क्रिकेट हा अनेक देशात पॉप्युलर असलेला खेळ. देशाच्या क्रिकेट टीम मध्ये चान्स मिळवण्यासाठी लाखो खेळाडू प्रयत्न करत असतात. परंतु अगदी थोड्यांनाच टीम मध्ये जागा मिळते. परंतु एकाच घरातील दोन जणांना संघात जागा मिळाल्याच्या हिस्ट्रीमध्ये नोंदी आहेत. उदा. लाला अमरनाथ व नंतर त्यांचा मुलगा मोहिंदर अमरनाथ अथवा सध्याचा स्टुआर्ट बिन्नी व त्याचे वडील रॉजर बिन्नी अशी अनेक उदाहरणे सापडतील. पण एकाच घरातील दोनजण अन ते पण भाऊ भाऊ टीममध्ये असल्याची काही उदाहरणे स्मार्टदोस्तकडे आहेत. आजच्या यादीत आपण क्रिकेट मधले भाऊ भाऊ खेळाडू कोण आहेत व होते ते पाहूया. नावे फर आहेत पण यादीत फक्त पाचच नावे देतोय. सुरुवात भारताकडून करुया…

1 इरफान व युसुफ पठान : भारत

पठाणी वसुली करणारा हार्ड हिटर युसुफ व त्याचा लहानगा सिमर इरफान. 2011 च्या वर्ल्ड कप विजयाचे शिलेदार असण्याचा अनोखा विक्रमही या दोन भावांच्या नावावर. लाहानपणी गल्लीतील प्रत्येक घरांची काच फोडल्याची कम्प्लेंट ज्याच्या विरुध्द असायची असा युसुफ नंतर त्याच पद्धतीने विरोधी संघातील बॉलर्सना फोडायला लागला. कपिल देवचा वारसदार म्हणून इरफानने वयाच्या 19 वर्षी भारताच्या संघात जागा मिळवली.

2. डेविड हस्सी व माईक हस्सी : ऑस्ट्रेलिया

लहान भाऊ डेविड एक ऑल राउंडर व मोठा माईक एक चांगला बॅट्समन. ऑस्ट्रेलियाला सापडलेले हे दोन हिरे. दोघांनीही देशाकडून खेळताना फार चांगली कामगिरी करून ऑस्ट्रेलियाच्याच स्टीव्ह व मार्क वॉ या दोन भावांप्रमाणे क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला. हे दोघे इंडियन प्रीमियर लीगमध्येसुद्धा चांगली कामगिरी करत आहेत.

3. अॅबी मोर्केल व मोर्ने मोर्केल : साउथ आफ्रिका

साऊथ आफ्रिकेकडून खेळलेल हे दोन्ही भाऊ फास्ट बॉलर तर आहेत. दोघे जेव्हा बॉलिंग करत असतात तेव्हा प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडचे पाणी पळते. पण अॅबी हार्ड हिटर म्हणूनसुद्धा प्रसिध्द आहे. आपल्या कौशल्याच्या जोरावर बॉलला लांबवर हवेत पाठवलेल्या त्याच्या सिक्सेस क्रिकेटमध्ये जान आणतात. आय. पी. एल. मध्येसूद्धा दोघाची धूम सुरु असते.

4. अँडी फ्लॉवर व ग्रँट फ्लॉवर : झिम्बाब्वे

यादीतील एक मजेशीर भाईजोडी. आपल्या टॅलेंटच्या जोरावर संघात वेग वेगळ्या भूमिका वटवणाऱ्या या जोडीतील अँडी मुळात विकेट कीपर बॅट्समन आहे. छोटा ग्रँट तडाखेबाज ओपनर फलंदाज. परंतु तैबू नावाच्या नविन विकेटकीपरच्या समावेशानंतर अँडी पार्टटाईम बॉलर म्हणून काम करू लागला. दोघांची फिल्डिंग सुपर्ब असल्यामूळे मोक्याच्या ठिकाणी चेंडू अडवायची जबाबदारीसुद्धा या भावांना दिली जाते. म्हणजे बघा बॉलर, बॅटर, विकेटकीपर व क्षेत्ररक्षक अश्या विविध जबाबदाऱ्या पार पडणारी ही जोडी ग्रेटच. नाही का?
शेवटी आपण पाहणार आहोत ती जोडी नसून तिकडी आहे… एक नाही… दोन नाही… तर तीन भाऊ एका संघाकडून.. वाचा तर भाई भाई तिकडी.

5. कमरान, उमर व अदनान अकमल : पाकिस्तान

सर्वात मोठा कमरान पाकिस्तानचा एक प्रसिध्द फलंदाज तर आहेच पण जगातील एक चांगला विकेट कीपर आहे. ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्त व श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या तोडीची किपिंग करणारा कमरानने आपल्या बॅटिंगच्या जोरावर पाकिस्तानला अनेक विजय मिळवून दिले आहेत.
सर्वात लहान उमर मिडल ऑर्डर बॅट्समन आहे. स्ट्रोकमधील व्हरायटी हे त्याचे वैशिष्ठ. पाकिस्तानला सापडलेला एक चांगला खेळाडू. मधला अदनान नुकतीच सुरुवात करतोय परंतु दोन भावांच्या मागोमाग तोही पाकिस्तान गाजवेल असे दिसते.
विशेष म्हणजे हे तिन्ही भाऊ विकेट कीपिंग चांगलेच करतात.

556 total views, 1 views today