुपुरममधल्या किल्पाक मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटल एका अनोख्या गोष्टीमुळे त्या दिवशी चर्चेत आले.. सकाळी सकाळीच चार महिन्याच्या चिमुरड्या राहुलला त्याची आई राजेश्वरी एकदम क्रिटीकल कंडीशनमध्ये दवाखान्यात घेवून आली. बाळाच्या अंगावर भाजल्याच्या खुणा होत्या. पोलिसांना राहुलच्या आई वडिलांवर संशय होता. पण राजेश्वरीने जे कारण सांगितले ते डोके चक्रावणारे होते. तिच्या मते राहुलला अपोअपो आग लागली होती. शांत राहुलचे अंग अचानक तापू लागले अन त्याच्या शरीरातून धूर येवू लागला. जणू शरीराच्या आत आग लावली असेल. मेडिकल चेकअप नंतरसुद्धा राहुलच्या अंगावर जळालेल्या खुणा का होत्या ते डॉक्टर नीटसे सांगू शकले नाहीत. पण एका डॉक्टरच्या मते ही एक “Spontaneous human combustion” ची...

Read More

कैलास पर्वत एक मानवनिर्मित पिरॅमीड असेल का? – 5 शंका

दुसऱ्या जागतिक युद्धाचा काळ. जगावर राज्य करण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या नाझींना त्यांच्यात आर्यांचे रक्त आहे व अर्यांकडे दैवी शक्ती असते असे वाटत होते. जगावर हुकुमत गाजवताना याच दैवी शक्तीचा उपयोग करता येईल असे त्यांच्यापैकी काहींना वाटत होते. म्हणूनच मूळ आर्यांच्या शोधासाठी आर्यांच्या उगमस्थानामध्ये म्हणजेच हिमालयाच्या शिखरांमध्ये नाझी नेता हेन्रिक हिमलर अनेक तिबेटी साधुंना भेटून गेला होता ही गोष्ट युद्धानंतर जगभर झाली. अन साऱ्या जगाचे लक्ष हिमालयाच्या या भागाकडे वळले. ज्या प्रदेशात हिमलर गेला होता त्या प्रदेशांत अतिप्राचीन मनुष्य वस्ती होती व आकाशातल्या देवाशी त्यांचे कनेक्शन राहावे म्हणून या लोकांनी हिमालयातील या ठिकाणी एक भले मोठ्ठे पिरॅमिड बांधले असे सांगणारे...

Read More

हवा नसताना चंद्रावर फडफडणारा झेंडा : चंद्रावर मानव उतरला नसण्याच्या 5 शंका

असे म्हटले जाते की सन 1969 हे वर्ष अखिल मानव जातीच्या इतिहासातील एक महत्वाचे वर्ष आहे कारण त्या वर्षी अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉग आणि त्याचा साथी आल्ड्रिन याने चंद्रावर मानवाचे पहिले पाउल उमटवले. पृथ्वीवरून रॉकेटने चंद्राजवळ जावून नंतर दुसऱ्या यानात बसून चंद्रावर उतरणे, काम करणे आणी परत मूळ यानात बसून पृथ्वीवर येण्याचा विलक्षण पराक्रम अमेरिकेने केला आणि साऱ्या जगाला सुपर पॉवर कोण आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. खरोखरीच ग्रेट आहे असे आपण म्हणू शकतो परंतू जवळ जवळ 20 टक्के अमेरिकन्सचा यावर विश्वास नाही. त्यांच्या मते सर्व जगाला फसवण्यासाठी आणि रशियापेक्षा आपण कसे प्रगत आहोत हे दाखवण्यासाठी अमेरिकेने केलेली ही...

Read More
  • 1
  • 2