क्रिकेटआणि सिनेमा याचे भारतीयांना फार वेड. क्रिकेटपटूंची पूजा करणारे व सिनेमा पोस्टर्सना दूधाचा अभिषेक घालणारे फॅन्स गल्लोगल्ली शेकड्याने भेटतात. भारतीयांना प्रेमात पाडणाऱ्या बॉलीवूडच्या सुरस गोष्टीचा संग्रह ’स्मार्टदोस्त’ ने केला आहे. त्यातीलच पाच सुरस गोष्टी येथे :
१) १९७० च्या दरम्यान भारतात अमेरिकेपेक्षा जास्त चित्रपट झाले व भारत सिनेमातील महासत्ता बनला (संख्येनुसार) अमेरिकेतील हॉलीवूडला मागे टाकल्यामुळेच त्या काही बॉम्बेत तयार होणाऱ्या चित्रपटांना ’बॉलीवूड’ असे नाव पडले.
२) भारतातील पहिल्या बोलपटाचा म्हणजे १९३१ च्या ’आलम आरा’ चित्रपटाचा नायक मराठामोळा होता. कोल्हापूरच्या मास्टर विठ्ठल यांनी ती भूमिका केली.
३) गाणी आणि चित्रपटांचे अतूट नाते. एका चित्रपटात किती गाणी असावीत याचे नियम कोठेही नाहीत. कदाचित म्हणूनच ’’इंद्रसभा’’ या चित्रपटात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ७१ गाणी होती.
४) चित्रपटात गाणी किती असावीत याबद्दल नियम नाहीतच परंतु गाणे किती वेळेचे असावे हे पण फिक्स नाही. ’’अब तुम्हारे हवाले वतन साथीयों’’ हे प्रसिध्द गाणे २० मिनिटांचे आहे.
५) सर्वात जास्त लांबीचा चित्रपट म्हणून ’’एल.ओ.सी.कारगील या चित्रपटाची नोंद आहे. थोडा थोडका नव्हे तर पूर्ण ४ तास २५ मिनीटाच्या या चित्रपटात हॉलीवूडचे दोन चित्रपट बघून होतील. नाही का?

455 total views, 1 views today