Category: गुडलाइफ

रिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी

रिलेशनशिप बिल्ट करणे अन टिकवणे इतकी सोपी गोष्ट नाही हे अनेकाना चांगलेच समजले असेल. रिलेशनशिप मेंटेन ठेवण्यासाठी आजकाल अनेकांना चांगलीच कसरत करावी लागते. प्रेमाच्या नात्यात किंवा लग्नाच्या नात्यात अनेक अडचणींचा सामना अनेकांना करावा लागतो. अडचणी का येतात याची कारणे अनेक असतील. अडचणी काही सांगून येत नसतात. परंतु असे लक्षात आले आहे, कधी कधी एखाद्याच्या चुकीच्या सवयी त्याला अडचणीत आणायला कारणीभूत असतात. म्हणूनच रिलेशनशिप धोक्यात अणणाऱ्या अशाच काही सवयींची माहिती स्मार्टने नेटवरून गोळा केली आहे. अश्या सवयी, ज्यामुळे तुमचं नातं धोक्यात येऊ शकतं किंवा तुम्ही कुणासोबतही रिलेशनमध्ये राहू शकत नाही. सवयी, ज्या तुम्हाला एकटे पाडू शकतात. वाईट सवयी, ज्या पुरुषांमध्ये...

Read More

भिजवलेल्या बदामांचे 5 आरोग्यदायी फायदे

बदाम म्हटलं की स्मार्टला आठवतात ते अडॅम अन इव्ह. प्रेमाचा प्रतिक बदाम. असो आता आपण त्या प्रेमाबद्दल बोलायचे नाही तर बदामा बद्दल बोलायचे आहे. म्हणजे बदाम नावाच्या कुरकुरीत ब्राउनी नट्स बद्दल. काही स्त्रीवर्ग त्याला खिरीत घालून नवरोबाला अर्पण करतात तर काही बाबा लोक सर्वांगाला चॉकलेट लावलेले बदाम बेबी लोकांना. कदाचित प्रेमाची सुरुवात पोटातून होते यावर त्यांचा ठाम विश्वास असेल. असो आज बदामाच्या हेल्दी फायद्याबद्दल बोलायचे आहे. बदाम हेल्थ साठी फार उपयोगाचा आहे हे हजारो वर्षापासून जगाला माहित आहे. पण जाता येता वाळके बदाम खाण्यापेक्षा भिजवलेले बदाम खाणे कधीही फायद्याचे असे नेट वर वाचले. रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून...

Read More

परफेक्ट बॉडीसाठी जीममध्ये जाताना स्वत:च्या या 5 गोष्टींची लाज वाटणे थांबवा

टोन्ड बॉडी, झिरो फिगर अश्या शब्दांची सध्या चालती आहे. प्रत्येक पुरुषाला चवळीची शेंग पाहिजे असते अन बहुतांशी महिलावर्गाची स्वतःच्या बॉडी फॅट बद्दल एक वेगळीच आवड निवड असते. आपल्या नको तिथे वाढणाऱ्या शरीराचे काय करायचे या विचारात अनेक भगिनी जीमिंगचा पर्याय निवडतात. तर “To get perfect body” अनेक बंधू बॉडी बनवायला भली मोठी फी भरून जिममध्ये नाव नोंदवतात. अन सुरु करतात एक प्रवास नवीन बांधा बनवायचा. ही एक चांगली गोष्ट जरी असली तरी अनेक जीमर्सना त्याचा हवातसा इफेक्ट मिळत नाही. कारणे अनेक असतील पण त्या सर्वांमधील महत्वाचे कारण म्हणजे जिम मध्ये जाताना वाटणारी स्वतःची लाज. जीममध्ये जर प्रथम जाणार असाल...

Read More

हॅपी संसारासाठी हाऊस वाईफशी बोलताना टाळा या 5 गोष्टी

पती पत्नीमध्ये ताण तणाव निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी लाईफमध्ये डोकावतात अन त्यांना सामोरे कसे जायचे हे अनेकवेळा दोघांनाही उमजत नाही. कधी कधी ही कारणे अगदी शुल्लक असतात पण संबंध बिघडवायला पुरेसी असतात. अन संसाराची गाडी घसरायला, घडी बिघडवायला काफी असतात. हीच गाडी परत रुळावर यायला वेळ तर जातोच पण कष्टही भरपूर घ्यायला लागतात. दोस्तहो, संसारात भांड्याला भांडे लागणारच असे अनेकांकडून ऐकले असेलच परंतु थोडे प्रयत्न केल्यास भांड्याचा हा कलकलाट अन भांडणाचा त्रास कमी करता येतो हे नेटवर वाचनात आले अन वाटले शेअर करावे तुमच्याबरोबर.. ह्या टिप्स खास अश्या पतीलोकांसाठी आहेत ज्यांच्या पत्नींची “हाऊस वाईफ” म्हणून ओळख करून दिली जाती....

Read More

हार्ट अटॅकच्या या लक्षणांकडे कधीच दुर्लक्ष करू नका.

हार्ट अटॅक हा कोणालाही आणि कुठेही येऊ शकतो. बऱ्याचवेळा हार्ट अटॅक येण्यापूर्वी तो आपल्या आगमनाची रुग्णाला अनेक लाक्षणाद्वारे जाणीव करून देतो. म्हणूनंच हार्ट अटॅकच्या नेमक्या लक्षणांबाबत स्मार्टदोस्तने गोळा केलेली माहिती कदाचित तुम्हाला उपयोगी पडेल. हार्ट अटॅक दरम्यान एक किंवा त्यापेक्षा अधिक लक्षणं आढळू शकतात. म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या मनाने काही औषध किंवा घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा तात्काळ वैद्यकीय मदत घ्या. 1. घाम – ह्द्याला पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनमध्ये अडथळा आल्यास त्याचे संकेत मेंदूला पोहचवले जातात. ह्द्याचे कार्य सुरळीत ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये शरीरातून घाम वाहण्याचे प्रमाण वाढते. शरीरात काही बिघाड झाल्याचा हा एक संकेत असतो. त्यामुळे हार्ट अटॅकच्या वेळेस खूप...

Read More

जीवनात एकदातरी अनुभवा हे भारतातले 5 अतिसुंदर धबधबे

पाण्याशी खेळायला कोणाला आवडत नाही? बाथरूममध्ये शॉवर खाली “थंडे थंडे पानीसे नहाना चाहिये…” असे गुणगुणत (अन पाणी खरेच गार असेल तर कुडकुडत) पाण्याची मजा तर आपण वर्षभर घेतोच पण या वर्षातील काही दिवस निसर्गाचा जो अतिसुंदर “शॉवर” आपले रूप दाखवतो त्याचे गुणगान काही औरच. दोस्तहो, थोडासा वेळ काढावा अन मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला जावे, निसर्गाच्या कुशीत रममाण व्हावे, सोबत कोणीतरी आपले असावे अन.. निसर्गाचे ते सुंदर रूप या देही अनुभवावे अशी सर्वांचीच इच्छा असते. मेघालयातील क्रांग सुरीचा धबधब्याचे चित्र पाहून तुम्हालाही असेच वाटले असेल. हो..ना? तर आज आपण अश्याच नैसर्गिक देणग्यांची माहिती घेणार आहोत. जुलै ते ऑक्टोबर या काळात तुमच्यासाठी...

Read More