Category: कला

मर्लिन मन्रोच्या 5 दंतकथा

5 ऑगस्ट 1962….मर्लिन मन्रो तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली. सोबतीला होती झोपेच्या गोळ्यांची बाटली. ड्रग ओव्हरडोसनं तिचा मृत्यू झाला होता असे सांगण्यात आले जे आजही कोणी सिध्द करू शकले नाही. मर्लिननं आत्महत्या केली की तीचा खून झाला हे न उलगडलेले कोडेच आहे. मर्लिन जिवंत होती तेव्हा तर तीनं सगळ्यांनाच झपाटून टाकलं होतचं. पण तीच्या मृत्यूनंतरही तीनं अनेकांना प्रेरणा दिली. मॅडोना, एल्टन जॉन, लेडी गागा अश्या अनेकांची प्रेरणा मार्लिन मृत्यूनंतरही न उलगडलेलं एक कोडंच राहिली. दोस्तहो आज मर्लिन मेन्रोबद्दल बोलणार आहोत. कारुण्याची छटा असलेले हे मादक आयुष्य खरोखरच जीव लावणारे अन जीवाला चटका देणारे.   1. ना बाप ना धड आई.....

Read More

चित्रकार राजा रवीवर्मा – 5 आठवणी

असा एक काळ होता जेव्हा सुंदर मुलीची गणना राजा रवी वर्मांच्या चित्रातील मुलगी अशी व्हायची. जणू काही ती रवीवर्मांच्या चित्रातून बाहेर पडून पृथ्वीवर आली आहे असे म्हटले जायचे. राजा रवीवर्मांची चित्रे होतीच तशी सुंदर अन जिवंत. शंभर वर्षांनी आज देखील अनेक भारतीय घरात ज्यांच्या चित्रांचे फोटो तुम्हाला पहायला मिळतील तेच ते राजा रवीवर्मां. तर दोस्तहो आज आपण भारतीय आधुनिक चित्रकलेचे जनक, चित्रकारांचा राजा व राजामधील चित्रकार, राजा रवीवर्मांबद्दल 5 आठवणी ताज्या करणार आहोत ज्या तुम्हाला या अवलियाचे अनोखे पैलू दाखवेल. 1. चित्रांच्या प्रचंड मागणीमुळे पोस्टाची सुरुवात : किलीमानूरच्या राजवाड्यात उमाम्बा आणि निलकंदन यांना 1848 साली जन्मलेल्या या बाळाने चित्रकलेत...

Read More

विलक्षण लिओनार्डो विन्चीच्या 5 गजब गोष्टी

लिओनर्डोला जग एक प्रसिद्ध चित्रकार म्हणून ओळखतेच. परंतु जगातल्या पहिल्या यंत्रमानवाच्या (रोबो) निर्मितीत लिओनार्डोचे डीझाइन वापरले होते हे अनेकांना माहितच नाही. इतकेच नाही तर पाणबूडयाच्या सूटचे डीझाइनपण लिओनार्डोने बनवले होते. तो एक चित्रकारच नव्हता तर गणितज्ञ, शिल्पकार, आर्किटेकक्ट, ऑपरेशन करू शकणारा अॅनाटॉमिस्टपण होता. अशा या इटलीच्या विन्ची गावच्या लिओनार्डोच्या 5 गजब गोष्टीची ही यादी. (त्याचे नावही त्यामूळे लिओनर्डो दा विन्ची पडले) तर मग वाचा विलक्षण यादी. ग्रेट माणूस…. 1. चित्रकलेसाठी लिओनार्डोने अनेक मृत शरीरांचे पोस्टमॉरटम करून अवयवांचा अभ्यास केला. वयाच्या १४व्या वर्षापासून गुरु व्हेरोच्ची यांच्या सांगण्यावरून लिओनार्डोने फ्लोरेन्स, मिलान व रोम येथील दवाखान्यात अनेक मृत शरीरांचे पोस्टमॉरटम केले. त्यावरून...

