Category: प्रवास

जीवनात एकदातरी अनुभवा हे भारतातले 5 अतिसुंदर धबधबे

पाण्याशी खेळायला कोणाला आवडत नाही? बाथरूममध्ये शॉवर खाली “थंडे थंडे पानीसे नहाना चाहिये…” असे गुणगुणत (अन पाणी खरेच गार असेल तर कुडकुडत) पाण्याची मजा तर आपण वर्षभर घेतोच पण या वर्षातील काही दिवस निसर्गाचा जो अतिसुंदर “शॉवर” आपले रूप दाखवतो त्याचे गुणगान काही औरच. दोस्तहो, थोडासा वेळ काढावा अन मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला जावे, निसर्गाच्या कुशीत रममाण व्हावे, सोबत कोणीतरी आपले असावे अन.. निसर्गाचे ते सुंदर रूप या देही अनुभवावे अशी सर्वांचीच इच्छा असते. मेघालयातील क्रांग सुरीचा धबधब्याचे चित्र पाहून तुम्हालाही असेच वाटले असेल. हो..ना? तर आज आपण अश्याच नैसर्गिक देणग्यांची माहिती घेणार आहोत. जुलै ते ऑक्टोबर या काळात तुमच्यासाठी...

Read More

पृथ्वीभोवती वेढा घालू शकतील वरळी “सी लिंकच्या” तारा..

अनेक बॉलीवूड चित्रपटात बॅकग्राउंडला दिसणारा अन अनेक इमोशनल सिन्स मूकपणे अनुभवणाऱ्या मुंबईस्थित बांद्रा वरळी सी लिंकला तयार करताना इतकी तार लागली आहे की ती जर एकमेकाना जोडली तर ती अख्या पृथ्वीला वेढा घालू शकेल. शेषाद्री श्रीनिवास नावाच्या इंजिनिअरनी डिझाईन केलेला हा 5.6 कि.मी. पूल तयार करायला जरी 2,57,00,000 इतके मनुष्य तास लागले तरी पूर्वी ज्या प्रवासाला एक तास लागायचा तो प्रवास 10 मिनिटात पूर्ण करून देण्याची किमया करून सी लिंकने वेळेचा अपव्यय वाचवलाच. दररोज 37500 वाहने ज्या सी लिंकला पार करू शकतात त्या पूलाचे वजन 56,000 आफ्रिकन हत्तींएव्हडे होईल. लिंकमध्ये फक्त स्टीलच्या ताराच नव्हे तर 90,000 टन सिमेंटचाही वापर...

Read More

जगावेगळी 5 “राडा” फेस्टीवल्स

जिंदगी ना मिले दोबारा या चित्रपटात स्पेनमध्ये कॅटरिना व इतर टोमॅटीनो फेस्टीवलला जातात व एकमेकंवर टोमॅटो फेकत मजा करतात हे आपण पाहिलेच. भारतातसुध्दा रंगपंचमीला एकमेकांना रंगात रंगवून फुल टू धमाल केली जाते. जगभरात असे अनेक सण आहेत की ज्यामध्ये एकमेकांना कशाने तरी भिजवले जाते अगदी इंच इंच. स्मार्ट दोस्तने अशाच पाच राडा फेस्टीवलची यादी तयार केली आहे. मग होऊन जावू दे राडा: १) चिखल गुट्टा दक्षिण कोरीयामध्ये एकमेकांना चिखलाने माखून काढायचा ’’बोरीयॉंग’’ मड फेस्टीवल साजरा केला जातो. मातीचा औषधी उपयोग सांगण्यासाठी चालू केलेला हा सण नंतर मुख्य उद्देश सोडूनच गेला. सुमारे दोन आठवडे चालणाऱ्या या सणामध्ये सुमारे २० लाख...

Read More

टॉप 5 भारतीय समुद्रकिनारे

समुद्र किनारी फेसाळणाऱ्या लाटा पाहत हात हात घेवून छान संध्याकाळ अनुभवायची संधी कोणाला नको असते? वाळूत एकेठिकाणी बांधलेला तो किल्ला अन दोघांची नावे पाण्यात विरून कधी जातात ते कळतच नाही. पण त्या आठवणी उनपावसातही चिरंतन राहतात दोघांच्या मनात… दोस्तहो आयुष्य सुंदर आहेच अन असे सुवर्णक्षण गोळा करायला आपल्या भारत देशात स्वप्नवत समुद्र किनारे अनेक आहेत. त्यातीलच 5 किनाऱ्यांची माहिती येथे. 1. कोवालम बीच, केरळ : त्रिवेन्द्रम पासून 16 किलोमीटरवर मलबार किनारपट्टीला लागून असलेला हा कोवालम. आयुष्यातील सुवर्णकण गोळा करायला वर्षभर हजारो मने येथे येतात. चित्रात दाखवलेला लाईट हाउस बीच हे खास आकर्षण. गेले कित्येक दशके परदेशी प्रवाश्यांचे आकर्षण ठरलेला...

Read More

उन्हाळी मधुचंद्राची भारतातील चांगली 5 ठिकाणे

भारतात प्रमुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे तीन सिझन असतात. त्यातही हल्ली उनपावसाळा, पाउसहिवाळा, उष्णहिवाळा, हिवपावसाळा असे डबल धमाल कॉम्बो सिझनही असतात. सध्या उन्हापाववाळा असा ट्रिपल कॉम्बो सिझन ज्या मध्ये सकाळ सकाळी अंघोळीच्या वेळी नभातून पाऊस, लगेचच नंतर कपडे कडक वाळवण्यासाठी सुरजमामाचे कडक आगमन व त्यामुळे तापलेल्या डोक्यासाठी लगेचच हिवाळ्यासारखी थंडी. हे सगळे अनऑफीशियल, लगे लगेच. पूर्वी सारखे तीन चार महिने ब्रेक नाही. सगळे इस्टंट. असो विषय तो नाही. या सगळ्या सिझन मध्येच लग्नाचा सिझनपण आला आहे. आणि लग्न म्हणजे हनिमून पण आलाच. तर या ऑफीशियल उन्हाळ्यात हनिमूनला भारतात कोठे कोठे जावू शकतो याची स्मार्टदोस्तने यादी केली आहे. त्यासाठी...

Read More

प्रसिध्द पण आता ओसाड पडलेली 5 भारतीय ठिकाणे

भुतांबद्दल अनेकांना भिती तर काहींना भीतीयुक्त आकर्षण. असे म्हणतात की भूतांचा वावर प्राचीन पडक्या वाड्यामध्ये, अंधाऱ्या खोल विहिरीमध्ये तसेच ओसाड ठिकाणी असतो. स्मार्टदोस्तने अशाच ओसाड ठिकाणची यादी बनवली आहे जिथे तुम्हाला भुते सापडण्याची किंवा भुतांच्या तावडीत तुम्ही सापडण्याची शक्यता आहे. ही सारी ठिकाणे भारतातील आहेत. इतिहासातील अनेक स्थितंतरात अनेक लोकांना अक्षरशः आपली घरेदारे, साहित्य मागे ठेवून गाव सोडून पळून जावे लागले. मग कारण परकीयांचे आक्रमण असो वा साथीचे आजार. कालांतराने मनुष्याचा वावर नसल्याने ही ठिकाणे भकास अन अफवांची आगारे बनू लागली. अफवा…. भुतांच्या…. भारतात अशी अनेक ओसाड ठिकाणे आहेत जिथे भुतांच्या असण्याच्या, दिसण्याच्या कहाण्यांमुळे अगदी चिटपाखरूदेखील पहावयास मिळत नाही....

Read More