Category: अनोखे

परग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का?

गिझाच्या पिरॅमिडबद्दल जगभर अतीव उत्सुकता असते. लालसर तांबूस दगडांनी बांधलेली ही आकाशाकडे निमुळती होत जाणारी वास्तू लाखो पर्यटकानाच नव्हे तर इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांनादेखील अचंबित करत आली आहे. पिरॅमिड बांधून हजारो वर्षे झाली असतील पण अजूनसुद्धा ह्या वस्तू का, कोणी व कश्या बांधल्या यावर मात्र सतत नवनवीन तर्क बांधले जात आहेत. राजाच्या मृत शरीराला जतन करून त्याच्या भावी(?) प्रवासा साठी लागणाऱ्या सामुग्रीचा साठा करण्यासाठी याची उभारणी झाली हा सर्वसामान्य समज. पण काहींच्या मते ही सारी धान्याची कोठारे होती तर काहीच्या मते विजेची जनरेटर्स.. पिरॅमिडबद्दल ज्या अनेक समजुती प्रचलित आहेत त्यापकी 5 समजुती स्मार्टने गोळा केल्या आहेत.. जरूर वाचा. 1. स्पिंक्सच्या...

Read More

वाईनपूराण अन 5 अतिसुंदर व्हिंटेज कार्स

तर दोस्त, सध्याच्या लक्झरी कार्स म्हणजे फेसाळणारा जोश… एकाच घोटात रोमा रोमात झीणझीण्या आणणाऱ्या… टॉर्क, पिकप अन हॉर्सपॉवर असल्या टेक्निकल शब्दात रमणाऱ्या… फास्ट अन फ्युरियस मधल्या सारख्या.. मॉडर्न फटाकड्या.. या उलट व्हिंटेज कार म्हणजे हळूवारपणे मदमस्त करणारी ओल्ड वाईन.. मनाला व जीवाला उर्मी देणारी ज्योत… 30, 60 अन 90 अश्या नंबरात न बोलणारी.. तर जिभेवर घोळणाऱ्या एक एक बुंदसे अलग अहेसास देनेवाली.. मार्टिन ल्युथर नावाच्या जर्मन साधू अन तत्ववेत्त्याने लिहून ठेवले आहे “ बिअर माणसाने तयार केली तर वाईन देवाने..” दोस्तहो आज तुम्हाला एका वेगळ्या विश्वात नेतो आहे जेथे असेल थोडे वाईनपूराण अन तितक्याच अतिसुंदर व्हिंटेज कार्स.. 1. मर्सिडीज...

Read More

ओल्या पार्टीत चखना का दिला जातो?…घ्या जाणून

ओली पार्टी म्हटली की दारुसोबत चखना हा आलाच. दारुचे सेवन करताना चकणा हा तोंडाची चव वाढवण्यासाठी घेतला जातो. स्नॅक्समध्ये तळलेले काजू, शेंगदाणे, शेव, वेफर्स, मुगाची डाळ अशा चमचमीत पदार्थ तसेच कोल्हापूर भागात तांबडा रस्सा, पंधरा रस्सा असे विविध प्रकारांचा समावेश असतो. मात्र नेहमी दारुसोबत चखना खाण्याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? तर तुम्ही म्हणाल दारुचे सेवन करताना तोंडाला चव येण्यासाठी हे पदार्थ खाल्ले जात असावेत. मात्र हे खरे कारण नाहीये. जेव्हा आपण एखादा खारट वा तिखट पदार्थ खातो. तेव्हा आपल्याला शरीराला पाण्याची गरज अधिक असते. त्याचप्रमाणे जेव्हा दारुचे सेवन करताना हा खारट आणि तिखट चखना खाल्ला जातो तेव्हा शरीरातील...

Read More

एक गाव 800 जुळे – कोडीन्ही गावाच्या खरोखरच्या 5 गोष्टी

पूर्वी बॉलीवूडमध्ये “जुडवा” पिक्चर आला होता. परत त्याचा रिमेक “जुडवा” वरूण धवनचा.. असल्या चित्रपटात जुळ्या मुलांच्या बिछडण्याच्या अन परत भेटण्याच्या धमाल गमती दाखवल्या जातात. कधीकधी एखादी हिरॉईन चुकून जुळ्या हिरोकडे जाते.. कोण हिरो अन कोण जुळा हे कळाले नसल्याने ती जुळ्याच्या बाहुपाशात पडणार.. इतक्यात “मै यहा हू” असे म्हणत हिरो टपकतो. पिक्चरमधील असले खोटे खोटे प्रकार बघीतल्यावर खरोखरच्या “जुळ्यां” च्या आयुष्यात काय होत असेल हे एकदा कोणत्यातरी जुळ्याला विचारायचे असे जर तुमच्या मनात आले असेल अन जुळे कोठे मिळतात हा प्रश्न असेल तर स्मार्ट तुम्हाला आज जुळ्यांचा पत्ता सांगणार आहे. म्हणजे काय जुळे असे सहजासहजी भेटत नाहीत ना? म्हणून…...

Read More

ग्वाटेमाला जंगलातील दगडी डोक्याचा हरवलेला इतिहास..

सन 1987 साली डॉक्टर ऑस्कर यांना दक्षिण मेक्सिकोतील ग्वाटेमाला भागातून एक लिफाफा पोस्टाने आला अन त्यातील मजकूर वाचून ऑस्करनी ताबडतोब प्रवासासाठी बांधाबांधी सुरु केली. असे काय होते त्या पत्रात? ते पत्र ग्वाटेमाला जंगलातील शेतकऱ्याने त्याच्या शेतात सापडलेल्या भल्यामोठ्या दगडी चेहऱ्याबद्दल लिहिले होते अन सोबत एक 1950 साली घेतलेला फोटो पाठवला होता. जो जगाचा इतिहास बदलून टाकू शकला असता. ऑस्करपुढे दोन आव्हाने होती. मेक्सिकोमध्ये त्याकाळी रक्तरंजित सिव्हील वॉर सुरु होते अन त्या परिस्थितीत ज्याच्या शेतात हे दगडी डोके होते त्याचा पत्ता शोधणे म्हणजे मृत्युला सामोरे जाण्यासारखे होते. तरी सुद्धा ऑस्करनी हार मानली नाही अन तो शेतकरी व जंगलातील ती जागा...

Read More

कधीही टॉयलेटला न जाणाऱ्या हुकुमशाह किम जोंग उनची 5 चमत्कारिक रूपे

पाकिस्तान प्रमाणेच उत्तर कोरिया देशही आता जगाची डोकेदुखी बनू लागला आहे. “किम जोंग उन” नावाच्या तथाकथित 33 वर्षाच्या हुकुमशाहने मिसाईल्स, वेगवेगळे अणुबॉम्ब अन हायड्रोजन बॉम्ब बनवून व त्यांचे वारंवार स्फोट घडवून स्वतः व देश एक उपद्रवी प्राणी आहोत हे दाखवून दिले आहे. दोस्तहो ह्या किमचे भयानक वागणे केवळ जगाचीच नव्हे तर त्याच्या कुटुंबाची, देशाचीही डोकेदुखी आहे हे आता समोर यायला लागले आहे. वडिलांच्या अंतयात्रेत पुरेसे रडले नाहीत म्हणून लोकांना शिक्षा देवून त्याने आपल्या खुनशीपणाची जाणीव ज्याने देशाला करून दिली अन मग एन केन कारणांनी लोकांना भयानक पद्धतीने ठार मारत सुटलेल्या North Korean leader Kim Jong-un किम जोंग उन च्या...

Read More