मदर इंडिया चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतानाची गोष्ट. सेटवर नर्गिस आपल्या भूमिकेत रममाण झाली होती. अचानक सेटला आग लागली. भयंकर ज्वाळांनी नर्गिसला वेढले. काय करावे अन नर्गिसला कसे वाचवावे हे कोणालाच कळेना. अन अचानक पिक्चरमध्ये दाखवतात तशी सुनील दत्तची एन्ट्री सेटवर होते. आगीची तमा न बाळगता सुनील दत्त नर्गिसकडे धावले अन जीवाची बाजी लावून त्यांनी नर्गिसला सुखरूपपणे बाहेर काढले.
मित्रहो ही सत्य कहाणी आहे. कोणताही स्क्रीन प्ले नव्हे. खरोखरच्या ज्वाळा, खरोखरची नर्गिस, खरोखरचे दत्त विदाउट डमी. कहाणीचा शेवट तुम्हा आम्हाला माहीतच आहे. नर्गिस वेड्स दत्त तू बिकम नर्गिस दत्त. रील लाइफची जोडी रिअल लाइफची जोडी बनली.
ही कहाणी वाचता वाचता स्मार्टदोस्तला अशाच रील लाइफच्या रिअल बनलेल्या जोड्यावर आर्टिकल करावे वाटले. वाचा तर पडद्यावरील अन खरोखरच्या बॉलीवूड जोड्यांची माहिती.

1. दिलीप कुमार – सायराबानू :

विश्वास बसणार नाही पण दिलीप कुमार व सायराबानूंच्या प्रेमाची कहाणी खासच आहे. त्यावेळच्या सुपर स्टार दिलीप कुमारांवर एका अल्लड मुलीचे प्रेम जडले. ती त्यावेळी लहान म्हणजे फक्त 12 वर्षांची होती. परंतु म्हणतात ना प्रेमाला वय नसते. सन 1966 ला दिलीप कुमार आणी सायरा यांचे लग्न झाले. सायरा त्यावेळी 22 वर्षांच्या अन दिलीप कुमार 45 वर्षांचे होते. परंतु या जोडीने साथ देत प्रेमाची एक नवी परिभाषा लिहली.

2. धर्मेंद्र – हेमा मालिनी :

म्हणतात ना प्रेमाला सीमा नसते.
बॉलीवूडचा पहिला ही मॅन अन समस्त भारतवर्षाची स्वप्नसुंदरी ड्रीमगर्ल हेमा यांच्या रील तू रिअल लग्नाची कहाणी फार अनोखी आहे. धर्मेंद्र आणी हेमा यांची तार “तुम हसीना मै जवान” या चित्रपटाच्या सेटवर जुळली. हेमा तर हसीन होतीच धरम 44 वर्षाचे जवान होते. बॉबी व सनी या मुलांच्या या पित्याबरोबर हेमाने लग्नाला होकार दिला तेव्हा इतर हिरोंचे पाणी पाणी झाले. पण प्रेम हे प्रेम असते. (पण तुमचे आमचे सेम असते असे काही नाही) मेडीयामध्ये या लग्नाची फार चर्चा झाली. असे म्हणतात की दोघांनी लग्नासाठी आपला धर्मही बदलला. हे मा धरम ने धर्म बदलला अन लग्न सुखरूप पार पडले.

3. अमिताभ – जया :

शहनशहा अमिताभ व टॅलेंटेड जयांची नजरानजर “इक नझर” च्या सेटवर झाली अन “जंजीर”च्या शुटींगदरम्यान प्रेम वाढत गेले. एव्हाना अमिताभ अन रेखा या जोडीबद्दल बऱ्याच वावड्या उठत होत्या. परंतु तशा परिस्थितीतसुद्धा अमिताभ व जया भादुरिनी संयम दाखवला. गंमत म्हणजे जंजीर जर बॉक्स ऑफिसवर हिट झाला तर जयाला परदेशी फिरायला नेणार असे अमिताभने काबुल केले होते असे म्हणतात. पण अमिताभ यांच्या वडिलाना दोघांनी लग्न न करता फिरणे पसंत नव्हते. म्हणतात ना प्रेमात अटी नसतात. मग काय गडबडीत लग्न करावे लागले अन पार्टीही. (येथे भादुरिंनी बहादुरी दाखवली असे म्हणायला हरकत नाही) 1 जून 1973 त्यांनी लग्नाच्या “जंजीरीत” स्वतःला गुंतवून घेतले.