Read More

500 कोटी रूपयांपेक्षा महाग असणारी 5 पेन्टींग्ज

घरात एखादे तरी ओरिजिनल पेन्टींग असावे असे अनेकांना वाटते. हॉलमध्ये प्रसिध्द चित्रकाराचे पेन्टींग घराची आणि घरातील लोकांची कलारसिकता दाखवून देते. बऱ्याच वेळा ही ओरिजिनल चित्रे सहजासहजी मिळत नाहीत व ती महागही असतात. म्हणून त्यांच्या ऑफिशीयल कॉपीज फ्रेम करून आपण लावतो. परंतु, ओरिजिनल चित्रे किती रूपयांना मिळतात याचा शोध स्मार्टदोस्तने केला तेव्हा तयार झाली महागड्या पेन्टिंगची यादी. 1. पोट्रेट ऑफ एडेल ब्लॉक (Portrait of Adele Bloch): गुस्ताव क्लिम याने सन 1906 साली रंगवलेले हे चित्र. नाझींच्या ताब्यात घेतलेले हे चित्र नंतर मूळ मालकाला परत देण्यात आले, जे त्याने सन 2006 ला अमेरिकेच्या रोनाल्ड लाउडरला फक्त रूपये 640 कोटींना (त्यावेळच्या)विकले. 2....

Read More

2014 चे बॉलीवूडमधील टॉप 5 गायक

बॉलीवूडमध्ये गाण्यांना फार महत्व. झाडांच्या मागे पळताना असो वा गुंडाच्या समोर नाचताना असो, बॉलीवूड मधील बसंतींना गाण्याचा फार आधार. चित्रपटाची एक गरज असणाऱ्या याच गाण्यांनी मात्र रसिकांना वेळोवेळी आनंद दिला आहे. अनेक सुमधूर गाणी कोटी कोटी लोकांच्या हृदयात घर करून आहेत. स्मार्टदोस्तनी बॉलीवूडच्या या देणगीला सलाम करत याच बॉलीवूडच्या टॉप गायकांचा मागोवा घेतला. त्याची ही यादी, 1) श्रेया घोषाल : सारेगामा म्यूझिक स्पर्धेतून पुढे आलेली ही प्रतिभावंत गायिका, फिल्मफेअर आणि चार नॅशनल अॅवॉर्डस मिळविणाऱ्या श्रेयाने इशकजादे, रावडी राठोड, बर्फी इ. अनेक चित्रपटात आपल्या सुमधूर आवाजाने रंग भरला. 2) अतिफ अस्लम: मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या अतिफने बॉलीवूडसाठी अनेक कर्णमधूर गाण्याचा नजराणा...

Read More

विक्रमादीत्य दादा कोंडकेच्या ५ गोष्टी

सलग पंचवीस आठवडे एखादा चित्रपट चालणे म्हणजे त्या चित्रपटाच्या निर्मात्याला, कलाकारांना आनंदाचा परमोच्च क्षण असतो. अशा कठीण गोष्टी वारंवार होत नाहीत. परंतू दादा कोंडके नावाच्या अवलीयाने एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल नऊ असे चित्रपट तयार केले की सर्व चित्रपट २५ आठवड्यांच्या वर हाऊसफूल्ल चालले. आजअखेर जगातील कोणत्याही कलाकाराने हा अद्भूत पराक्रम केला नाही. म्हणून तर गिनीज बूक मध्ये दादांचे नाव सूवर्णअक्षरामध्ये नोंदले आहे. दादांच्या या अनोख्या गोष्टी आठवण्याचा स्मार्टदोस्तनी केलेला छोटा प्रयत्न. 1. दादा मुळचे कृष्णा :  गोकूळ अष्टमीला एका गिरणी कामगाराच्या घरी जन्मलेल्या या मूलाचे नाव घरच्यांनी ‘कृष्णा’ असे ठेवले. नावाप्रमाणेच या मूलाने नंतर जगात किर्ती मिळवली. 2. लहानपणीचा...

Read More