खलनायक गरीब बिचाऱ्या लोकांना पहिल्यांदा त्रास देतो. मग त्याची नजर नायिकेवर पडते. हे काय हीरोला पटत नाही. “आता माझी सटकली” असेच काहीतरी म्हणत हिरोची एन्ट्री होते. शेवटी फाईट. व्हिलनला चांगला बुकलून काढल्यावर चित्रपटाच्या शेवटाला पोलिसांचे आगमन अन हिरोच्या तावडीत “कानून के हाथ बहुत लंबे होते है” किंवा “कानून को हाथ मै मत लेलो” डायलॉग मारून व्हिलनची जेलमध्ये रवानगी. स्मार्टदोस्तने अनेक चित्रपटात हा सिक़्वेन्स बघीतला आहे. चित्रपटात वेळोवेळी नायकांनी, नायिकेने अन कधीकधी खलनायकाने मारलेल्या डायलॉग्जवर पडलेल्या टाळ्या व शिट्यापण एन्जॉय केल्या आहेत. आज स्मार्टदोस्त असेच 5 डायलॉग्ज तुमच्यासाठी घेवून येत आहे.

1. “कौन कम्बख्त बर्दाश्त करने को पिता है”

संजय लीला भन्साळीच्या देवदासची मूळ आवृत्ती असणाऱ्या सन १९५५ च्या देवदासमधील हा डायलॉग. दिलीपकुमारनी आपल्या अनोख्या दर्दभऱ्या आवाजात अदा केलेला. प्रेमामध्ये अखंड बुडलेल्या देवदासने मादिरेमध्ये बुडण्याचे केलेले समर्थन. लाखो अभागी प्रेमिकांना त्यांच्या व्यथा पडद्यावर पाहताना या डायलॉगने घायाळ केले होते. ग्रेट. राजिंदर सिंग बेदी आणि बिमल रॉय याचे हे लिखाण.

2. “जिनके घर शिशोके होते है वो दुसरोंके घर पत्थर नाही मारते”

राजकुमार म्हणजे हिंदी चित्रपटाचे डायलॉग किंग. त्यांनी भूषवलेल्या अनेक डायलॉग्जपैकी वक्त या सन १९६५ मधल्या चित्रपटातील हा किलर डायलॉग. विशेष म्हणजे याच चित्रपटातील “ ये बच्चोके खेलनेकी चीज नाही, हाथ कट जाये तो खुन निकल जाता है” हा डायलॉग पण प्रचंड टाळ्या मळवून गेला. अख्तर उल इमान यांनी लिहलेल्या या दोन डायलॉग्जना फिल्मफेअर अवार्ड मिळाले होते.

3. “अरे ओ बाबू मोशाय हम तो रंगमंच की कठपुतलीया है, जिसकी डोर उस उपरवाले के हाथ मै है”

हिंदी चित्रपटाच्या पहिल्या सुपरहिरो राजेश खन्नांचा हा आनंद चित्रपटातील डायलॉग. बारा न होणाऱ्या आजारात हिरोचा मृत्यू अटळ. तरीसुद्धा चेहऱ्यावर हसू कायम ठेवून दुसऱ्यांना आपल्या दुखाःची जरासुद्धा भनक लागू न देणारा हा हिरो राजेश खन्नांनी अप्रतिम वठवला. समोर अमिताभ नुकताच हिंदीमध्ये पावूल टाकणारा. खरच मनाला चटका लावून गेला हा डायलॉग. गुलजार साहेबांना सन १९७२ चा फिल्मफेअर बेस्ट डायलॉग अवार्ड मिळवून गेला.

4. “भाई आज मेरे पास गाडी है, बंगला है. तुम्हारे पास क्या है? ….मेरे पास मा है”

राजेश खन्नांची कारकीर्द अस्तास येत असताना उदयास आलेल्या बिग बींची तुफानी डायलॉगबाजी. त्यांचा दिवार ह्या प्रचंड गाजलेल्या चित्रपटातील शशी कपूरने वठवलेल्या भावास उद्देशून म्हणलेली ही वाक्ये एैकून सन १९७५ मध्ये प्रेक्षकांनी टॉकीज दणाणून टाकले. याच चित्रपटात देवास उद्देशून विजयने म्हणजे अमिताभने म्हणलेली “आज खुश तो बहोत होगे तुम” हा सुद्धा सुपर्ब.
सलीम-जावेद यांना याबद्दल फिल्फेअर पुरस्कार.

5. “अरे ओ सांबा, कितने आदमी थे… ?”

डायलॉगबाजीने खचाखच भरलेला शोले. खलनायकीला एक वेगळी उंची देणाऱ्या गब्बरने गँगमधील सांबाला जय आणि विरू कडून मार खाऊन आल्यावर चिडून विचारलेली ही घुस्सेभारी वाक्ये. गब्बर ठाकूरला त्याचे दोन्ही हाथ मागतो तेव्हातर त्याने हातात दोन तलवारी घेवून कडवटपणे म्हणलेली “ये हात मुझे दे दो ठाकूर …” तर अंगावर शिरशिरी उठवून गेला. “ जो दर गया वो मर गया” हा त्याचाच डायलॉग. सलीम-जावेदना या चित्रपटातील डायलॉग्जबद्दल फिल्मफेअरचे अवार्ड मिळाले नाही पण करोडो प्रेक्षकांच्या टाळ्या जरूर मिळाल्या.

505 total views, 1 views today