4. रिशी कपूर – नीतू सिंग :

बॉलीवूडमधील एक फेमस जोडी. या जोडीने लग्नापूर्वी अनेक हिट चित्रपट दिले. या दोघांमधील रसायन पब्लिकला फार आवडायचे. त्यामुळे ते दोघे बराच काळ शुटींगसाठी एकत्र असायचे. परंतु फक्त बेस्ट फ्रेंड्स म्हणूनच. रिशी तेव्हा अनेक मुलींमध्ये गुंतून होता असे म्हणतात. अन तो ही सर्व सिक्रेट्स नीतूबरोबर शेअर करायचा. नीतूबरोबर “कभी कभी”च शुटींग काश्मीरमध्ये संपवून रिशी “बारुद्”च्या शुटींगसाठी परदेशी गेला अन तेथे त्याला नीतूची फार उणीव भासू लागली. म्हणतात ना प्रेमाचा साक्षात्कार कोठेही होवू शकतो. त्याने एक टेलेग्राम केला अन सांगितले “ ये सिखनी बडी याद आती है”. नीतू त्यावेळी फक्त 14 वर्षाची होती. कालांतराने दोघांचे शुभ मंगल झाले हे जाणतोच.

5. रितेश – जेनिलिया :

सन 2002. हैद्राबाद विमानतळावर एक 16 वर्षांची सुंदर तरुणी आपल्या आईबरोबर एका तरुण मुलाला भेटायला आली होती. तिला फक्त एकच माहिती होती की ज्याला भेटायचे आहे तो एक महा राज्याच्या मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे. साहजिकच तो एक बडे बाप का बिगडा हुवा पोट्टा होगा अशी तिची समजूत. आज आपली अॅटीट्युड दाखवायची अन त्याला जास्त भाव द्यायचा नाही असेच तिने ठरवले होते. त्यामुळे जेव्हा ते दोघे भेटले तेव्हा शेक हँड करून तिने तिचा चेहरा दुसरीकडेच वळवला..
आपल्या महाराष्ट्राच्या रितेशची ही प्रेम कहाणीची सुरुवात ही अशी.
दोघांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण “तुझे मेरी कसम” या चित्रपटातून केले. शुटींग दरम्यान जेनिलीया नावाच्या या मुलीला रितेश नावाच्या मराठी मुलाची अन मराठी मनाची महानता कळाली. त्याचे ते सेटवरचे “डाऊन टू अर्थ” वागणे, तिच्या आई वडिलांना रिस्पेक्ट देणे, सर्व सर्व फार आवडले. रितेशला देखील जेनिलिया आवडली. हे सर्व आपणाला देखील चित्रपट पाहताना जाणवलेच.
विमानतळावर सुरु झालेल्या या भेटीनंतर काळ पुढे सरकत गेला. म्हणतात ना प्रेम कधी होते ते कळतच नाही. दोघानांही कळाले नाही की प्रेम कधी झाले. अन एक दिवस दोघांनी लग्नाच्या गाठी बांधल्या आणी बॉलीवूड मधील “यंगेस्ट जोडी” होण्याचे रेकॉर्ड केले.
अशी ही कहाणी सफल संपूर्णम…
ता.क.: या जोड्यावरून एक कळाले – प्रेमाबद्दल बरेच बोलले जाते. प्रेमामध्ये बऱ्याच गोष्टी नसतात असे म्हटले जाते. आणी प्रेमाला कशाचे म्हणजे कशाचे सुद्धा बंधन नाहीये.

676 total views, 1 views today